"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*09/03/19 शनिवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

  *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 09/03/2019 ❁*
      *🔘 वार ~ शनिवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

  🍥 *09. मार्च:: शनिवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             फाल्गुन शु. ३
     तिथी : शुक्ल पक्ष तृतिया,
              नक्षत्र : रेवती,
    योग : शुक्ल,  करण : तैतिल,
सूर्योदय : 06:52, सूर्यास्त : 18:46,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

09. *माणुसकीची वाढ म्हणजे सुधारणा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

09. *जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही*
      *★ अर्थ ::~*
- एखाद्याच्या अंगी असलेले दूर्गुण , सवयी जन्मभर जात नाहीत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

09. *अतिपरिचयात् अवज्ञा ।*
              ⭐अर्थ ::~
 अतिपरिचयाने अनादर होतो. (होऊ शकतो.)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

          🛡 *09. मार्च* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ६८ वा (लीप वर्षातील ६९ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९२ : कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला 'सरस्वती पुरस्कार' उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.
●१९५९ : ’बार्बी’ या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५६ : शशी थरूर – केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ
◆१९५१ : उस्ताद झाकिर हुसेन – तबलावादक
◆१९३४ : युरी गागारीन  – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर
◆१९३० : डॉ. यु. म. पठाण – संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक
◆१८६३ : लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक
●२००० : उषा मराठे - खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल
●१९९४ : देविका राणी – अभिनेत्री, पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कारांनी सन्मानित
●१९७१ : के. असिफ – हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक
●१६५० : संत तुकाराम यांचा वैकुंठवास
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

09.  *✸ शूर आम्ही सरदार ✸*
      ●●●●●००००००●●●●●
शूर आम्ही सरदार आम्हांला , काय कुणाची भीती
देव , देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती ll धृ ll
आईच्या गर्भात उमगली , झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं जडली वेडी प्रीत
लाख संकटे झेलुन घेईल , अशी पहाडी छाती ll १ ll
जिंकावं वा लढून मरावं , हेच आम्हांला ठाव
लढून मरावं मरून जगावं , हेच आम्हांला ठाव
देशापायी सारी विसरू , माया ममता नाती ll २ ll
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

09. *❂ तू बुद्धि दे तू प्रकाश ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तू बुद्धि दे, तू प्रकाश दे, नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

सापडे ना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
करिती तुझी जे साधना त्यांना तुझा सहवास दे

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखात ह्या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

09. *❃ आत्मपरीक्षण ❃*
      ••◆•◆•◆★◆•◆•◆••
    "एक तरुण मुलगा पब्लिक फोन ठेवलेल्या दुकानात येतो.
तरुण (अदबीने) : दुकानदार काका, मी एक फोन करू का ?
तरुणाचे आदबशीर वागणे पाहून दुकानदार खुश होतो. तो तरुण फोन नंबर फिरवून रिसिव्हर कानाला लावतो. (डायलवाला जुन्या काळाचा फोन असल्याने पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज इकडे इतरांना देखील अस्पष्ट ऐकू यायचा !! तसे ते बोलणे दुकानदार हळूच ऐकू लागला)

तरुण : बाईसाहेब, तुमच्या बागेच्या सफाईचे काम मला द्याल का ? मी माळीकाम खूप छान करतो.
महिला : (तिकडून बोलतेय) नको. मी एक महिन्यापूर्वीच एकाला ठेवले आहे.
तरुण : बाई, प्लिज, मला फार गरज आहे हो, आणि तुम्ही त्याला जितका पगार देता त्याच्या निम्म्या पगारात काम करायला मी तयार आहे !!
महिला : पण माझ्याकडे जो आहे, त्याच्या कामावर मी समाधानी आहे. मग त्याला का काढून टाकू ?
तरुण : बाई, बाग कामासोबतच मी तुमच्या घरातले सफाईचे काम फ्री करेन. प्लिज मला कामावर घ्या न !!
महिला : तरीही नको बाबा !! दुसरीकडे काम पहा !! माझ्याकडे नाही !!

यावर हसत हसत फोन ठेवून निघाला. दुकानदाराने त्याला थांबवले. आणि विचारले की, "तू प्रयत्न केलास पण नोकरी मिळाली नाही न ? मला तुझा स्वभाव आवडला. कष्ट करण्याची तयारी आवडली. वाटल्यास तू माझ्या दुकानात नोकरी करू शकतोस"
यावर पुन्हा हसून तो तरुण म्हणाला, "मला नोकरी नकोय. नक्की नकोय."
दुकानदार : मग आत्ता तर त्या फोनवर इतक्या विनवण्या करत होतास न ?
तरुण : मी खरेतर त्या बाईंना काम मागत नव्हतो तर स्वतःचे काम तपासत होतो. मीच त्या बाईंच्या बागेचे काम करतो. मी करत असलेले काम माझ्या मालकाला आवडतेय की नाही ? हे चेक करत होतो"
असे म्हणून तो तरुण निघतो, दुकानदार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे चकित होऊन पाहत राहतो.

     *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  अधूनमधन आपण स्वतःच स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. "जो स्वतःला तटस्थपणे पाहून परीक्षण करू शकतो, तो नक्कीच इतरांपेक्षा पुढे जातो. "
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

09. *"आनंदापेक्षाही" मोठा असा*
         *एक "आनंद" आहे,*
 *तो त्यालाच मिळतो;*
        *जो "स्वत:ला" विसरून*
   *इतरांना "आनंदित" करतो…...*
*"समजणं" आणि "समजुन" घेणं*
      *यात खुप फरक आहे...*
*समजण्यासाठी "बुध्दी" लागतेआणि*
    *समजुन घेण्यासाठी "मन"...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

09. *✿ जागतिक भूगोल ✿*
     ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
🔸सर्वात मोठा पुतळा :~
 *हैदराबाद येथील हुसेनसागर तलावातील भगवान बुद्धाचा पुतळा, वजन सुमारे 350 टन, इंची 17.2मी.*

🔸सर्वात लांब भिंत :~
 *चीनची भिंत 3500 कि.मी..*

🔸सर्वात मोठा नियोक्ता :~
*भारतीय रेल्वे - सुमारे 16.5 लाख कर्मचारी..*

🔸सर्वात मोठी बँक :~
 *वर्ल्ड बँक, वॉशिंग्टन..*

🔸सर्वाधिक शाखा असणारी बँक :~ *भारतीय स्टेट बँक..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

09.    *❒ युरी गागारिन ❒*
     ┄─┅•●●★◆★●●•┅─┄
*🔹जन्म :~ ९ मार्च १९३४*
🔸मृत्यू :~ २७ मार्च १९६८

   *♦युरी अलेक्सेइविच गागारिन*

   🔷  हा सोवियेत संघाचा अंतराळयात्री होता. युरीचा जन्म सोवियत संघाच्या ग्रामीण भागातील एका गरीब कुटंबात झाला. घरच्या परिस्थितीमुळे लहान वयातच धातूच्या ओतकामाच्या कारखान्यात फाउण्ड्रीमन म्हणून युरी काम करू लागला. अविश्रांत कष्ट आणि तीव्र बुद्धिमत्ता असल्याने एक चांगला कामगार म्हणून युरीचे नाव झाले. त्याला विमानाच्या कारखान्यात नोकरीची संधी आली. याही कामात त्याने मेहनत घेऊन नाव कमावल्याने त्याला विमानदलात घेण्यात आले. हळूहळू युरीला अंतराळवीर होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.

  🔶  १२ एप्रिल १९६१ रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने ८९ तास ३४ मिनिटे भ्रमण केले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. त्यात ऑनर ऑफ लेनिन आणि सोवियत संघाचा नायक या पुरस्कारांचाही समावेश आहे.

  🔷  वयाच्या ३४ व्या वर्षी एका विमान अपघातात युरीचा मृत्यु झाला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ शनिवार ~ 09/03/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment