"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*09/09/19 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━


*❁ दिनांक :~ 09/09/2019 ❁*

      *🔘 वार ~ सोमवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*


   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀


     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀


    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗


http://satishborkhade.blogspot.com/

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲◆🇸◆🇵●═━━


 🍥 *09. सप्टेंबर:: सोमवार* 🍥

 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
              भाद्रपद शु. ११
      तिथी : शुक्ल पक्ष एकादशी,
            नक्षत्र : पूर्वाषाढ़ा,
   योग : सौभाग्य, करण : वणिज,
सूर्योदय : 06:25, सूर्यास्त : 18:46,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]     ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━


09. *आशा ही उत्साहाची जननी आहे.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


09. *उंटावरून शेळ्या हाकणे –*

            ★ अर्थ ::~
   आळस, हलगर्जीपणा करणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


09.  *विनयात् याति पात्रताम् ।*

   ⭐अर्थ :: ~ नम्रतेमुळे पात्रता येते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


  🛡 *★ 09. सप्टेंबर ★* 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ ताजिकिस्तानचा स्वातंत्र्य दिन
★ हा या वर्षातील २५२ वा (लीप वर्षातील २५३ वा) दिवस आहे.


        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००९ : ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी ’दुबई मेट्रो’चे उद्‍घाटन झाले.
●१९९७ : सात वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसे याला बुद्धिबळातील सर्वोच्‍च असा ’ग्रँडमास्टर’ किताब देण्याची घोषणा जागतिक बुद्धिबळ महासंघाने केली.
●१९८५ : मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसर्‍यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करुन विक्रम केला.


      ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~

 🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९७४:कॅप्टन विक्रम बत्रा --भारतीय सेनादलातील एक अधिकारी होते.
◆१९५० : श्रीधर फडके – संगीतकार
◆१९०९ : लीला चिटणीस – अभिनेत्री
◆१९१० : नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती 
◆१८५० : भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक,
◆१८२८ : लिओ टॉलस्टॉय – रशियन लेखक


    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : व्हर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील ’धवल क्रांती’चे जनक, ’अमूल’चे संस्थापक, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते
●२०१० : वसंत नीलकंठ गुप्ते – समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक
●१९९७ : आर. एस. भट – ’युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया’चे पहिले अध्यक्ष
●१९७६ : माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार, मुत्सद्दी, मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


09.  *✸ बहु असोत सुंदर ✸*

     ●●●●●००००००●●●●●
बहु असोत सुंदर संपन्‍न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा


गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे

आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथले तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा


प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरें

सद्‍भावांचीच भव्य दिव्य आगरें
रत्‍नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा


नग्‍न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे

चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवें स्वार जेथले
भासत शतगुणित जरी असति एकले
यन्‍नामा परिसुनि रिपु शमितबल अहा


विक्रम वैराग्य एक जागि नांदती

जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा


गीत मराठ्यांचे श्रवणीं मुखीं असो

स्फूर्ति दीप्‍ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनिं लेखनींहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


09.  *❂ गोकुळिचा राजा ❂*

       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
गोकुळिचा राजा,माझा गोकुळिचा राजा


देवकिनंदन श्याम सुलोचन

गोपगड्यांसह खेळे हासुन
लेवुनि पानफुलांच्या साजा


वाम बाहुवर कपोल डावा

अधरि आडवा धरितो पावा
मोहन कुंजविहारी माझा


यमुनातीरी उभ्या गौळणी

रूप घेति ते नयनी भरुनी
सोडुनि जलभरणाच्या काजा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


09.  *❃❝ सत्कार्य ❞❃*

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    संत राबिया रोज पक्ष्यांना धान्याचे दाणे टाकीत असत. हा त्यांचा रोजचा नियम होता. उर्वरित वेळेत त्या अध्ययन आणि अध्यात्मिक चर्चा करीत असत. एके दिवशी त्या सकाळी कबुतरांना दाणे टाकीत असताना, पाच-सहा तरुण तेथे फिरत फिरत आले आणि संत राबिया यांच्याजवळ येऊन उभे राहिले. संत राबियानी त्याच्यांकडे पाहून स्मितहास्य केले आणि नंतर मोठ्याने हसू लागली. ती का हसते? हे त्या तरुणांना कळले नाही. त्यांनी तिच्याजवळ तिच्या हसण्याचे कारण विचारले असता ती म्हणाली,"मी यामुळे हसले कारण या धरतीवर तुमच्यासारखे सजलेले, सुंदर आणि बलशाली तरुण आहेत. ती धरतीमाता किती भाग्यशाली आहे. माझे हसू हे देवाप्रती आभाराचे आहेत."


     हे ऐकून ते तरुण तिथेच उभे राहिले. राबियांचे कबुतराला दाणे टाकण्याचे कामही चालूच होते. त्या त्यांच्या कामात मग्न होत्या. मग काही वेळाने त्या रडू लागल्या. तरुणांना कळेना कि काही वेळापूर्वी हसणारी हि स्त्री अचानक का बरे रडू लागली. ते त्यांच्याजवळ गेले व पुन्हा त्यांना रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी राबिया त्यांना म्हणाल्या," आधी मी हसले होते धरतीवर किती बलशाली तरुण आहेत पण हे तरुण त्यांच्या इच्छाशक्तीचा, बलाचा वापर सेवेसाठी करत नाहीत.



     तरुणांनी या बलाचा वापर जर सृजनासाठी केला तर जगाचे किती कल्याण होईल. असे होत नाही आणि त्यांची बुद्धी त्यांना हे करण्याची का प्रेरणा देत नाही या गोष्टीने मला रडू आले." तरुणांना आपली चूक लक्षात आली. राबियाने त्यांना प्रेरित केले. त्यांच्याकडून सेवा करून जरी घेता आली नाही तरी तहानलेल्याना पाणी, भुकेलेल्याना अन्न आणि मायेचे दोन शब्द प्रत्येकासाठी द्यायला हवे हे त्यांना समजावले.



     *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*

   प्रत्येकाने थोडे थोडे सत्कार्य केले तर जग सुधरायला वेळ लागणार नाही. आपण एक दुसऱ्याची वाट पाहण्यात आयुष्य वाया घालत आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


09.  *"वय"* आणि *"जीवन"* यांच्यात फक्त इतकाच फरक आहे...

   जे *मित्रांविना* सरते ते *"वय"* 
           आणि ,. जे
 *मित्रांबरोबर* सरते ते *"जीवन"*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


09. *✿ जिल्हा व विशेष माहिती ✿*

        ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
●बुलढाणा जिल्ह्य़ात-
    ::~ लोणार सरोवर .


●अकोला जिल्ह्य़ात -

    ::~ औष्णिक विद्युतकेंद्र


●वाशिम जिल्ह्य़ात -

    ::~ बालाजी मंदिर 


●अमरावती जिल्ह्य़ात -

    ::~ गाडगेबाबाची समाधी स्थान 


●यवतमाळ जिल्ह्य़ात -

    ::~ कळंब येथील प्राचीन शिलालेख
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


09. *❒ ♦विक्रम बत्रा♦ ❒* 

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
◆टोपणनाव :~ शेरशाह
*●जन्म :~ ९ सप्टेंबर, १९७४*
●मृत्यू :~ ७ जुलै, १९९९ (वय २४)
◆लढाया व युद्धे :~ कारगिल युद्ध
◆पुरस्कार :~ परमवीरचक्र


         *★ कॅप्टन विक्रम बत्रा ★*

  🔹हे भारतीय सेनादलातील एक अधिकारी होते. ६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात पॉइंट ५१४०, पॉइंट ४८७५, कारगिल (काश्मीर) येथील कारवाई दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला. ते भारतीय स्थल सेनेतील १३ वी बटालियन, जम्मू काश्मीर रायफल्स मध्ये कॅप्टन पदावरील अधिकारी होते.


        *विक्रम बत्रा यांचे काही निवडक उद्गार*

   🔸बत्रा यांचे युद्धभूमीवरील शेवटचे उद्गार होते - जय माता दी !
बत्रा यांचे पेप्सीचे घोषवाक्य ये दिल माँगे मोर ! भारतभर खूपच गाजले व हे वाक्य भारतीय देशभक्ती व वीरतेच्या अदम्य भावनेचे प्रतीक बनून राहिले व आजही आहे.
   🔹विक्रम जेव्हा पॉइंट ५१४० ला पोहोचले तेव्हा शत्रू कमांडरशी झालेल्या रेडियो संभाषणात शत्रू कमांडर म्हणाला, तू का आला आहेस, शेर शहा? (शेर शहा हे विक्रम यांचे सैन्यातील टोपणनाव होय) तू आता मागे जाऊ शकत नाहीस. त्यावेळी विक्रम यांनी प्रत्युत्तर दिले, आपण एका तासात पाहूच, वरती (शिखरावर) कोण उरते.
    🔸जखमी झालेल्या लेफ्टनंट नवनीत यांना सुरक्षित ठिकाणी आणताना लेफ्टनंट यांनी विक्रम यांच्यासमोर जखमी अवस्थेतही लढण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा विक्रम म्हणाले, तुमची बायकामुले घरी आहेत, त्यामुळे तुम्ही मागे हटा; मी आहे. बत्रा यांचे एक प्रसिद्ध वाक्य म्हणजे एकतर तिरंगा फडकवून येईन नाहीतर तिरंगा लपेटून येईन (शहीद होऊन) पण नक्की येईन.
    🔹एका पाकिस्तान्याने एकदा असा टोमणा मारला की जर तुम्ही माधुरी दीक्षित आम्हाला दिलीत तर आम्ही काश्मिरमधून निघून जाऊ. त्यावर विक्रमनी त्याला एक गोळी घालून मारून टाकले व म्हणाले, फ्रॉम माधुरी, विथ लव्ह.
      ◆चित्रपटात कारगिल युद्ध◆
  🔸२००३ साली प्रदर्शित झालेल्या एलओसी कारगिल या कारगिल युद्धावरील चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन याने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌


 *❁सोमवार ~ 09/09/2019❁*

*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment