"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*12/04/19 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 12/04/2019 ❁*
      *🔘 वार ~ शुक्रवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

  🍥 *12. एप्रिल:: शुक्रवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             चैत्र शु. ७
     तिथी : शुक्ल पक्ष सप्तमी,
           नक्षत्र : आर्द्रा,
  योग : अतिगंड, करण : वणीज,
सूर्योदय : 06:24, सूर्यास्त : 18:55,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

12. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

12.*करावे तसे भरावे*
         *★ अर्थ ::~* 
   आपण जशी कृती करतो तसे त्याचे आपल्याला फळ मिळते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

12. *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
           ⭐अर्थ ::~
 क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

     🛡 *★12. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील १०२ वा (लीप वर्षातील १०३ वा) दिवस आहे.

    ~*★महत्त्वाच्या घटना★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : गेल्या शतकातील साठच्या दशकात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणारे सी. सुब्रम्हण्यम यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान
●१९९७ : पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.
●१९६१ : रशियाचा युरी गागारिन हा अंतराळात भ्रमण करणारा पहिला मानव बनला. त्याने अंतराळात १०८ मिनिटे भ्रमण करुन पृथ्वीप्रदक्षिणा केली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५४ : सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार
◆१९४३ : सुमित्रा महाजन – केंद्रीय मंत्री
◆१९१० : पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक
◆१८७१ : वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००६ : राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक
●२००१ : देवांग मेहता– भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष ऑस्ट्रेलियात निधन
●१९४५ : फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष
●१९०६ : महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्‍न’ भट्टाचार्य
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

12. *✸ उषःकाल होता होता ✸*
       ●●●●●००००००●●●●●
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !

आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी ?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तोच दंश करिती आम्हां साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हांवरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली !

अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !

उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !
कसे पुण्य दुर्दैवी अन्‌ पाप भाग्यशाली !

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेंच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

12. *❂ असो तुला देवा माझा ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥

तुझ्या कृपेने रे होतील फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥

तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥

तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरी मिळेल
तरी प्रभो ! शतजन्मांची मतृषा शमेल
तुझे म्हणुनी आलो राया ! बघत बघत दार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

12.  *❃❝ अतिमोह ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     एकदा एका उंदराला काहीही खायला न मिळाल्यामुळे एका बंद खोलीत एका झरोक्यातून गेला. त्याला तिथेसुध्दा खायला काहीही दिसले नाही. शेवटी एका कोपर्यात एक टोपली दिसली. उंदराला वाटले की,या टोपलीत काही तरी खायला असेल. पण ती टोपली उघडेनाच. इतक्यात तिथे एक ब्रेडचा तुकडा घेऊन दुसरा उंदीर तिथे आला. पहिला उंदीर त्याला म्हणाला, बरं झालं बुवा तू ब्रेड आणलास ते. मला खूप भूक लागलीय. आपण दोघे मिळून खाऊया. दुसरा उंदीर म्हणाला ठीक आहे. दोघांनी तो ब्रेड वाटून घेतला. पण थोड्या वेळाने पहिल्या उंदराला काही शांत बसवेना. तो म्हणाला, ही टोपली उघडत नाही. आपण दोघे मिळून कुरतडू. दुसरा उंदीर म्हणाला,मी आहे त्यात समाधानी आहे. सकाळ होताच आपण दुसरे अन्न शोधू. राहू दे त्या टोपलीला कुरतडायचे. पण पहिल्या उंदराला ते काही पटले नाही. तो टोपली कुरतडू लागला. ते पाहून दुसरा उंदीर निघून गेला. सकाळ होईपर्यंत त्या टोपलीला बरेच कुरतडले. उंदराला वाटले की,आतमध्ये भरपूर अन्न असेल. आपल्याला बरेच दिवस मिळेल. इतक्यात त्यातून एक मोठा भुकेलेला साप आला आणि त्याने उंदरालाच खाऊन टाकले.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  काही काही वेळा अतिमोहापायी स्वत:चा प्राणही गमवावा लागतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

12. *श्रीकृष्णाने खुप मोठी गोष्ट सांगितली आहे..*
      *जर तुम्ही धर्म कराल,तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

12.   *✿ वैज्ञानिक प्रश्न ✿*
     ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
▶ ‘ *अ*’ जीवनसत्त्वा अभावी रातांधळेपणा होतो.

▶  *‘ड*’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व सुद्धा म्हणतात.

▶  *‘क*’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अ‍ॅस्कॉरबीक अ‍ॅसिड’ शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविते.

▶ *आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते*.

▶ *मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम दुधाची आवश्यकता असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

12. *❒ छत्रपती शाहूराजे भोसले ❒*
       ┄─┅•●●★◆★●●•┅─
●अधिकारकाळ :~ १७०७ - १७४९
●राज्याभिषेक :~ १७०७
●राज्यव्याप्ती :~ महाराष्ट्र, कोकण,
दक्षिण भारत, उत्तर भारत मध्य भारत आणि बहुतांश भारताचा भाग
●राजधानी :~ सातारा
●पूर्णनाव :~ शाहूराजे संभाजीराजे भोसले
◆जन्म :~ १८ मे १६८२
             माणगाव , सातारा ,
◆मृत्यू :~ १५ डिसेंबर १७४९, सातारा

     ★छत्रपती शाहूराजे भोसले★
  भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला.सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले.मध्य भारत,उत्तर भारत,माळवा,गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले,मुघल
 साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ शुक्रवार ~ 12/04/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment