"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*14/09/24 शनिवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *14. सप्टेंबर:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
भाद्रपद शु.११, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~एकादशी, नक्षत्र ~उत्तराषाढा,
योग ~शोभन, करण ~वणिज,
सूर्योदय-06:25 सूर्यास्त-18:41,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

14. *शिकणार्‍याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

14. *बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर*
          ★ अर्थ ::~
दोनपैकी एक पर्याय निवडणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

14.   *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
              ⭐अर्थ :: ~
     क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

  🛡 *★ 14. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हिन्दी भाषा दिन
★ हा या वर्षातील २५७ वा (लीप वर्षातील २५८ वा) दिवस आहे.

  ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९६० : ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कन्ट्रीज’  (OPEC) ची स्थापना झाली.
●१९५९ : सोव्हियेत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.
●१८९३ : सरदार खाजवीवाले, श्री. गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले. लोकमान्य टिळकांनी हा उपक्रम उचलून धरून त्याला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरुप दिले. हीच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात होय.

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३२ : डॉ. काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते
◆१९२३ : राम जेठमलानी – केन्द्रीय कायदामंत्री, कायदेपंडीत
◆१९२१ : दर्शनसिंहजी महाराज – शिख संतकवी, त्यांना ऊद्रू अकादमीचे पुरस्कार मिळाले.
◆१९०१ : यमुनाबाई हिर्लेकर – शिक्षणतज्ञ व विचारवंत
◆१८६७ : विष्णू नरसिंह जोग – वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : हरिश्चंद्र बिराजदार – कुस्तीगीर व प्रशिक्षक
●१९९८ : प्रा. राम जोशी – शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू
●१९८९ : बेन्जामिन पिअरी पाल – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक, पद्मश्री, पद्मभूषण  व अधिक उत्पादन देणार्‍या गव्हाच्या जाती त्यांनी शोधून काढल्या.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

14. *✸ उभवू उंच निशाण ✸*
   ●●●●००००००●●●●
उभवू उंच निशाण !
नव्या युगाचे नव्या जगाचे, उभवू उंच निशाण !

दीन दीन जे, दलित दलित जे
त्या सर्वांना ध्वज हा देईल सदैव छाया छान
उभवू उंच निशाण !

अंध अमानुष रूढी घालिती अखंड जगी थैमान
त्या क्रुरांना हे क्रांतिचे मूर्तिमंत अव्हान
ताठ ठेविती मान झुंजुनी भीमदेव धीमान्‌
शूर शिपाई आम्ही त्यांचे व्यर्थ न ते बलिदान

ध्वज मिरवीत हा गौतम गेले टाकूनी राज्य महान
पुसुनी आसवें मानवतेची होती बुद्ध महान
हे समतेचे, हे ममतेचे, गांधीजीचे गान
हरिजन धरुनी उरी स्वीकरी जे फकिरीचे वाण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

14. *❂ गगनसदन तेजोमय ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
गगनसदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश देई अभय

छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वार्‍यातून तार्‍यांतुन
वाचले तुझेच नाम
जगजीवन जनन-मरण
हे तुझेच रूप सदय

वासंतिक कुसुमांतून
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतुन
प्रेमरूप भासतोस
कधि येशील चपलचरण
वाहिले तुलाच हृदय

भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ
भावमधुर गीत नवे
सकलशरण मनमोहन
सृजन तूच, तूच विलय
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

14.  *❃ स्वतःला ओळखा ❃*
  ━═•●◆●★★●◆●•═━         
        स्वामी विवेकानंद आपल्या भाषणामध्ये नेहमी सांगत असलेली ही गोष्ट.
        
       एकदा एका जंगला मध्ये एक वाघच पिल्लू वाघिणी पासून हरवले आणि मेंढ्यांच्या कळपात जावून मिसळले.
       हळू हळू ते पिल्लू त्या कळपातच वाढू लागले आणि तिथेच मोठे झाले. ते पिलू मेंढ्या प्रमाणेच गवत खायचे, बे बे करायचे, आणि भीती वाटली कि पळून जायचे.

      त्याच्या सुदैवाने एक दिवस त्याची दुसऱ्या वाघाशी भेट झाली तेव्हा त्याला कळले की तो एक शक्तिशाली वाघ आहे.
      तेव्हा पासून त्याचे बे बे करणे, गवत खाणे, भीतीने पळून जाणे बंद झाले.

         🌀❝ तात्पर्य ❞ ::~ 
   स्वतःला ओळखा, प्रत्येक व्यक्ती मध्ये प्रचंड शक्ती आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

14.  *दिवा बोलत नाही त्याचा*
*प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही...*

     *स्वतःविषयी काहिच बोलु नका, उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

14.    *सामान्यज्ञान प्रश्नावली*
  ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
1⃣ स्थानिक स्वराज्य संथेचे जनक कोणास म्हणतात ?
  ➜ *लार्ड रिपन*

2⃣ मराठी वृत्तसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?
  ➜ *आचार्य बालशास्री जांभेकर*

3⃣ भारतीय अंतराळ संसोधन कार्यकर्माचे जनक कोणास म्हणतात ?
   ➜ *विक्रम साराभाई*

4⃣ भारताच्या अणु विज्ञानाचे जनक कोणास म्हणतात ?
  ➜ *डॉ होमी भाभा*

5⃣ आधुनिक भारताचे शिल्पकार कोणास म्हणतात ?
  ➜ *पंड़ित जवाहरलाल नेहरू*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

14. *❒ एम. एस. सुब्बलक्ष्मी ❒* 
  ━═•●◆●★★●◆●•═━
🔸कर्नाटक संगीतातील ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांचा भारताच्या सत्तराव्या स्वातंत्र्य दिनी ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या मैफलीने सन्मान करण्यात येणार आहे.
    सुब्बलक्ष्मी यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली असून त्यानिमित्त भारताच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी दूतावासाने छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
 चेन्नईस्थित शंकरा नेत्रालय या संस्थेच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 तसेच 1966 मध्ये सुब्बलक्ष्मी यांना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे गायन सादरीकरणाचे निमंत्रण देण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने राष्ट्रसंघातील सदस्यांसह जगाला मोहित करून टाकले होते.
 एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंचावर आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी लाभणारे रेहमान हे दुसरे भारतीय संगीतकार आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
         *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁शनिवार ~14/09/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment