"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*16/11/24 शनिवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *16. नोव्हेंबर:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
कार्तिक कृ.१, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~कृत्तिका,
योग ~परिघ, करण ~बालव,
सूर्योदय-06:45, सूर्यास्त-18:00,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

16. जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

16. *ज्ञानमेव शक्तिः ।*
           ⭐अर्थ ::~
     ज्ञान हीच खरी शक्ती आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

16. *ज्ञानमेव शक्तिः ।*
           ⭐अर्थ ::~
     ज्ञान हीच खरी शक्ती आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

   🛡 ★ 16. नोव्हेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ राष्ट्रीय पत्रकारिता दिन
★ हा या वर्षातील ३२० वा (लीप वर्षातील ३२१ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास ’भारतरत्‍न’ हा भारतातील सर्वोच्‍च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.
●१९९६ : कोकण रेल्वेच्या रत्‍नागिरी - मुंबई मार्गाचा शुभारंभ
●१९४५ : युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
●१९१५ : लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.

  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७३ : पुल्लेला गोपीचंद – बॅडमिंटनपटू
◆१९६३ : मिनाक्षी शेषाद्री – अभिनेत्री
◆१९३० : मिहिर सेन – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय
◆१९२७ : डॉ. श्रीराम लागू – ’नटसम्राट’,  दोन दशके रंगभूमी गाजवणारे, मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००६ : मिल्टन फ्रीडमन – नोबेल पारितोषिकविजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ
●१९५० : डॉ. बॉब स्मिथ – ’अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस’चे एक संस्थापक
●१९१५ : गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

16. *✸ चढवू गगनि निशाण✸*
    ●●●●००००००●●●●
चढवू गगनि निशाण आमुचे, चढवू गगनि निशाण
कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्‍तान

निशाण अमुचे मनःक्रांतिचे, समतेचे अन्‌ विश्वशांतिचे
स्वस्तिचिन्ह हे युगायुगांचे ऋषिमुख-तेज महान

मूठ न सोडू जरि तुटला कर, गाऊ फासहि आवळला जर
ठेवू निर्भय ताठ मान ही झाले जरि शिरकाण

साहू शस्‍त्रास्‍त्रांचा पाउस, आम्ही प्रल्हादाचे वारस
सत्य विदारक आणू भूवर दुभंगून पाषाण

विराटशक्ती आम्ही वामन, वाण आमुचे दलितोद्धारण
नमवू बळिचा किरीट उद्धट ठेवुनि पादत्राण

हिमालयासम अमुचा नेता, अजातशत्रू आत्मविजेता
नामे त्याच्या मृत्युंजय हे चढवू वरति निशाण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

16. *❂ सरस्वती वंदना ❂*
   ━━═●✶✹★✹✶●═━━
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वींणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपदमासना॥
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।
सा माम पातु सरस्वती भगवती
निःशेषजाड्याऽपहा॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

16.  *❃❝ एकाग्रता ❞❃*
     ━═•●◆●★★●◆●•═━
    *एकदा एक स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करत होते*. ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणार्‍या अंड्याच्या टरफलावर बंदुकीने नेम साधण्याचा प्रयत्न करत होती. पाण्यामुळे ती टरफले वर-खाली होत होती. मुलांना त्यांच्यापैकी एकही टरफलावर नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळेला बंदूक झाडली पण प्रत्येकवेळी त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांच्याकडे बराच वेळ स्वामीजींचे लक्ष होते. मुलेही हे पाहत होती. मुलांनी स्वामीजींना म्हटले," तुम्ही नुसतेच आमच्याकडे काय पाहत आहात? का आम्हाला नेम धरता येत नाही असे तुम्हाला वाटते? आणि असे असेल तर तुम्ही नेम धरून ती टरफले फोडून दाखवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक चांगले जमते असे वाटते का?" स्वामीजी हसले आणि म्हणाले," मी प्रयत्न करून पाहतो." मुले म्हणाली," तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाहीये." स्वामीजींनी बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या अंड्याच्या टरफलावर नेम धरला, काही मिनिटे निश्चल राहिले, मग त्यांनी बंदूक चालवली, त्यांनी बारावेळा गोळ्या झाडल्या आणि बारावेळेला अंड्यांची टरफले उडविण्यात स्वामीजींना यश आले. त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले,"एखादा माणूस पाण्यातील वाहणार्‍या अंड्याच्या टरफलावर इतका अचूक कसा नेम साधू शकतो?" असा प्रश्न त्यांना पडला. स्वामीजींनी मुलांच्या मनातील हे ओळखले, त्‍यांना ती मुले आवडली होती. ते म्‍हणाले,’’ जे काही तुम्‍ही करत होता त्‍यावर तुमचं मन एकाग्र करा. नेमबाजी करा किंवा अन्‍य काही. तुमचं लक्ष फक्त लक्ष्‍यावरच पाहिजे. तुमचा नेम कधीच चुकणार नाही. एकाग्रतेने बरेच काही साध्‍य करता येते. अवघड वाटणा-या गोष्टीसुद्धा या एकाग्रतेने सहजसाध्‍य होतात.’’ मुले स्‍वामींजींपुढे नतमस्‍तक झाली.

         *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    ध्येय प्राप्ती साठी एकाग्रता फार महत्वाची आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

16.  *चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..*
    आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास...*
    *म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..*
    निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं.....

    *"जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल...*
    *या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण*
    *जीवन जगण्याची कला शिकवून जाईल...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  मानवी शरीरात एकूण किती इंद्रीय संस्था कार्यरत असतात ?
  ➜ नऊ.

✪  सायनोसाटिस हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवांशी संबंधित आहे ?
  ➜ नाक.

✪  खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
  ➜ क्षय.

✪  विषमज्वराच्या आजारात कोणते औषध दिले जाते ?
  ➜ क्लोरोमायसीटिन.

✪  बहुधा दुधातून पसरणारा रोग कोणता ?
  ➜ कावीळ.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ व्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

26.*❒ ♦लाला लजपत राय♦ ❒* 
     ━━•●◆●★●◆●•═━
●जन्म :~ २८ जानेवारी १८६५
●मृत्यू :~  १७ नोव्हेंबर १९२८

           ★ लाला लजपत राय ★
   हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात.

    लाल, बाल आणि पाल या त्रिकूटातले हे लाल. लाला लजपत राय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल यांना लाल-बाल-पाल म्हणत.

     लाला लजपतराय हे खुप मोठे क्रांतीकारक होते. यांनी गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात आपली महत्वपुर्ण भुमिका बजावली. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील लाल - बाल - पाल या तीन प्रमुख नायकांपैकी ते एक होते. या त्रिकोणातील प्रसिध्द लाला लजपतराय केवळ एक निस्सिम देशभक्त, शुर स्वातंत्र्य सैनिक आणि एक चांगले नेताच होते असे नव्हें तर एक उत्तम लेखक, वकील, समाजसुधारक देखील होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁शनिवार ~ 16/11/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment