"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*17/04/24 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *17. एप्रिल:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
चैत्र शु.9, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~नवमी , नक्षत्र ~आश्लेषा,
योग ~शूल, करण ~कौलव,
सूर्योदय-06:19, सूर्यास्त-18:56,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

17. *आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

17. *काकडीची चोरी फाशीची शिक्षा*   *★ अर्थ ::~*  - लहानशा अपराधासाठी फार मोठी शिक्षा होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

17. *ज्ञानमेव शक्तिः ।*
           ⭐अर्थ ::~
     ज्ञान हीच खरी शक्ती आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

    🛡 *★17. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक हेमोफिलिया दिवस
★ हा या वर्षातील १०७ वा (लीप वर्षातील १०८ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजी मधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला ’माल्कम - आदिशेषय्या पुरस्कार’ जाहीर
●: ’अपोलो-१३’ हे अंतराळयान चांद्रमोहीम अर्ध्यावर सोडून सुखरुप पृथ्वीवर परतले.
●१९५२ : पहिली लोकसभा अस्तित्त्वात आली.

  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६१ : गीत सेठी – बिलीयर्डसपटू
◆१९१६ : सिरीमाओ बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान.
◆१८९१ : यशवंत रामकृष्ण दाते – कोशकार. चिं. ग. कर्वे यांच्या साहाय्‍याने त्यांनी ’महाराष्ट्र मंडळ कोश’ स्थापन करून आठ खंडांचा ’महाराष्ट्र शब्दकोश’ तयार केला.
◆१४७८ : संत सूरदास – हिन्दी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य

     ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : विनायक आदिनाथ तथा ’वि. आ.’ बुवा – विनोदी साहित्यिक
●१९७५ : *डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन* – भारताचे दुसरे राष्ट्रपती, पहिले उपराष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ,
●१९४६ : व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री – कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष आणि इंग्रजी वक्ते
●१७९० : बेंजामिन फ्रँकलिन – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

17.      *✸ भारत माझा ✸*
       ●●●●●००००००●●●●● 
भारत सुंदर माझा,
स्वप्नातल्या स्वर्गापरी,
अभिमान मज त्याचा,
जन्मलो मी या भूवरी।

      भेदभाव ना कोणता,
      धर्म,पंथ विविधता,
      एकोप्याचा वाहे झरा,
      सर्वधर्म सहिष्णूता।

भारत माझा हा देश,
पाईक मी हो त्याचा,
राष्ट्रभक्ती हृदयी माझ्या,
राखे मान तिरंग्याचा।

      जगात सुंदर देश,
      हा माझा आहे भारत,
      संस्कृतीने भारताच्या,
      जग सारे प्रभावित ।
                  ~अर्चना वासेकर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

17.  *❂ गोकुळिचा राजा ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
गोकुळिचा राजा,माझा गोकुळिचा राजा

देवकिनंदन श्याम सुलोचन
गोपगड्यांसह खेळे हासुन
लेवुनि पानफुलांच्या साजा

वाम बाहुवर कपोल डावा
अधरि आडवा धरितो पावा
मोहन कुंजविहारी माझा

यमुनातीरी उभ्या गौळणी
रूप घेति ते नयनी भरुनी
सोडुनि जलभरणाच्या काजा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

17.  *❃❝ बढाई नको रे बाबा.. ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, 'मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.' ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, 'अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.' हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   आपण पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

17. लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी.
आपली एक चूक कारणीभूत ठरते
     ते दिशाहीन करण्यासाठी...

    किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी....

    *क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

17. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  संगमनेर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
➜ प्रवरा.

✪  मनप्रित सिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
➜ कबड्डी.

✪  २०११ - २०१२ हे वर्ष भारतात कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात आले ?
➜ जर्मन वर्ष.

✪  राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
➜ ८ जुलै.

✪  बिल गेट्स हे नाव कोणत्या संगणक प्रणालीशी जोडलेले आहे ?
➜ विंडोज
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

17. ❒डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन❒
       ─┅━━●●★◆★●●━━┅─
      २ रे भारतीय राष्ट्रपती
             ~ कार्यकाळ ~
( १३ मे १९६२ – १३ मे १९६७ )

●जन्म :~ ५ सप्टेंबर १८८८
तिरुत्तनी, तमिळनाडू, दक्षिण भारत
*●मृत्यू :~ १७ एप्रिल १९७५*

     सर्वपल्ली राधाकृष्णन' हे भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ हाते. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई (मद्रास) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृषणन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात "शिक्षक-दिन" म्हणून साजरा केला जातो.

      पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्‌वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरील ब्रिटिश सत्ताकाळातला महत्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठानेत्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
         *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁बुधवार ~17/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment