"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*17/09/24 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *17. सप्टेंबर:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
भाद्रपद शु.१४, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~चतुर्दशी, नक्षत्र ~शतभिषज,
योग ~धृति, करण ~वणिज,
सूर्योदय-06:26, सूर्यास्त-18:38,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣━┅━

17. *तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

17. *डोंगर पोखरून उंदीर कढणे*
              *★ अर्थ ::~*
जास्त श्रम करून कमी फायदा होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

17.  *विनयात् याति पात्रताम् ।*
⭐अर्थ :: ~ नम्रतेमुळे पात्रता येते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

🛡 *★ 17. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ राष्ट्रीय श्रम दिवस
★ हा या वर्षातील २६० वा (लीप वर्षातील २६१ वा) दिवस आहे.

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पुन्हा सुरू झाले.
●१९८३ : वनीसा विल्यम्स ’मिस अमेरिका’ बनणारी पहिली कृष्णवर्णीय स्त्री ठरली.
●१९४८ : हैदराबादच्या निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५० : *नरेन्द्र मोदी – गुजरातचे मुख्यमंत्री, भारतीय पंतप्रधान*
◆१९३० : लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक
◆१९२९ : अनंत पै ऊर्फ ’अंकल पै’ – ’अमर चित्र कथा’ चे जनक
◆१९०६ : ज्युनिअस जयवर्धने – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
◆१८८५ : केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे – पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते
◆१८८२ : अवंतिकाबाई गोखले – महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – कवी व संगीतकार
●१९९९ : हसरत जयपुरी – गीतकार
●१९९४ : व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू
●१८७७ : हेन्‍री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅═▣◆★✧★◆▣═┅━

17.  *✸ हा देश माझा..!! ✸*
●●●●००००००●●●●
हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे ll धृ ll

हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा 
ह्या गंगा, यमुना, शेती, धरती, बागबगीचा माझा 
अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता 
या मरण द्यावया, स्फुरण आपल्या बाहू पावू द्या रे ll १ ll

जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला 
रोखा ते, लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला 
हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात 
सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहिसा अर्थही येऊ द्या रे ll २ ll

जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी, फुंका रे एक तुतारी
संदेह रोष जे, द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे ! ll ३ ll
हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे ..!"
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

17. *❂ तुला आळवीता जीवन ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तुला आळवीता जीवन सरावे
अनंता तुझे रूप नेत्री भरावे

तुझे नाम ओठी, तुझा ध्यास चित्ती
तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती
तुला अर्पितो ही पुजा भक्तीभावे

तुझ्यावीण आम्हां नसे कोण त्राता
अनाथास तू नाथ, तू विघ्‍नहर्ता
तुला संकटी मी सदाही स्मरावे

जगन्‍नायका रे नको अंत पाहू
मना मोही माया, किती काळ साहू
निराकार हे रूप साकार व्हावे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

17.  *❃❝ बोका आणि कोल्हा ❞❃*
  ━━•●◆●★★●◆●•═━
    एका अरण्यातील झाडाखाली एक बोका व एक कोल्हा बोलत बसले होते. कोल्हा म्हणाला, 'अरे बोकोबा, कदाचित आपल्यावर जर एखादं संकट आलं तर हजार युक्त्या करून मी त्यातून निभावून जाईन पण तुझं कसं होईल याची मला काळजी वाटते.'
       बोका म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एकच युक्ती माहीत आहे. तेवढी चुकली तर मात्र माझी काही धडगत नाही. कोल्हा म्हणाला, 'बाबा रे, तुझी मला फारच काळजी वाटते. अरे, एक दोन युक्त्या मी शिकवल्या असत्या पण आजचा काळ असा आहे की ज्यानं त्यानं आपल्या स्वतःपुरतं पहावं. दुसर्‍याच्या उठाठेवी करू नयेत. बरं तर येतो मी. रामराम !'
       इतके बोलून कोल्हा निघाला तोच मागून शिकार्‍याची कुत्री धावत आली. बोक्याला झाडावर चढता येत असल्याने तो पटकन् झाडावर चढला. पण कोल्ह्याच्या हजार युक्त्यांपैकी एकही त्याच्या उपयोगी पडली नाही. तो घाबरून थोडसा पुढे पळत नाही तोच शिकारी कुत्र्यांनी त्याला पकडले.

        *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   एखाद्याला एकच विद्या चांगली येत असेल तर तिच्यामुळे जे काम होईल ते अनेक अपुर्‍या विद्यापासून होणार नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

17. *"वेळ , मित्र आणि नाती*

ह्या अशा तीन गोष्टी आहेत की,
त्यांना किंमतीचे लेबल नसते.

   *"पण" ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते"* 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

17. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
  ➜ मध्यप्रदेश.

✪  संभाजी या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
  ➜ विश्वास पाटील.

✪  स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते ?
  ➜मौलाना अबुल कलाम आझाद.

✪  अकोला जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला ?
  ➜ वाशिम.

  ✪ श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे ?
  ➜ दुग्ध उत्पादन.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ व्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

17. *❒ ♦मा. नरेंद्र मोदी♦ ❒* 
  ━━•●◆●★★●◆●•═━
*भारताचे विद्यमान पंतप्रधान*
   ◆यांचा आज जन्म दिवस◆
          त्यानिमित्त यांना
  *हार्दिक~हार्दिक शुभेच्छा..!!*
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏

*●जन्म :~ १७ सप्टेंबर १९५०*
वडनगर, मेहसाणा जिल्हा, गुजरात

    *◆मा. नरेंद्र दामोदरदास मोदी◆*

   ♦हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि २६ मे २०१४ पासून स्वतंत्र भारताचे पंतप्रधान आहेत. ते ७ ऑक्टोबर २००१ पासून २२ मे २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते.
  *स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.*

   🔶भाजपच्या गुजरात विधानसभा २००२ ते २०१२ तसेच १९९५ व १९९८ निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पाहिला. २००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजप चे स्ट्रॅटेजिस्ट होते. मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत. गुजरात च्या विकासासाठी मोदी ओळखले जातात.  त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते.

   🔶त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी तर आईचे नाव हिराबेन आहे. या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे. मोदींनी २६ में २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या पदावर पोहोचणारे रा. स्व. संघाचे ते पहिले प्रचारक तर दुसरे स्वयंसेवक ठरले.

   🔷मोदींनी किशोर वयात आपल्या भावासमवेत चहाचे दुकान चालविले. तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच ते संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. १९९१ मध्ये कन्याकुमारी-श्रीनगर एकता यात्रेपासून त्यांचा राजकारणात उदय झाला. १९९५ मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी पाच राज्यांची जबाबदारी निभावली. २००१ ते २००२ व नंतर २००२ ते २००७ तसेच २००७ ते २०१२ या काळात गुजरातचे मुख्यमंत्री. भाजपतर्फे त्यांचे सप्टेंबर २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून घोषणा झाली.

    ♦भारतीय जनता पक्षाचे जहाल नेते नरेंद्र मोदी यांच्यासारखा साधी चहाची टपरी चालवणारा कुशाग्र बुद्धीचा व महत्त्वाकांक्षी तरुण पंतप्रधानपदाचा प्रमुख उमेदवार बनेपर्यंत मजल गाठू शकतो, हे मोदींनीच दाखवून दिले. या विकासपुरुषाचा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटावरील झपाट्याने झालेला उत्कर्ष अवाक करणारा आहे.नरेंद्र मोदी हे असे व्यक्तिमत्व आहे जे देश असो वा विदेश सर्वकडे प्रसिद्ध आहेत.

     ही व्यक्ती, साहस, करूणा आणि विश्वासाची साकार मूर्ती आहे. भारताचे नवनिर्माण करण्याच्या तसेच त्याला जगासाठी दीपस्तंभ बनवण्याच्या विश्वासापोटी भारतीयांनी त्यांना आपला जनादेश दिला.

    एखादा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला संयुक्त राष्ट्र परिषदेत जबरदस्त प्रतिसाद मिळाला. प्रथमच जगभरातील 177 देशांनी एकत्र येऊन 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र परिषदेत पारित केला.

    प्रधान मंत्री च्या रूपात नरेंद्र मोदी यांनी भारतात खूप विकास कार्य केलीत. त्यांनी अनेक विदेश दौरे करून जगातील इतर देशाना भारताच्या बाजूने वळवले. भारतात अनेक विदेशी कंपन्याचे निवेश होऊ लागले. भारतात एक पद्धतीने डिजिटल क्रांति घडून आली. अनेक क्षेत्रात भारताने प्रगती केली. 

   नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेली  आश्वासणे पूर्ण केली. यामुळेच 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनतेने पुनः एकदा त्यांना मागील निवडणुकी पेक्षा जास्त मतांनी आपले पंतप्रधान म्हणून निवडून दिले. देशात एक तऱ्हेने मोदी लहर आणि मोदी क्रांतीच येऊन गेली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁मंगळवार~17/09/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment