"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*17/11/19 रविवारचा परीपाठ*
   ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ💲🅿꧂❀*
*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर सर्व आवश्यक ज्ञानवर्धक उपयुक्त माहीतीसाठी...*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
 ━━═•●◆❃❂❃◆●•═━━

 *🍥17.नोव्हेंबर:: रविवार🍥*
 ━━═•◆❃❂❃◆•═━━
          कार्तिक कृ. ५
     तिथी : कृष्ण पक्ष पंचमी,
          नक्षत्र : पुनर्वसु,
     योग : शुभ, करण : कौलव,
सूर्योदय : 06:46, सूर्यास्त : 18:00,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
 ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

17.  *रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

17. *लहान तोंडी मोठा घास*
          *★अर्थ ::~*
  लहानाने मोठ्याला उपदेश करणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

17.   *भावे हि विद्यते देव: ।*
    ⭐अर्थ :: ~ भाव तेथे देव आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

   🛡 ★ 17. नोव्हेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन
★हा या वर्षातील ३२१ वा (लीप वर्षातील ३२२ वा) दिवस आहे.
★जागतिक अपस्मार जागरुकता दिन

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९४ : रशियाच्या ’मीर’ या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्‍या पूर्ण करून नवा विक्रम केला.
●१९९२ : महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील ’भारतीय दलित साहित्य अकादमी’ची फेलोशिप जाहीर
●१९३२ : तिसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३८ : रत्‍नाकर मतकरी – लेखक, नाटककार, निर्माते
◆१९३२ : शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला’ – लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत ​अमीट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री.
◆१७५५ : लुई (अठरावा) – फ्रान्सचा राजा जन्म

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (जन्म: २३ जानेवारी १९२६)
●१९६१ : कुसुमावती आत्माराम देशपांडे – साहित्यिक व समीक्षक,
●१९३५ : गोपाळ कृष्ण देवधर – भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य, ’सेवासदन’ या संस्थेचे शिल्पकार,
●१९३१ : हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार
●१९२८ : ’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
ొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొ
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

17. *✸ उठा राष्ट्रवीर हो ✸*
       ●●●●●००००००●●●●●
उठा राष्ट्रवीर हो
सुसज्ज व्हा उठा चला, सशस्‍त्र व्हा उठा चला
उठा राष्ट्रवीर हो

युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे
एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला
उठा उठा, चला चला

वायुपुत्र होऊनी धरू मुठीत भास्करा
होऊनी अगस्तीही पिऊन टाकू सागरा
रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या चला
उठा उठा, चला चला

चंद्रगुप्‍त वीर तो फिरुन आज आठवू
शूरता शिवाजीची नसानसांत साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा उठा, चला चला

यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती
देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला
उठा उठा, चला चला
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

17.   *✹ सावळ्या घना ✹*
    ━━═●✶✹★●★✹✶●═━━
हे सावळ्या घना
का छेडिसी मनाच्या अशा तारा पुन्हा पुन्हा

पानांतुनी या मोहुनी, गाणे जलाचे फुले
गाण्यातुनी त्या दाटुनी, झेले फुलांचे हासले
वारा हळू हा प्रीती-स्वरांनी झुलवी तृणा तृणा

थेंबापरी या नाचवी पक्षी स्मृतींचा तुरा
त्या आठवांनी भारले, माझ्या मनाच्या अंबरा
आता प्रियाची चाहूल ऐशी भुलवी कणाकणा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

17.  *❃❝ संत बहिणाबाई ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
       बहिणाबाई या विख्यात महिला संत होऊन गेल्या.एकदा त्या आपल्या बगीच्यात लावलेल्या रोपट्यांना पाणी घालत होत्या. त्यावेळी ४ विद्वान त्यांचेकडे आले आणि म्हणाले, "आम्ही या जिज्ञासेने तुमच्याकडे आलो आहोत कि आम्ही वेदांचाही अभ्यास केला आहे, विविध शास्त्रांचाही अभ्यास केला आहे. परंतु त्याचा आम्ही उपयोग करण्यास आम्ही असमर्थ आहोत. आम्ही देशाच्या प्रगतीसाठी काही तरी करू इच्छितो. जेणेकरून देशात सर्वत्र सुख,समाधान, विकास होईल. पण हे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे हे आम्हाला समजत नाही."

     बहिणाबाईनी चारही विद्वानांकडून त्यांच्या लक्ष्य प्राप्तीच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पहिला विद्वान म्हणाला, मी देशातील सर्वाना साक्षर आणि सभ्य पाहू इच्छितो, तर दुसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना सुखी आणि संपन्न करू इच्छितो" तिसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना एकत्रित करून राष्ट्रऐक्य घडवू इच्छितो" तर चौथा विद्वान म्हणाला,"मला माझा देश प्रगतीशील आणि शक्तिशाली, बलाढ्य राष्ट्र झालेला बघायची इच्छा आहे. तर आता तुम्ही आम्हाला सांगा कि आम्ही काय करू जेणेकरून आमच्या चौघांच्या प्रयत्नाने देश प्रगती करेल." बहिणाबाई म्हणाल्या,"तुम्ही चौघे मिळून शिक्षणाचा प्रसार करा." विद्वान हैराण झाले कि आपण देशाच्या प्रगतीचे बोलतो आहोत आणि बहिणाबाई शिक्षणाबद्दल बोलत आहेत हे कसे होऊ शकते. तेंव्हा त्यांची झालेली वैचारिक कोंडी जाणून बहिणाबाई म्हणाल्या,"शिक्षणाने ज्ञान आणि विवेकाची प्राप्ती होते, शिक्षणाने उद्योगशीलता वाढते, त्यातून देशाची आवक वाढते, आर्थिक सक्षमता आल्याने एकता प्रस्थापित होते, तेंव्हा राष्ट्र शक्तिशाली बनते." बहिणाबाई यांचा संदेश आपल्या हृदयात साठवून चौघे चार दिशेला शिक्षण प्रसार करण्यास निघून गेले.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*   
  *शिक्षणाने सर्व काही साध्य होते, "शिकाल तर टिकाल "*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

17. *समाधान ही अंत:करनाची* 
     *सर्वात सुंदर संपत्ती आहे.*
        ज्याला ही संपत्ती मिळाली,
*तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

17. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
 ■ Blue Print for Survival हे पर्यावरण विषयी पुस्तक _____ यांनी लिहिले आहे.
   ➜ सरला बेन

 ■ जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो ?
   ➜ 24 नोव्हेंबर

 ■ 'ज्ञानवाणी' हा प्रकल्प कोणत्या संस्थेचा आहे ?
   ➜ इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

 ■  गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे ?
   ➜ वैनगंगा

 ■ राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात केव्हा सुरु करण्यात आली ?
   ➜ 2 जुलै 2012
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

17.   *♦लाला लजपत राय♦* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━
 _*🐾यांचा आज स्मृतिदीन*_🐾
         _त्यानिमित्त त्यांना_
      _*विनम्र अभिवादन..!!*_
    🙏🐾🌷🌹🌷🐾🙏

●जन्म :~ २८ जानेवारी १८६५
*●मृत्यू :~  १७ नोव्हेंबर १९२८*

           ★ लाला लजपत राय ★
   हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात.

    लाल, बाल आणि पाल या त्रिकूटातले हे लाल. लाला लजपत राय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल यांना लाल-बाल-पाल म्हणत.

    लाला लजपतराय हे खुप मोठे क्रांतीकारक होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁रविवार ~ 17/11/2019❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment