"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*18/08/24 रविवार परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *18. ऑगस्ट:: रविवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण शु.१४, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~चतुर्दशी, नक्षत्र ~उत्तराषाढा,
योग ~आयुष्मान्, करण ~गर,
सूर्योदय-06:10, सूर्यास्त-19:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

18. *आधी विचार करा; मग कृती करा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

18. *झाकली मूठ सव्वा लाखाची –*
         ★ अर्थ ::~ 
दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

18.   *दुर्जनः परिहर्तव्यः*
    *विद्ययाऽलंकृतोऽपि सन् ।*
  ⭐अर्थ :: ~ दुर्जन हा विद्यायुक्त असला तरी त्याला दूर ठेवले पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

    🛡 ★ 18. ऑगस्ट ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २३० वा (लीप वर्षातील २३१ वा) दिवस आहे.

         ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००८ : हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.
●१९४५ : स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिन्द सेनेचे सरसेनापती सुभाषचंद्र बोस यांना घेऊन जाणार्‍या विमानाला तैवानमधील तैपैई विमानतळावर अपघात होऊन त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त दीर्घकाळ अज्ञात राहिल्याने त्याविषयी पुढे शंका निर्माण झाली.
●१९२० : अमेरिकेच्या संविधानात १९ वा बदल झाला आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६७ : दलेर मेहंदी – भांगडा गायक
◆१९३४ : संपूर्ण सिंग कालरा ऊर्फ ’गुलजार’ – गीतकार, कवी, लेखक व दिग्दर्शक
◆१९२३ : सदाशिव ऊर्फ ’सदू’ शिंदे – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज
◆१९०० : विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी
◆१७०० : थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : नारायण धारप – रहस्यकथाकार
●१९७९ : वसंतराव जाईक – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक (जन्म: १ जुलै १९१३)
●१९९८ : पर्सिस खंबाटा – अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका
●१९४५ : नेताजी सुभाषचंद्र बोस (जन्म: २३ जानेवारी १८९७ )
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

18. *✸ अमुचा भारत देश महान ✸*
        ●●●●●००००००●●●●●
परदास्याची तुटे शृंखला सरला अंध:कार
नभी तिरंगी निशाण चढले करुया जयजयकार

स्वतंत्र झाली भारतमाता आम्ही तिचे संतान
अमुचा भारत देश महान !

स्वराज्य येथे सुराज्य व्हावे
रामराज्य या भूवर यावे
त्रिखंडात या अखंड राहो अजिंक्य हिदुस्थान
अमुचा भारत देश महान !

या देशाला शिकवून भक्ती
गांधिजींनी केली मुक्ती
राष्ट्रपित्याने दिले अम्हाला चिरंजीव वरदान
अमुचा भारत देश महान !

गरीब कोणी, अमीर कोणी
या मातीला समान दोन्ही
माणुसकीचे पाईक आम्ही, नाही थोर लहान
अमुचा भारत देश महान !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

18. *❂ तू अनश्वरातील अमरेश्वर ❂*
          ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तू अनश्वरातील अमरेश्वर अविनाशी
मज देशील का तू दर्शन दिव्य प्रकाशी

तू चिरंतनातील ईश्वर असशिल का रे
हे दोन घडीचे वैभव नश्वर सारे
बरसती तुझ्यावर नक्षत्रांच्या राशी

का तुला न यावी करुणा माझी देवा
तू केवळ माझ्या सर्वस्वाचा ठेवा
दे मला आसरा तुझिया चरणापाशी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

18. *❃ कोकिळा,पोपट व घार ❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
*एका गरीब भोळ्या कोकीळाला* एका घारीचे मरणप्राय भय वाटले. कारण घार तिच्या डोक्यावर ओरडत व भक्ष्यासाठी घिरट्या घालत फिरत होती.
            ते पाहून एक पोपट कोकीळाला म्हणाला की, 'इकडे ये, घाबरू नको, धीर धर. हा सर्व किलकिलाट व धडपड केवळ मूर्खपणाची आहे. शेवटी या आळशी घारीने एखादा गरीब बेडूक किंवा उंदीर पकडलेला तू पाहशील, अरे ससाणे हे खरे भयंकर पक्षी असून ते काही गडबड न करता मुकाट्याने प्राणी पकडून खातात.'

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  बोलेल तो करेल काय ? गर्जेल तो पडेल काय ?*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

18.  *जीवनात मागे बघाल तर,*
*अनुभव मिळेल..*
*जीवनात पुढे बघाल तर,*
       *आशा मिळेल..…*
*इकडे -तिकडे बघाल तर,*
       *सत्य मिळेल...*
*आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर,*
        *आत्मविश्वास मिळेल...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

18. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण ?
  ➜रविंद्रनाथ टागोर.

✪  विद्युत रोध मोजण्याचे एकक कोणते ?
  ➜ओहम.

✪  महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण किती खासदार निवडून जातात ?
  ➜ एकोणवीस.

✪  छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला ?
  ➜ तोरणा.

✪  राजमुद्रेतील सिंह कशाचे प्रतिक आहे ?
  ➜ सामर्थ्याचे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

18. *❒ ♦वसंतराव नाईक♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
★महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री★
               व एक कृषितज्ञ.
_*🐾यांचा आज स्मृतिदीन*_🐾
         _त्यानिमित्त त्यांना_
      _*विनम्र अभिवादन..!!*_
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏

●जन्म :~ १ जुलै १९१३
गहुली ता.पुसद जिल्हा यवतमाळ
*●मृत्यू :~ १८ ऑगस्ट १९७९*

   ◆वसंतराव फुलसिंग नाईक◆
    मानवता, न्याय व समतेसाठी झुंज देणारे जे महामानव झाले, त्यात वसंतराव नाईक यांचे अगक्रमाने आहे. हरितक्रांतीचे शिल्पकार महानायक महाराष्टाचे माझी मुख्यमंञी हरित क्रांतिचे प्रणेते, कुळ कायदयाचे जनक, महाराष्टृातील विज प्रकल्पाची निर्मिती करनारे, धरनाची निर्मिती करणारे, रोजगार हमी योजनेचे जनक, शेतकरी कारखानदार झाला पाहीजे असे स्वप्न पाहनारे, कापुस एकाधिकार योजनेचे जनक वंसतराव नाईक साहेब....

      पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). पुढे १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी सु. १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.

      प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्याकडे जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य केले. १९७७ मार्चमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले.

     समाज जागृतीचा पहिला अध्याय त्यांनी समाजाला दिला. त्यांचे हे विचार बंजारा समजापुरते मर्यादित न राहता प्रत्येक जाती, धर्म, विविध समाजात पोहचले आणि प्रत्येक ठिकाणी एक माणुस म्हणून पुढं यावे, हीच त्यांची इच्छा होती. दि. 18 ऑगस्ट 1979 रोजी वसंतराव नाईक व सौ. वत्सला नाईक या उभयंतांनी सिंगापूर यात्रा करत असताना वसंतराव नाईक यांचे 66 व्या वर्षी निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║
*❁रविवार~18/08/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


No comments:

Post a Comment