"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*20/01/24 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *20. जानेवारी:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष शु.10,  पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~दशमी, नक्षत्र ~कृत्तिका,
योग ~शुभ, करण ~तैतिल,
सूर्योदय-07:14, सूर्यास्त-18:23,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

20. *मरावे परी कीर्ती रुपी उरावे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
20. *आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ?*
      *★ अर्थ ::~*
- जर स्वत:जवळ एखादी वस्तू नसेल तर ती वस्तू दुसऱ्यास कशी देणार ? 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
20. *हस्तस्य भूषणं दानम् ।*
            ⭐अर्थ ::~
दानधर्म करणे हे हाताचे भूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
       🛡 *20. जानेवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २० वा दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००९ : अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.
●१९९९ : गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
●१९९८ : संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ’पोलार संगीत पुरस्कार’ विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर
●१९६३ : चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६० : आपा शेर्पा – १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक
◆१८९८ : कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार,
◆१८७१ : सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : रामेश्वरनाथ काओ – रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते.
●१९८८ : खान अब्दुल गफार खान तथा ’सरहद गांधी’
●१९८० : कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक
●१९५१ : अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━

20.     *उभवू उंच निशाण*
     🇮🇳🔺🇮🇳♦🇮🇳🔺🇮🇳
उभवू उंच निशाण !
नव्या युगाचे नव्या जगाचे, उभवू उंच निशाण !

दीन दीन जे, दलित दलित जे
त्या सर्वांना ध्वज हा देईल सदैव छाया छान
उभवू उंच निशाण !

अंध अमानुष रूढी घालिती अखंड जगी थैमान
त्या क्रुरांना हे क्रांतिचे मूर्तिमंत अव्हान
ताठ ठेविती मान झुंजुनी भीमदेव धीमान्‌
शूर शिपाई आम्ही त्यांचे व्यर्थ न ते बलिदान

ध्वज मिरवीत हा गौतम गेले टाकूनी राज्य महान
पुसुनी आसवें मानवतेची होती बुद्ध महान
हे समतेचे, हे ममतेचे, गांधीजीचे गान
हरिजन धरुनी उरी स्वीकरी जे फकिरीचे वाण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆••====

20.  *✹ प्रभू तू दयाळू ✹*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
प्रभू तू दयाळू, कृपावंत दाता
दया मागतो रे तुझी मी अनंता

जागविण्यास देहा दिली एक रोटी
नमस्कार माझे तुला कोटी कोटी
वासना कशाची नसे अन्य चित्ता

तुझ्या पावलांशी लाभता निवारा
निघे शीण सारा, मिळे प्रेमधारा
सर्व नष्ट होती मनातील खंता

ज्ञान काय ठावे मला पामराला
मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा
तुझे नाम ओठी, नको वेद गीता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

20.   👩‍👩‍👦‍👦 *आईचे प्रेम* 👩‍👩‍👦‍👦
      ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   एकदा एका परीने जाहीर केले, ज्या प्राण्याचे पिल्लू सर्वात सुंदर, त्याला बक्षीस मिळेल. सर्व प्राण्यानी आपली पिले आणली. परीने सर्व पिलांना निरखले. माकडिणीच्या पिलाचे चपटे नाक पाहून म्हटले, किती कुरुप आहे हे पिल्लू. हे ऐकूण  पिलाच्या आईला खूप वाईट वाटले.  ती पिलाला म्हणाली, माझ्या लाडक्या बाळा, तू अजीबात मनाला लावून घेऊ  नकोस. माझे तुझ्यावर अतीशय प्रेम आहे. माझ्यासाठी तूच बक्षीस आहेस. मला इतर कोणतेही बक्षीस नको. 

    *_🌀तात्पर्य_ ::~* आईच्या प्रेमाची तुलना होऊ शकत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====
20. *पसारा* सहज मांडला जातो , परंतु आवरताना *जीव* घेतो.....
मग तो *घरातला* असो नाहीतर *मनातला.*                      
  *ऊन* एकटं कधीच येत नाही ते *सावलीला* घेऊनच येतं.
*दु:खाचं* अन *सुखाचं* हेच नातं असतं"

*विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे,*
*कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆••====
20. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांनी बनलेले आहे ?
➜बेसाल्ट.

✪  हरिवंशराय बच्चन यांची गाजलेली साहित्यकृती कोणती ?
➜मधुशाला.

✪  पंचायत राज स्विकारणारे पहिले राज्य कोणते ?
➜राजस्थान.

✪  अमेरिका देशाचे चलन कोणते ?
➜डाॅलर.

✪  जगातील सर्वांत जुना खेळ कोणता ?
➜पोलो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ महत्वपूर्ण माहिती ❂*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

20. *❒🇮🇳 आपला राष्ट्रध्वज 🇮🇳❒* 
     ━━•●◆●★●◆●•═━
■ *ध्वजाचा वापर करताना*
        *घ्यावयाची काळजी.*

(१) ध्वजाचा चुकीचा वापर कोठेही करू नये.

(२) ध्वज चुरगळलेला, फाटलेला, मलीन असता कामा नये.

(३) कोणत्याही व्यक्तीच्या मानवंदनेसाठी ध्वज खाली उतरवू नये.

(४) ध्वज ज्या काठीवर लावला असेल त्याच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार घालू नयेत.

(५) तोरण,गुच्छ,पताका म्हणून ध्वजाचा वापर करू नये.

(६) इतर रंगीत तुकडे ध्वजासारखे दिसतील असे जोडू नयेत.

(७)व्यासपीठावरील टेबल झाकण्यासाठी ध्वज वापरू नये.

(८) ध्वजावरील केसरी रंगाचा पट्टा नेहमीच वरच्या भागात असावा.

(९) ध्वजाचा स्पर्श जमिनीस होऊ देऊ नये अथवा तो पाण्यावरून फरफटत नेऊ नये.

(१०)ध्वज फाटेल या रीतीने तो फडकवू नये. वा बांधू नये.

(११) ध्वज फाटला वा मळला तर तो कोठेही फेकून देऊ नये अथवा त्याचा अपमान होईल अशा रीतीने त्याला नष्ट करू नये.

(१२)ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत.

(१३) काही उच्चपदस्थ व्यक्तीच्या मृत्यूशिवाय इतर कोणत्याही प्रसंगी ध्वज अर्ध्यावर उतरवू नये.

(१४)ध्वजारोहणाच्या वेळी ध्वज नेहमी झर्रकन वर चढवावा आणि उतरविताना मात्र तो सावकाशपणे विधिपूर्वक उतरविण्यात यावा.

(१५) हवामान कसेही असले तरीही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज लावण्यात येईल.

      आपला राष्ट्रध्वज आपल्या देशाचा
  मानदंड आहे. आपल्या संस्कृतीचे, उज्ज्वल यशाचे,परंपरांचे ते प्रतीक आहे. त्याचा यथोचित आदर राखणे हे भारतीय नागरिक म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
            *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁शनिवार~20/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment