"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*23/12/18 रविवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 23/12/2018 ❂*
      *🔘 वार ~ रविवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

🍥 *23. डिसेंबर:: रविवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
              मार्गशिर्ष कृ. १
     तिथी : कृष्ण पक्ष प्रतिपदा,
             नक्षत्र : आर्द्रा,
     योग : शुक्ल,  करण : बलव,
सूर्योदय : 07:07, सूर्यास्त : 18:07,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23. *उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

23. उंटावरून शेळ्या हाकणे –
         *★ अर्थ ::~*
 आळस, हलगर्जीपणा करणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23.   *योजकस्तत्र दुर्लभ: ।*
  ⭐अर्थ :: ~ योजना करणारा (एखाद्या गुणाचा उपयोग करुन घेणारा) दुर्मिळ असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

    🛡 ★ 23. डिसेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ राष्ट्रीय किसान दिन
★ हा या वर्षातील ३५७ वा (लीप वर्षातील ३५८ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००१ : बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.
●१९५४ : डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ. मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.
●१९४० : वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे ‘हिन्दुस्थान एअरक्राफ्ट‘ हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
●१९२१ : शांतिनिकेतन येथे ’विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९०२ : चौधरी चरण सिंग – भारताचे ५ वे पंतप्रधान व ’लोकदल’ पक्षाचे संस्थापक
●१८९७ : कविचंद्र कालिचरण पटनाईक – ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार
◆१८५४ : हेन्‍री बी. गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : के. करुणाकरन – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील ’युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक
●२०१० : ज्ञानेश्वर नाडकर्णी – कला समीक्षक व लेखक.
●२००४ : नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री (जन्म: २८ जून १९२१)
●१९९८ : रत्‍नाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य ,पद्मश्री, खासदार
●१९७९ : दत्ता कोरगावकर – हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23. *✸ अमुचा भारत देश महान ✸*
        ●●●●●००००००●●●●●
परदास्याची तुटे शृंखला सरला अंध:कार
नभी तिरंगी निशाण चढले करुया जयजयकार

स्वतंत्र झाली भारतमाता आम्ही तिचे संतान
अमुचा भारत देश महान !

स्वराज्य येथे सुराज्य व्हावे
रामराज्य या भूवर यावे
त्रिखंडात या अखंड राहो अजिंक्य हिदुस्थान
अमुचा भारत देश महान !

या देशाला शिकवून भक्ती
गांधिजींनी केली मुक्ती
राष्ट्रपित्याने दिले अम्हाला चिरंजीव वरदान
अमुचा भारत देश महान !

गरीब कोणी, अमीर कोणी
या मातीला समान दोन्ही
माणुसकीचे पाईक आम्ही, नाही थोर लहान
अमुचा भारत देश महान !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23.*❂ देह मंदिर चित्तमंदिर ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

23.  *❃❝ आत्मविश्वास...!! ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता.
धनको त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावत होते.
असाच तो एका बगिच्यातील बेंचवर हातांनी डोके धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे
त्याला खूप वाटत होते.
अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर
उभा राहिला.
मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, तो म्हणाला. मला वाटते मी तुला मदत करू शकतो. वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.
व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक.
या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला.
आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने
तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला.
त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर
करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले.
काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.
बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन
आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला. व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशोगाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स
तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुम्हाला मी पकडलेच! व्यावसायिकाकडे बघून ती नर्स ओरडून म्हणाली. याने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात
असतो आणि लोकांना सांगत बसतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून.
असे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले.
व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर आपल्याजवळ 5 लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता. अचानक त्याच्या लक्षात आले
की, त्याचे आयुष्य बदलवून
टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वातच नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23. आयुष्यात कुणाची पारख
  त्याच्या रंगावरून न करता,
    उलट त्याच्या मनावरून करा,
कारण पांढ-या रंगावर
  जर जगाचा विश्वास असता,
        तर मीठानी सुद्धा
    जखमा भरल्या असत्या...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

23. *✿ चालू घडामोडी प्रश्नसंच  ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
1. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?
◆उत्तर : डेव्हिड रिचर्डसन

2. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत?
◆उत्तर : गिरीश महाजन

3. सरकारमार्फत राज्यातील नऊ जिल्ह्यांतील किती जलसिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली?
 ◆उत्तर : 10

4. चीनमधील सर्वात मोठ्या खासगी कंपनीपैकी एक असलेल्या ईस्ट होप समूहासोबत भारताच्या कोणत्या समूहाने 30 कोटी डॉलरच्या गुंतवणुकीचा करार केला आहे.
◆उत्तर : अदानी समूह

5. भारतातील अशी कोणती एकमेव वास्तू आहे, जीला 'ट्रेडमार्क'चा दर्जा मिळाला आहे.
◆उत्तर : ताज महाल पॅलेस
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

23. ★ पांडुरंग सदाशिव साने ★
        ┄─┅•●●●◆●●●•┅─┄
🔸टोपणनाव: साने गुरुजी
🔹जन्म :~ २४ डिसेंबर १८९९
पालगड, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र

🔸मृत्यू : ~ ११ जून १९५०
          के.ई.एम.रुग्णालय मुंबई
🔹चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा

      *पांडुरंग सदाशिव साने*
         ऊर्फ *💥साने गुरुजी*
     🔷हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. 'श्यामची आई', 'नवा प्रयोग', 'सुंदर पत्रे', 'हिमालयाची शिखरे', 'क्रांती', 'समाजधर्म', 'आपण सारे भाऊ' इत्यादी त्यांचे विपूल साहित्य प्रसिद्ध आहे.

    ♦ त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.

    🔷 शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
     🔶 १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.

   ♦ समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.

     🔷मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात.

      🔶त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली.

     🔷करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम  होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ रविवार ~ 23/12/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment