"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*25/01/24 गुरूवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *25. जानेवारी:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष पौर्णिमा,  पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~पौर्णिमा, नक्षत्र ~पुनर्वस,
योग ~विष्कम्भ, करण ~विष्टि,
सूर्योदय-07:14, सूर्यास्त-18:26,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

25. *राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

25. *असंगाशी संग प्राणाशी गाठ*
      *★ अर्थ ::~* दृष्टांची संगत करून स्वत:वर संकट ओढवणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

25. *पृथ्विभूषणं राजा ।*
          ⭐अर्थ ::~
राजा हा पृथ्वीचे भूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

      🛡 *25. जानेवारी* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★राष्ट्रीय मतदार दिन
★हा या वर्षातील २५ वा दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना ’भारतरत्‍न’
●१९९१ : मोरारजी देसाई यांना ’भारतरत्‍न’
●१९८२ : आचार्य विनोबा भावे यांना ’भारतरत्‍न’
●१९७१ : हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५८ : कविता कृष्णमूर्ती – पार्श्वगायिका
◆१९३८ : सुरेश खरे – नाटककार व समीक्षक
◆१८७४ : डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार
◆१८६२ : रमाबाई रानडे – ’सेवा सदन’च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१५ : मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
●२००१ : विजयाराजे शिंदे – भारतीय जनता पक्षाच्या नेत्या
●१९९६ : प्रशांत सुभेदार – रंगभूमी व चित्रपटांतील गुणी अभिनेते
●१९८० : लक्ष्मणशास्त्री दाते – सोलापूरचे ’दाते पंचांग’कर्ते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

25.   *"सारे जहाँ से अच्छा"*
   ●●●●००००००●●●●
सारे जहाँ से अच्छा
हिंदुस्तान हमारा
हम बुलबुलें हैं उसकी
वो गुलसिताँ हमारा।
परबत वो सबसे ऊँचा
हमसाया आसमाँ का
वो संतरी हमारा
वो पासबाँ हमारा।

गोदी में खेलती हैं
जिसकी हज़ारों नदियाँ
गुलशन है जिनके दम से
रश्क-ए-जिनाँ हमारा।

मज़हब नहीं सिखाता
आपस में बैर रखना
हिंदी हैं हम वतन है
हिंदुस्तान हमारा।
                 - मुहम्मद इक़बाल
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆••====

25. *●अविरत पुढे पुढे जाऊ ●*
         ━━━━━━━━━━
अविरत पुढे पुढे जाऊ
अम्हि ना विश्रांति आता घेऊ॥धृ॥

उध्दराया पूर्वज शापित घोर आचरुनि तप हे अविरत
मुक्ति मिळवुनी देइ भगीरथ सातत्याने भगीरथाच्या
पुढे पुढे जाऊ॥१॥

शांत सागरी सेतू बांधून नष्ट कराया संकट दारूण
जाई वानरासह रघुनंदन त्या धैर्याने रघुरायच्या
पुढे पुढे जाऊ॥२॥

स्वर्गी तो देवेन्द्र कोपला गारायुत पर्जन्य वर्षला
गोवर्धन गोपांनि उचलला चातुर्याने श्रीकृष्णाच्या
पुढे पुढे जाऊ॥३॥

धुमाकुळ यवनांचा चाले आवर घाली शिवराय बळे
घेवुनि संगे मित्र मावळे त्या शिवराया साक्ष ठेवुनी
पुढे पुढे जाऊ॥४॥

सातत्याच्या अन् धैर्याच्या चातुर्याच्या संघटनेच्या
मातृभूमिच्या उध्दाराच्या महाजनांच्या त्याच पथाने
पुढे पुढे जाऊ॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

25.      *★ जाणीव ★*
       •••◆••◆★◆••◆•••
   बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले कि घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जहाजावर सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसेना. तो सतत ओरडत राहिला. हे पाहून बादशाहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाश्यांना सांगितले, कि काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा. खलाश्यांनी पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले, समजावून सांगितले, वेगवेगळी आमिषे दाखविली, पण हा गुलाम काही गप्प बसेना. तेंव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी बादशाहाकडे गेला आणि म्हणाला,"हुजूर! मला परवानगी द्या, मी याला गप्प बसवतो." बादशाहाने परवानगी दिली. त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकाविण्यात आले. काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला. ५ ६ वेळेला गटांगळ्या खावून झाल्यावर त्याला जहाजावर घेतले, वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला. हे पाहून सर्वच चकित झाले. बादशाहाने वृद्ध खलाश्याला विचारले कि आता हा गप्प कसा झाला? खलाशी उत्तरला,"हुजूर! आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नसता नुसता ओरडत होता. पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्प आहे.त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव. त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे."

     *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते,कदर केली जाते. दुःख मिळाले नाही, सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
  ━┅═▣◆★✪★◆▣━┅━

25. *माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं...!!*

   *काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा..*

   *कारण आपण  फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]  *🔴 सामान्य ज्ञान 🔴*
  ━┅━▣◆★✪★◆▣━┅━

25. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  ब्लू माॅरमाॅन कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू आहे ?
➜ महाराष्ट्र.

✪  NCC चे घोषवाक्य काय आहे ?
➜ एकता व अनुशासन.

✪  स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना कधी करण्यात आली ?
➜ ३० मार्च १९८५.

✪  पोलिओ रोगामुळे कोणत्या अवयवास अपाय होतो ?
➜ मज्जासंस्था.

✪  संत रामदासांचे पूर्ण नाव काय आहे ?
➜ नारायण सूर्याजीपंत ठोसर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ महत्वपूर्ण माहिती ❂*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

25. *❒ ♦गणराज्य दिवस♦ ❒* 
     ━═•●◆●★●◆●•━━
    २६ जानेवारी १९५० पासून भारताचे संविधानानुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला म्हणून हा दिवस गणराज्य म्हणून साजरा केला जातो.

    भारताचे संविधानात न्याय,स्वातंत्र्य, समता,बंधुता व राष्ट्रीय एकात्मता, अखंडता इत्यादी तत्वांचा स्वीकार केलेला आहे

   संविधानामुळेच देशातील गोरगरीब सामान्य जनतेला न्याय व हक्क प्राप्त झाले.सर्वसामान्य माणसाची उन्नती व विकास झाला ही संविधाचीच देण आहे.

     देशाची गौरवचिन्हे आणि मानबिंदू म्हणजे जणू राष्ट्रीय अलंकारच असतात. त्यांच्या जपणुकीतून आपला देशाभिमानच जोपासला जातो. आपले राष्ट्रीय अलंकार असे आहेत..? राष्ट्रचिन्ह अशोक स्तंभावरील चार सिंह हे भारताचे राष्ट्रचिन्ह आहेत. सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ येथील शिल्पावरून ते घेतले आहे. यात चार सिंह एकामागे एक उभे आहेत. (मात्र कोणत्याही एका बाजूने पाहता तीन सिंह दिसतात.) त्याखालील पट्टीवर एक आराम करणारा, हत्ती, वेगातला घोडा, एक बैल यांच्या शिल्पाकृती आहेत व त्यांच्या मध्यभागी चक्र आहे. राष्ट्रचिन्हाखाली 'सत्यमेव जयते' हे मुंडकोपनिषदातील वाक्य देवनागरी लिपित कोरले आहे. घंटाकृती (उलट्या) कमळावर हे विराजमान आहे. २६ जानेवारी १९५० रोजी हे राष्ट्रचिन्ह स्वीकारले गेले.

             ★ राष्ट्रध्वज ★
    तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे. उंची दोन भाग, तर लांबी तीन भाग या प्रमाणात तिरंगा बनवला जातो. उंचीचे समान तीन भाग बनवू. सर्वात वरचा भाग नारंगी, मधला भाग सफेद (पांढरा) व खालचा भाग हा हिरवा रंगात बनविला जातो. मधल्या भागामध्ये गडद निळय़ा रंगातील अशोक चक्र असते. या अशोक चक्राचा व्यास सफेद पट्टय़ाच्या उंचीच्या तीन-चतुर्थ्यांश असतो. या चक्राला २४ आरे असतात. राष्ट्रध्वजाच्या प्रत्येक रंगातून तसेच चक्रातून एक विशिष्ट अर्थ प्रतीत होतो. भगवा- एकात्मता, सफेद- सत्याचा मार्ग, हिरवा- निसर्गाशी व जीवनाशी नाते, अशोक चक्र - धर्माचे नियम, आरे - प्रगती, वेग, विकासाचे प्रतीक.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁गुरूवार~25/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment