"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*25/06/19 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

*❁ दिनांक :~ 25/06/2019 ❁*
      *🔘 वार ~ मंगळवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

  https://goo.gl/xf3MdN
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲◆🇸◆🇵●═━━

    🍥 *25. जून:: मंगळवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
               जेष्ठ कृ. ८
     तिथी : कृष्ण पक्ष अष्ठमी,
       नक्षत्र : उत्तराभाद्रपदा,
    योग : सौभाग्य, करण : बलव,
सूर्योदय : 06:03, सूर्यास्त : 19:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂* 
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

25. *परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

25. *दुरून डोंगर साजरे*
      *★ अर्थ ::~* 
    लांबून दोष दिसत नाहीत 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25. *यतो धर्मस्ततो जयः ।*
          ⭐अर्थ ::~
 जिथे धर्म तिथेच विजय असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🛡 *★25. जून★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १७६ वा (लीप वर्षातील १७७ वा) दिवस आहे.
★मोझांबिकचा स्वातंत्र्य दिन

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९८३ : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करुन भारत विजेता.
●१९७५ : पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी जाहीर केली.
●१९३४ : महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला.
●१९१८ : कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८६ : सई ताम्हनकर – अभिनेत्री
◆१९७४ : करिश्मा कपूर – अभिनेत्री
◆१९३१ : विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान, केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंडा संस्थानचे ४१ वे राजे 
◆१९२४ : मदनमोहन – संगीतकार 
◆१९०० : लॉर्ड लुई माउंटबॅटन – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल 

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००९ : मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता 
●२००० : रवीबाला सोमण-चितळे – मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या
●१९७९ : अण्णासाहेब – मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष 
●१९२२ : सत्येंद्रनाथ दत्त – बंगाली कवी 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25.  *✸ महाराष्ट्र देशा ✸*
     ●●●●●००००००●●●●●
मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा ------ प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ------ नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा ------- बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा 
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा----- शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;-------जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी, 
वैभवासि, वैराग्यासी -------जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा 
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥ 
अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा------ सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा----- गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची ------- मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची 
ध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥
               कवी - गोविंदाग्रज
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂* 
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25. *❂ नमने वाहुनि स्तवने ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
नमने वाहुनि स्तवने उधळा, जयजयकार करा
बंधुहो, जयजयकार करा
सकल मनांचा विकास येतो आज आपुल्या घरा.

विमलहास्यसुमवृष्टीमध्ये असो तुझे स्वागत
निरंतर असो तुझे स्वागत
परमात्म्याच्या चित्सौंदर्या, येई बा हासत.

आत्मवेलिच्या स्फूर्तिफुलांवर वसंत जे विकसती
बुद्धिचे वसंत जे विकसती
त्याच वसंता त्वदीय विकासा, सरस्वती बोलती.

विश्वकाव्य वाचीत बैसली चित्तमयूरावरी
दीप्‍ती जी चित्तमयूरावरी
त्या दीप्‍तीला, त्या ज्ञप्‍तीला, वदती वागीश्वरी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

25.  *❃❝ म्हातारा आणि मृत्यु ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
      एक अतिशय म्हातारा माणूस* लाकडे आणण्यासाठी रानात गेला. तेथे काही लाकडे जमा करून त्याची एक मोळी बांधली व ती डोक्यावर घेऊन मोठ्या कष्टाने पावले टाकत घराकडे चालला. 
      वाटेत डोक्यावरच्या ओझ्याने तो अगदी थकून गेला आणि ओझे खाली टाकून धापा टाकत खाली बसला. त्यावेळी तो मृत्युला म्हणाला, 'हे प्राणीमात्राच्या विसाव्या, तू ये आणि या दुःखातून मला सोडव.' 
      ते ऐकताच प्रत्यक्ष मृत्यू म्हातार्‍याच्या पुढे येऊन उभा राहिला व त्याला म्हणाला, 'बाबा, तू माझी आठवण का केली होती?' मृत्यू इतका जवळ आहे हे त्या बिचार्‍या म्हातार्‍याला माहीत नव्हते. 
       मृत्यूची ती भितीदायक मूर्ति पाहून म्हातार्‍याची भितीने गाळण उडाली. मग थोड्या वेळाने तो थरथरत मृत्यूला म्हणाला, 'मृत्यू देवा, मी अशक्त, माझ्या डोक्यावरची मोळी अचानक खाली पडली. ती उचलून देशील म्हणून मी हाक मारली. दुसरं काही कारण नाही. खरंचच इतकं काम होतं आणि यात जर मी तुझा अपमान केला असं तुला वाटत असेल, तर मी तुझ्या पाया पडतो. मला क्षमा कर व आलास तसाच कृपा करून माघारी जा.'

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
   मृत्यूविषयी थट्टेने बोलण्याची काही लोकांना सवय असते. थोडेसे संकट आले की मरण येईल तर बरे असे म्हणतात पण मृत्यू दूर आहे तोवरच ह्या गोष्टी.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25. *शाळेच्या कवायतीमध्ये 'पीछे मुड' बोलताक्षणी, पहिला माणुस शेवटी आणि* 
*शेवटचा माणुस पहिल्या क्रमांकावर येतो...*
 *आयुष्यातंही पुढे असण्याचा गर्व आणि* *शेवटी असण्याचे कधीच दुःख मानु नका...*
*माहिती नाही हे आयुष्यं,*   
*कधी म्हणेल, 'पीछे मुड'...!!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25. *✿ वर्षे व ऐतिहासिक घटना ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ १९३१ : भगतसिंग , सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.
■ १९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
■ १९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित
■ १९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.
■ १९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार
■ १९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

25.  *❒ वासुदेव चापेकर ❒*  
      ━━═•●◆●★●◆●•═━━
●जन्म :~ २५ जून १८६९
●स्मृतिदिन :~ १८ एप्रिल १८९८

      वासुदेव चापेकर व त्यांचे बंधू हे आद्य भारतीय क्रांतिकारकांमध्ये गणले जातात. 

      वासुदेव चापेकरांचा जन्म कोकणात एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. वडील ‍हरिपंत हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगायचे. बालवयात तिघेही भाऊ हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे. त्यांमुळे चापेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला.

     वासुदेव चापेकर यांनी दामोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला. त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले.

      पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणार्‍या ब्रिटिशांविरुद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. 

     इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. ऑक्टोबरमध्ये मुंबईत गाठीच्या प्लेगची साथ पसरली  ही साथ पुण्यापर्यंत पोहोचली. पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले. रँडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. 

       रँडच्या प्रशासनाने या बाबतीत अक्षम्य अतिरेक केला. रोगग्रस्त लोकांसोबतच अनेक निरोगी लोकांनापण केवळ संशयावरून रोग्यांच्या छावणीत हलविण्यात आले. टिळक निर्जंतुकीकरण व सार्वजनिक स्वच्छतेच्या विरोधात नव्हते, पण रँडने वापरलेल्या कार्यपद्धतीला त्यांचा विरोध होता, 

       रँडच्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल  चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या सार्‍यांचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडवर जवळून गोळ्या झाडल्या. रँड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.

      चाफेकर बंधू निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर, तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले, व तीनही चापेकर बंधू शहीद झाले.

        ◆ आधारित चित्रपट
  चापेकर बंधूंवर आणि रँडच्या खुनाच्या घटनेवर '२२ जून १८९७' हा मराठी चित्रपट निघाला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
             *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ मंगळवार ~ 25/06/2019❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment