"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*26/11/19 मंगळवारचा परीपाठ*
   ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
 *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ💲🅿꧂❀*
*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर सर्व आवश्यक ज्ञानवर्धक उपयुक्त माहीतीसाठी...*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
 ━━═•●◆❃❂❃◆●•═━━

 *🍥26.नोव्हेंबर:: मंगळवार🍥*
  ━━═•◆❃❂❃◆•═━━
 कार्तिक अमावस्या, नक्षत्र : विशाखा
  योग : अतिगंड, करण : चतुष्पाद,
सूर्योदय : 06:52, सूर्यास्त : 17:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
 ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

26. *जो वेळ वाया घालवतो त्याच्याजवळ गमवायलाही काही उरत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

26. *टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही*
     *★अर्थ ::~*
- कष्टाशिवाय मोठेपणा नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
26. *अतिपरिचयात् अवज्ञा ।*
              ⭐अर्थ ::~
 अतिपरिचयाने अनादर होतो. (होऊ शकतो.)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

       🛡 *26. नोव्हेंबर* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
*★संविधान दिन*
★हा या वर्षातील ३३० वा (लीप वर्षातील ३३१ वा) दिवस आहे.

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना ’लष्कर-ए-तैय्यबा’ने मुंबईत ठिकठिकाणी अतिरेकी हल्ले केले.
●१९९७ : अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर
●१९४९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२३ : राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर – चित्रपट दिग्दर्शक
◆१९२१ : व्हर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील ’धवल क्रांती’चे जनक, ’अमूल’चे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते
◆१८८५ : देवेन्द्र मोहन बोस – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : हेमंत करकरे, अशोक कामठे, विजय सालसकर, तुकाराम ओंबाळे – मुंबई पोलिस दलातील अधिकारी
●२००१ : चंद्रकांत कृष्णाजी जगताप – शिल्पकार,
●१९९४ : भालजी पेंढारकर – मराठी चित्रपटसृष्टी आणि समाजमनावर पाच तपे अधिराज्य गाजवणारे चित्रमहर्षी
●१९८५ : ’राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर तथा कवी यशवंत – रविकिरण मंडळातील एक कवी,  ’महाराष्ट्र कवी’
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

26.  *📯 अंतरी अपुल्या   📯*
          ════════════
अंतरी अपुल्या असावी एकतेची आस
एकता निर्मू अशी जी संपवी वनवास
॥धृ॥

🎹 सर्व सुखी जन सर्वही त्राते
सर्व सारखे सर्वही भ्राते
दुःख खिन्नता भिन्नता नेइल जी विलयास॥१॥

🎹 परंपरेचा ध्वज संस्कृतिचा
केन्द्र मानुया सकल कृतीचा
पक्ष भेद वा मतमतांतरे ठरोत की आभास॥२॥

🎹 शक्तिशालिनी नव स्वतंत्रता
तशीच योजू निज कल्पकता
देश आपुला अखंड करु या लागो एकच ध्यास॥३॥

🎹 घराघरातुन राष्ट्रहितास्तव
निघोत सेवक वाढो वैभव
भावी भारत अभिमानाने स्मरेल तो इतिहास॥४॥

🎹 सामावुनिही घेइल जगता
अशी सुमंगल भारतियता
मांगल्याच्या विश्वशांतिच्या देइल संदेशास ll ५ ll
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

26.  *जयोस्तुते श्रीमहन्मंगले*
             *शिवास्पदे शुभदे !*
      ==••◆◆●★●◆◆••==
जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
                शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
           त्वामहं यशोयुतां वंदे ॥धृ.॥

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥१॥

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसते लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥२॥

मोक्ष-मुक्ति ही तुझीच रुपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रह्म वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥३॥

हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, श्री स्वतंत्रते
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥४॥
                 –स्वातंत्र्यवीर सावरकर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

26.   🔰 *दुहीचे फळ* 🔰
       🛏🛏🛏🛏🛏🛏🛏
    एक शिका-याने पक्षयांना  पकडण्यासाठी एक जाळे पसरविले. त्यात दोन पक्षी अडकले. परंतु त्यांनी परस्पर विचार करून ताबडतोब त्या जाळ्यासकट उडण्यास सुरवात केली.
      शिका-याला ते पाहून दुःख झाले; तरीही तो जमिनीवरून पक्षयांकडे पाहत त्या दिशेने पळत सुटला. एका माणसाने बसल्या बसल्या हे दृश्य पहिले.
     त्याने शिका-याला जवळ बोलावून विचारले. "तू विनाकारण का पळत आहेस? पक्षी तर जाळे घेऊन आकाशात उडत आहे."
    शिकारी म्हणाला, " आता या पक्षामध्ये मित्रता आहे. परस्पर मेळ साधून ते एकाच दिशेने उडत आहेत. म्हणूनच ते माझे जाळे पळवू शकले; परंतु थोड्या वेळाने त्यांच्यात भांडण किंवा कुरबुर होऊ शकते. मी त्यांच्या मागे या अपेक्षेने धावत आहे.
जेव्हा एकमेकांशी भांडण केल्यामुळे जाळे व ते खाली पडतील त्यावेळेस मी त्यांना पकडीन".
        शिकारी म्हणाला, ते खरे ठरले थोड्या वेळाने ते पक्षी दमले. तेव्हा आपण कुठे उतरायचे यावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाला. सामंजस्य नाहीसे झाल्यामुळे उडण्याची दिशा  व पंखांची गती सारखी राहिली नाही.
      त्यामुळे ते जाळे सांभाळू शकले नाहीत. जाळ्याच्या भाराने अडकत ते पण खाली पडावयास लागले व जाळ्यात अडकले. त्यांचे पंखदेखील गुरफटले गेले. परिणामतः जाळ्यासकट ते जमिनीवर पडले.
  शिका-याने त्यांना सहज पकडले.

   *🌀तात्पर्य ::~* एकीत बळ असते. दुहीने आपला नाश होतो*.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

26.   पद,प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या 'पुढ्यात' उभी राहतील,
               पण......
 जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव 'तुमच्या' पाठीशी उभी असतील.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

26.  *_सामान्यज्ञान : महाराष्ट्र_*
        🔅✿✿✿🔅✿✿✿🔅
● महाराष्ट्राचा पूर्व - पश्चिम विस्तार -
          800 कि.मी,
● महाराष्ट्राचाउत्तर- दक्षिण विस्तार-
         700 कि.मी.
● महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी - 720 कि.मी. (सर्वात जास्त - रत्नागिरी)
● महाराष्ट्राची राजधानी- मुंबई,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  💠महत्वपूर्ण दिवस💠*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

26. *❒ भारतीय संविधान दिन ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
  १९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. १९३५ सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापने विषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली.  १५ ऑगस्ट  १९४७  रोजी  भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधीरूपात काम केले होते.

      २९ ऑगस्ट १९४७  रोजी
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर१९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस *"भारतीय संविधान दिन"* म्हणून साजरा केला जातो. नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या.
       संविधान संपूर्ण रूपाने
२६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ मंगळवार ~ 26/11/2019 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment