"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*29/01/20 बुधवारचा परीपाठ*
   ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
 *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ💲🅿꧂❀*
*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर सर्व आवश्यक ज्ञानवर्धक उपयुक्त माहीतीसाठी...*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
 ━━═•●◆❃❂❃◆●•═━━

 *🍥29.जानेवारी:: बुधवार🍥*
 ━━═•●◆❃❂❃◆●•═━━
             माघ शु. ४
      तिथी : शुक्ल पक्ष चतुर्थी,
         नक्षत्र : पूर्वभाद्रपदा
      योग : शिव, करण : विष्टि,
सूर्योदय : 07:13, सूर्यास्त : 18:30,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

29. *तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

29.   *आजा मेला नातू झाला*
   ★ अर्थ ::~ एका हानीबरोबर दुसऱ्या गोष्टीचा फायदा होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

29. *अलसस्य कुतो विद्या ।*
     ⭐अर्थ ::~ आळशी मनुष्याला विद्या कशी मिळणार ?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

  🛡 *★29. जानेवारी★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २९ वा दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१८८६ : कार्ल बेंझ याला जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्‍या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.
●१८६१ : कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.
●१७८० : जेम्स ऑगस्टस हिकी यांनी ’कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर’ या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले. ’हिकी’ज बेंगॉल गॅझेट’ या नावाने ओळखले जाणारे हे वृत्तपत्र म्हणजे भारतातील पत्रकारितेची सुरुवात मानली जाते.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७० : राज्यवर्धनसिंग राठोड – ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज
◆१९२६ : डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते
◆१९२२ : प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक
◆१८५३ : मधुसूदन राव – आधुनिक ओडिया साहित्याच्या तीन प्रवर्तकांतील एक प्रवर्तक.
◆१२७४ : संत निवृत्तीनाथ
   (मृत्यू: १७ जून १२९७)

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : पांडुरंग सावळाराम तथा काका वडके –  शिवसेना नेते
●१९९५ : रुपेश कुमार – रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते व दिग्दर्शक
●१९९३ : रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय – गणितज्ञ
●१९६३ : सदाशिव आत्माराम जोगळेकर – लेखक व संपादक.
●१५९७ : महाराणा प्रताप – मेवाडचा सम्राट (जन्म: ९ मे १५४०)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

29. *✸ अंतरी अपुल्या✸*
      ●●●●००००००●●●●
अंतरी अपुल्या असावी एकतेची आस
एकता निर्मू अशी जी संपवी वनवास
॥धृ॥

🎹 सर्व सुखी जन सर्वही त्राते
सर्व सारखे सर्वही भ्राते
दुःख खिन्नता भिन्नता नेइल जी विलयास॥१॥

🎹 परंपरेचा ध्वज संस्कृतिचा
केन्द्र मानुया सकल कृतीचा
पक्ष भेद वा मतमतांतरे ठरोत की आभास॥२॥

🎹 शक्तिशालिनी नव स्वतंत्रता
तशीच योजू निज कल्पकता
देश आपुला अखंड करु या लागो एकच ध्यास॥३॥

🎹 घराघरातुन राष्ट्रहितास्तव
निघोत सेवक वाढो वैभव
भावी भारत अभिमानाने स्मरेल तो इतिहास॥४॥

🎹 सामावुनिही घेइल जगता
अशी सुमंगल भारतियता
मांगल्याच्या विश्वशांतिच्या देइल संदेशास ll ५ ll
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

29.  *✹धार वज्राची मिळू दे !✹*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !

पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटतांना दर्वळू दे !

लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

29.   *❃❝ अहंकार ❞❃*
      ━━═•●◆●★●◆●•═━━
    उपनिषदातील एक प्रसंग आहे. परमेश्‍वराने देवांवर कृपा केली आणि त्‍यांनी शक्तिशाली असुरांवर विजय मिळविला. विजयी झाल्‍यावर प्रत्‍येक देवतेला अहंकार निर्माण झाला. त्‍यातील प्रत्‍येक जण विजयाचे श्रेय स्‍वत:कडे घेत आणि दुस-याचे योगदान तुच्‍छ मानत असे. यामुळे देवतांमध्‍ये विनाकारण वाद चालु झाले. त्‍यातून कटूता निर्माण होऊ लागली. हे पाहून परमेश्‍वराने विचार केला की असेच जर होत राहिले तर असुर परत देवांवर चढाई करतील आणि यांच्‍यातील वैमनस्‍य यांना पराजित करेल. ही समस्‍या सोडविण्‍यासाठी ईश्‍वर एक विशाल यक्षाच्‍या रूपात देवतांच्‍या समोर हजर झाले. देवतांनी आश्‍चर्याने त्‍यांना पाहिले आणि त्‍यांचा परिचय करून घेण्‍यासाठी सर्वात प्रथम अग्नि देवतेकडे गेले. यक्षाने त्‍यांना विचारले,''आपण कोण आहात?'' अग्नि देवतेने स्‍वाभिमानाने उत्तर दिले,'' आपण मला ओळखत नाही? मी तेजस्‍वी अग्नि आहे. मी ठरवल्‍यास सारी पृथ्‍वी जाळून भस्‍म करून टाकीन.'' यक्षाने त्‍यांना एक वाळलेली गवताची काडी ती जाळण्‍यास सांगितले. परंतु अग्नी देवता ती जाळू शकले नाहीत. मग पवन देवता यक्षाचा परिचय जाणून घेण्‍यासाठी गेले. तेव्‍हाने यक्षाने त्‍यांनाही परिचय विचारला मग पवन देव म्‍हणाले,'' मी पवन आहे, मी ठरवले तर संपूर्ण ब्रह्मांड उडवून देईन.'' यक्षाने तीच वाळलेली काडी त्‍यांना उडवण्‍यास सांगितले. पण पूर्ण जोर लावूनसुद्धा पवनराज ती काडी उडवू शकले नाही. त्‍यानंतर इंद्र या देवतेकडे निघाले, तोपर्यंत यक्ष निघून गेले होते. आता तेथे पार्वती प्रकट झाली आणि इंद्राला यक्षरूपी परमेश्‍वराचा परिचय दिला. आता देवतांना त्‍यांच्‍या शक्तीचा अंदाज दिला होता आणि त्‍यांचा अहंकार नष्‍ट झाला.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  अहंकार आणि अहंकार्‍याचे पतन निश्चितच होत असते. आपली शक्ती योग्य कार्याला लावल्यास जीवनाचे सार्थक होत असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

29. *अपमानाचे उत्तर एवढे*
              *नम्रपणे द्या* ,
*कि अपमान करणाऱ्याला स्वताची*
       *लाज वाटली पाहिजे....*
               *रूबाब हा*
*जगण्यात असला पाहिजे...!!*
          *वागण्यात नाही ..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

29. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
▶️ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?
      *👉🏿  रायगड*

▶️महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ................ येथे पडतो.
     *👉🏿 आंबोली (सिंधुदुर्ग)*

▶️ पढरपूर हे शहर .............. या नदीकाठी आहे. आणि त्या नदीलाच महाराष्ट्राची काशी म्हणतात.
     *👉🏿 भीमा*

▶️कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?
      *👉🏿  गोदावरी*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ].  ❂ व्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

29. *❒हसमुख धीरजलाल सांकलिया❒*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १० डिसेंबर १९०८
●मृत्यू :~ २८ जानेवारी १९८९
●उत्खननविषयक संशोधन...

  ★ हसमुख धीरजलाल सांकलिया★

    हे भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे एक पुरातत्त्ववेत्ते होते.
एच.डी. सांकलिया यांचा जन्म मुंबई येथे एका गुजराथी कुटुंबात झाला. सुरुवातीला सांकलिया संस्कृतचे अभ्यासक होते. त्यांनी नालंदा विद्यापीठ या विषयात एम.ए. केले होते. नंतर त्यांनी "गुजराथचा पुरातत्त्वीय अभ्यास" या विषयावर लंडन विद्यापीठाची आचार्य (पीएच.डी.) ही पदवी मिळवली.

     हसमुख धीरजलाल सांकलिया यांनी भारतात ठिकठिकाणी उत्खनने घडवून आणली. पेहेलगाम, नाशिक, अहमदाबादजवळ लांघणज, जोर्वे, नेवासे, पुण्याजवळील इनामगाव, कोल्हापूरजवळ ब्रह्मपूर अशा अननेक ठिकाणी त्यांनी उत्खनने केली. या उत्खननातून मानवी सांगाडे, घरांचे नमुने, नाणी, हत्यारे, दागिणे, धान्यांचे अवशेष असे अनेक प्रकार त्यांना मिळाले. त्यावर अभ्यासपूर्ण संशोधन करून त्यांनी अनेक संस्कृती प्रकाशात आणल्या. ब्रह्मपूरचा रोमशी होत असलेला व्यापार सांकलियांनी दाखवून दिला तसेच द्वारकानगरीची प्राचीनता महाभारत काळापर्यंत जात नाही हे सिद्ध केले. वाङमय व भूगोल यांच्या अभ्यासातून रावणाची लंका म्हणजे श्रीलंका देश नव्हे असे मतही त्यांनी मांडले.
           ◆ पुरस्कार ◆
   पुरातत्त्वशास्त्रातल्या मौलिक योगदानाबद्दल सांकलियांना भारत सरकारने इ.स. १९७४ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁बुधवार ~ 29/01/2020❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment