"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*29/08/24 गुरूवार परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *29. ऑगस्ट:: गुरूवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण कृ.११,पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~एकादशी, नक्षत्र ~आर्द्रा,
योग ~सिद्धि, करण ~बव,
सूर्योदय-06:22, सूर्यास्त-18:55,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

29. *उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

29. *वरातीमागून घोडे –*
   ★ अर्थ ::~  एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

29.  *भावे हि विद्यते देव: ।*
  ⭐अर्थ :: ~ भाव तेथे देव.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

🛡 ★ 29. ऑगस्ट ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ राष्ट्रीय क्रीडा दिन
★ हा या वर्षातील २४१ वा (लीप वर्षातील २४२ वा) दिवस आहे.

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७४ : चौधरी चरणसिंग यांनी ’भारतीय लोक दल’ या राजकीय पक्षाची स्थापना केली.
●१९४७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष झाले.
●१९१८ : लोकमान्य टिळक यांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
●१८२५ : पोर्तुगालने ब्राझिलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५८ : मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता
◆१९०५ : *मेजर ध्यानचंद – भारतीय हॉकीचे जादुगर*
◆१९०१ : पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील – सहकारमहर्षी
◆१८८० : लोकनायक माधव श्रीहरी तथा 'बापूजी' अणे  (मृत्यू: २६ जानेवारी १९६८)
   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
◆•••°°~°°••◆••°°~°°•••◆
●२००८ : जयश्री गडकर – अभिनेत्री
●२००७ : बनारसी दास गुप्ता – स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री
●१९८६ : गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
●१९७६ : काझी नझरुल इस्लाम –  स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी.
●१९६९ : मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

   https://urlzs.com/18er9
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

29.  *✸ माझ्या भारताचे गुण ✸*
●●●●००००००●●●●
माझा भारत महान
नाही लहान सहान
भुकेल्यांची भागवू रे
आम्ही भूकही तहान ।।धृ।।

मैत्री अशी निभवू रे
राहू प्रसंगी गहाण
शत्रू साठी सदा सज्ज
सारे जवान किसान ।।१।।

हिंदी आम्ही नका आम्हा
समजू रे हीन दीन
धन हृदयी आमुच्या
सदा शांती समाधान ।।२।।

आम्हावर आतिरेक
नाही बात ही आसान
अंत होताच शांतीचा
सोडू युध्दाचाही बाण ।।३।।

धर्म एक मानवता
आम्ही आहोत जाणून
शेती बाडी घरे बिरे
आम्ही पाहू मागाहून ।।४।।

काय सांगू आणखीन
माझ्या भारताचे गुण
सदा शांतीचा क्रांतीचा
इथे येतो जातो क्षण ।।५।।
     ~सौ.मंगला मधुकर रोकडे, धुळे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

29. *❂ असो तुला देवा माझा ❂*
  ━━●✶✹★★✹✶●━━               
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार
॥धृ॥
तुझ्या कृपेने रे होतील फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥
तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥
तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरी मिळेल
तरी प्रभो ! शतजन्मांची मतृषा शमेल
तुझे म्हणुनी आलो राया ! बघत बघत दार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥
                ~ साने गुरुजी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

29. *❝ प्रत्येक संधीचे सोने करा ❞*
━━•●◆●★★●◆●•═━
     एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,

      भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा  म्हणाला " महाशय तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ?  काही त्याला शिकवा.

      त्याला सोने आणि चांदी यात
जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही " आणि ; मोठ्याने हसू लागला ....
     हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ... तो घरी गेला ....

    त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? " " सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला

   " हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ? म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!

     माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!! मुलगा म्हणाला
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...

       रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे. मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो ..  त्याच्या सोबत गावातील
सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात....

      राजा एका हातात सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..

     आणि , मी चांदीचे नाणे उचलतो ..
त्यामुळे तिथे असलेले सगळे
मोठ्याने हसतात ... सार्यांना मजा वाटते......!! असे रोज घडते

      मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो
चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही

     न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"

     मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला
कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या
नाण्यांनी भरलेली होती ...
हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..

   मुलगा म्हणाला
" ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल ..  त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल तर येवू द्या ..

पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.

मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा..!!
काय वाटते ?
    हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

29.  *संपूर्ण जग सुंदर आहे*,
       *फक्त तसं पहायला हवं*.
    *प्रत्येक नातं जवळचं आहे*,
      *फक्त ते उमजायला हवं*.
     *प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे*,
     *फक्त तसं समजायला हवं*.
       *प्रत्येक वेळेत समाधान*
         *आणि आनंद आहे*,
       *फक्त तसं जगायला हवं..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
29. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  जगात सर्वांत जास्त जड पाण्याची निर्मिती कोणता देश करतो ?
➜ भारत.

✪  'फास्टर फेणे' या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
➜ भा. रा. भागवत.

✪  प्रथम विश्वकप क्रिकेट स्पर्धा कधी आयोजित करण्यात आली होती ?
➜ इ.सन.१९७५.

✪  पहिले ई - पंचायत सुरू करणारे राज्य कोणते ?
➜ महाराष्ट्र.

✪  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या काॅलेजमधे प्राध्यापक म्हणून काम केले ?
➜ सिडनेहॅम काॅलेज.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

29. *❒ मेजर ध्यानचंद सिंग ❒* 
━═•●◆●★★●◆●•═━
*★ भारतीय हॉकीचे जादुगर  ★*
     ◆यांचा आज जन्म दिवस◆
           त्यानिमित्त त्यांना
        *विनम्र अभिवादन..!!*
     🙏🐾🌷🌹🌷🐾🙏

*●जन्म :~ २९ आॅगस्ट १९०५*
●मृत्यू :~  ३ डिसेंबर १९७९

   हे भारतीय हॉकी चे नावाजलेले खेळाडू होते. त्यांना *हाॅकीचे जादूगार*
          म्हणून संबोधले जायचे.
   *त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये _आॅलिम्पिक सुवर्ण पदक_ मिळवून दिले.*
     ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळला. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक गोल केले.

         *◆ बालपणीचे जीवन◆*
    ध्यानचंद यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. त्यांचे मोठे भाऊ रूपसिंग हे सुद्धा हॉकीचे खेळाडू होते. ध्यानचंद यांचे वडिल सामेश्वर दत्त सिंग हे ब्रिटीश सैन्यात होते. ते सुध्दा सैन्यात हाॅकी खेळायचे. अशाप्रकारे ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले.

          *◆ अविस्मरणीय क्षण ◆*
   १९३६ ऑलंम्पिक फायनल भारतीय टीम चे मैनेजर पंकज गुप्ता यांनी खेळाडुंचे कसब पनाला लावण्यासाठी...
    खेळाडुंना ड्रेसिंग रूम मध्ये घेऊन गेले. त्यांनी तिरंगा झेंण्डा खेळाडुंच्या समोर ठेवला आणि म्हणाले  *"कि इसकी लाज अब तुम्हारे हाथ है।"*
सर्व खेळाडुंनी श्रद्धापूर्वक तिरंग्याला सलाम केला आणि वीर सैनिका प्रमाने मैदान मध्ये उतरले. भारतीय खेळाडुं सुंदर खेळले आणि जर्मन  टीमला 8-1 गोल ने हरविले. त्या दिवशी खरोखर तिरंग्याची लाज राखल्या गेली.
त्या वेळेस कोणी कल्पना सुध्दा केली नाही की 15 अॉगस्ट लाच  भारताचा स्वतन्त्रता दिवस राहिल...!!

           *◆ सम्मान ◆*
     मेजर ध्यानचंद यांना १९५६ मध्ये भारताचा प्रतिष्ठित नागरिक सम्मान पद्मभूषण देऊन सम्मानित केले.
      यांचा जन्म 29 अॉगस्ट 1905 इलाहाबाद, संयुक्त प्रांत, ब्रिटिश भारत मध्ये झाला. यांचा जन्मदिवसहा  भारताचा *राष्ट्रीय खेल दिवस* म्हणून घोषित केला आहे.
       याच दिवशी उत्कृष्ट खेळ प्रदर्शन करणारे खेळाडुंना राष्ट्रीय पुरस्कार अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार दिले जाते. भारतीय ओलम्पिक संघाने ध्यानचंद यांना *शताब्दी खेळाडु* घोषित केले होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁गुरूवार~29/08/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


No comments:

Post a Comment