🎯बाल आनंद मेळावा सूत्रसंचालनासाठी--
बांधुनी तोरण आनंदाचे
हा दिन असा साजरा व्हावा
बालकांचा जीव इथे रुळावा
तयांना आनंद आनंद मिळावा
वैविध्य साधत खाद्य पदार्थांनी
तृप्ततेचा ढेकर इथे मिळावा
पंख लावुनी या आनंदाला
भरवू बालकांचा आनंद मेळावा
गंमत जंमत करुनी सारे
हसतील नाचतील इथे बालक
दौलत राष्ट्राची ही रक्षिण्या
*होवुया आपण सुज्ञ पालक
नाचुया खेळुया बागडुया इथे
चित्रातही रंग भरुया इथे
धमाल मजा करुया इथे
नको ती भीती नको ते दडपण
फुलाप्रमाणे डोलुया,फुलुया इथे
❂~◆~●~~●~~●★●~~●~~●~◆~❂
❂~◆~●~~●~~●★●~~●~~●~◆~❂
■ बाल मेळाव्यासाठी चारोळ्या
१) बाल आम्ही
गोपाळ आम्ही
आनंद लुटु
जीवनी आम्ही
२) शिक्षण, विज्ञान ,तंत्रज्ञान
लूटतो ज्ञान आनंदात
अन् रंगून ही जातो आम्ही
बाल आनंद मेळाव्यात
३) आनंदुन गेला
आनंद सारा
बाल आनंद मेळाव्याचा
उत्साह न्यारा ....
४)आनंदाचे पक्षी उडाले
खेळांचे मोर थुईथुई नाचू लागले
फुलपाखरे ही बागडू लागली
धुंदीत आनंदाच्या न्हाऊन निघाली .....
५) डिंजनी चे पाहुणे
शाळेत आले ....
पाहून त्यानां सारे
आनंदी झाले ....
६) साऱ्याचिंच आमची
गट्टी जमली
बाल आनंद मेळाव्याला
धम्माल आली
७)बाल आनंद मेळाव्यातचं
आमचा आनंद सारा
अभ्यासाच्या ओझ्या खाली
दडपू नका आमचा आनंद सारा
No comments:
Post a Comment