"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *04/07/23 मंगळवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

  🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://urlzs.com/dmQmp

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *04. जुलै:: मंगळवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ कृ. ०१, पक्ष :कृष्ण पक्ष, 

तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~पूर्वाषाढा, 

योग ~इन्द्र, करण ~कौलव, 

सूर्योदय-06:05, सूर्यास्त-19:20,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]       ❂ सुविचार ❂* 

  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━


04. *मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


04. *इकडे आड़ तिकडे विहीर*

              ★ अर्थ ::~ 

 दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


04. *बली बलं वेत्ति न वेत्ति निर्बलः।*

    ⭐अर्थ ::~ बलवान माणूसच बळाची नीट परीक्षा करू शकतो. बलहीन ते जाणू शकत नाही.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


     *🛡 ★ 04. जुलै ★ 🛡*

🔻====●●●★●●●====🔻

★अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन

★हा या वर्षातील १८५ वा (लीप वर्षातील १८६ वा) दिवस आहे.

★संत मुक्ताबाई स्मृतीदिन


    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~

🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●१९९९ : लष्कराच्या १८ व्या बटालियनने कारगिलमधील द्रास या उपविभागातील ’टायगर हिल्स’ हा लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला. 

●१९९७ : ’नासा’चे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.

●१९४७ : ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताचे ‘भारत‘ व ‘पाकिस्तान‘ असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.

●१९११ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकांतवासास प्रारंभ


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९२६ : विनायक आदिनाथ तथा ’वि. आ.’ बुवा – विनोदी साहित्यिक 

◆१९१२ : पं. निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक 

◆१८९८ : गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते 

◆१७९० : भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●१९९९ : वसंत शिंदे – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित 

●१९६३ : पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार 

●१९३४ : मेरी क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ 

●१९०२ : *स्वामी विवेकानंद–भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रसार करणारे तत्त्वज्ञ*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

 ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


04. *✸ देश हीच माता ✸*

      ●●●●●००००००●●●●●

देश हीच माता, देश जन्मदाता

घडो देशसेवा ऐसी बुद्धी दे अनंता


धर्म पंथ नाही आम्हां जात-गोत नाही

मुले माणसाची अम्ही, वंश माणसाई

मनी आमुच्या ना काही न्यूनता, अहंता


खुली ज्ञान-विज्ञानाची, कलांची कवाडे

सुखे लाभ घेऊ त्यांचा शिकू रोज थोडे

उद्या उंच होऊ आम्ही धरू योग्य पंथा


विस्मरू न अम्ही केव्हा ध्येय, देशनिष्ठा

नव्या भारताला देऊ जगी या प्रतिष्ठा

सर्वसाक्षी सर्वागत तू आम्हां यशोदाता

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


04. *❂ ऐ मालिक तेरे बन्दे हम ❂*

   ━━═●✶✹★●★✹✶●═━━

ऐ मालिक तेरे बन्दे हम

ऐसे हों हमारे करम

नेकी पर चलें और बदी से टलें

ताकि हंसते हुए निकले दम


ये अंधेरा घना छा रहा

तेरा इंसान घबरा रहा

हो रहा बेखबर, कुछ न आता नज़र

सुख का सूरज छुपा जा रहा

है तेरी रोशनी में जो दम

तो अमावस को कर दे पूनम

नेकी पर... 


जब ज़ुल्मों का हो सामना

तब तू ही हमें थामना

वो बुराई करें, हम भलाई भरें

नहीं बदले की हो कामना

बढ़ उठे प्यार का हर कदम

और मिटे बैर का ये भरम

नेकी पर...


बड़ा कमज़ोर है आदमी

अभी लाखों हैं इसमें कमी

पर तू जो खड़ा, है दयालू बड़ा

तेरी किरपा से धरती थमी

दिया तूने हमें जब जनम

तू ही झेलेगा हम सबके ग़म

नेकी पर..

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


04.   *❝ विश्वासाला तडा ❞*

     ━━═•●◆●★●◆●•═━━

       राम नावाच्‍या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्‍या घोड्याची काळजी घ्‍यायचा. त्‍यामुळे त्‍या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते.


         शाम नावाच्‍या एका घोड्याच्‍या व्‍यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्‍याला तो घोडा फारच आवडला.


       शामने तो घोडा मिळविण्‍याचे कारस्‍थान रचले. शामने रामच्‍या रोजच्‍या येण्‍याजाण्‍याच्‍या रस्‍त्‍यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्‍याचे नाटक करत बसला.


          दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्‍हा शाम जोरजोराने विव्‍हळू लागला, गयावया करू लागला. रामने ते पाहिले व तो शामपाशी थांबला.


       शाम रामला म्‍हणाला, ’’मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्‍या गावापर्यंत नेशील का,’’


       रामला त्‍याची दया आली, त्‍याने त्‍याला घोड्यावर बसविले, आणि स्‍वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच शाम त्‍याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्‍याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला.


       दुस-या दिवशी शाम रामकडे आला व म्‍हणाला,’’ अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्‍हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्‍यावे लागले.’’


         यावर राम शांतपणे शामला म्‍हणाला,’’


         मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्‍ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्‍ट ऐकल्‍यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्‍वासघात करणे महापाप आहे.

 

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

    गरजूला मदत करण्‍यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


04.    आयुष्यात घेण्यापेक्षा

       देणं महत्वाचे आहे.

शत्रुला क्षमा द्या.

   प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या.

        मित्राला ह्रदय द्या.

             मुलांना तुमचं उदाहरण द्या.

     वडिलांना पुज्य भाव द्या.

आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या.

      स्वत:ला आत्मसन्मान द्या 

            आणि जगाला सेवा द्या.

प्रत्येकाला काहीतरी द्यायचंच आहे

       हे विसरू नका..!!  

    घेणार-यापेक्षा देणा-यालाच

            प्रतिष्ठा मिळते.   

     इतिहासही ह्याला साक्षी आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


04. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


✪  कोणत्या झाडापासून कात मिळतो ?

 ➜खैर.


 ✪ आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा केला जातो ?

 ➜८ मार्च.


 ✪ हत्तीरोगाचा प्रसार कोणत्या डासांमुळे होतो ?

 ➜ क्युलेक्स मादी.


✪  अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला ?

 ➜कोलंबस,इटालियन खलाशी.


 ✪ आग विझविण्यासाठी कोणता वायू वापरला जातो ?

 ➜ Co2.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


04.  *🔻स्वामी विवेकानंद🔻* 

     ┄─┅━━▣▣▣━━┅─┄

    भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर 

        प्रसार करणारे तत्त्वज्ञ,

 _*🐾यांचा आज स्मृतिदीन*_🐾

         _त्यानिमित्त त्यांना_

      _*विनम्र अभिवादन..!!*_

   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏

      *दिव्यत्वाची जेथ प्रचीती*

      *तेथे कर माझे जुळती ..!!*

🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏


●पूर्ण नाव:- नरेंद्रनाथ विश्वनाथ                                      दत्त   (संन्यासाश्रमापूर्वी)  

●जन्म :~  12 जानेवारी 1863, 

       कोलकाता, पश्चिम बंगाल,भारत.

●मृत्यू :~ 4 जुलै 1902, 

          बेलूर,कोलकाता,भारत.

●प्रमुख विषय :~ वेदान्त,योग.

●प्रभाव :~ रामकृष्ण परमहंस.


        *◆ स्वामी विवेकानंद ◆*

      यांचा जन्म झाला तो दिवस योग योगाने तो दिवस मकर संक्रांतीचा होता. बाळाचा नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचारांचा आणि दयाळू स्वभावाचे होते. आई ह्या धार्मिक विचाराच्या होत्या. नरेंद्राच्या विचारसरणीला आकरा देण्यात त्यांच्या पालकांचा वाट आहे.


          *◆ कॉलेज शिक्षण ◆*

     1871 ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इंस्टिट्यूशनमध्ये प्रवेश .

1879 प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण , काही दिवस नंतर  जनरल असेम्बलीज    इंस्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी  तर्कशास्त्र, पाश्चात्य तर्कशास्त्र आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला.

1884 बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.


       *◆विवेकानंद नामकरण◆*

    राजा अजितसिंग खात्री यांनी 10 मे 1893 या दिवशी स्वामीजींना *विवेकानंद* असे नाव दिले.

       रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली. 


     *◆ शिकागो, अमेरिका येथील सर्वधर्मपरिषद ◆*

         11 सप्टेंबर 1893  साली अमेरिकेतील शिकागो शहरात सर्वधर्मपरिषद भरली होती. ह्या परिषदेत त्यांनी सनातन धर्माचे प्रति निधीत्व करताना, वेदांतावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले.


              ◆ समाधी ◆

      4 जुलै 1902 कोलकात्या जवळील बेलूर मठात समाधी घेतली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही  अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक उभे आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••

            *✍संकलन ✍* 

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

   ♦📱 7875840444 ♦

 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*

█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌


 *❁ मंगळवार~04/07/2023❁*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment