12/04/26 रविवारचा परिपाठ
❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂
*महाराष्ट्र शिक्षक परिवार*
*❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀*
*💲शालेय परिपाठ💲*
❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉
🇮🇳 *राष्ट्रगीत* 🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤
♦ *प्रतिज्ञा* ♦
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤
🇮🇳 *संविधान* 🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤
🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
💎 *सर्वप्रकारची शैक्षणिक माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी...*
🔘 *"माझी शाळा" ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 १२. एप्रिल :: रविवार 🍥
⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺
वैशाख कृ.१०, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~दशमी, नक्षत्र ~धनिष्ठा,
योग ~शुभ, करण ~वणिज,
सूर्योदय-06:24, सूर्यास्त-18:53
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━
12. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
12.*करावे तसे भरावे*
*★ अर्थ ::~*
आपण जशी कृती करतो तसे त्याचे आपल्याला फळ मिळते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
12. *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
⭐अर्थ ::~
क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🛡 *★12. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील १०२ वा (लीप वर्षातील १०३ वा) दिवस आहे.
~*★महत्त्वाच्या घटना★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : गेल्या शतकातील साठच्या दशकात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणारे सी. सुब्रम्हण्यम यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
●१९९७ : पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.
●१९६१ : रशियाचा युरी गागारिन हा अंतराळात भ्रमण करणारा पहिला मानव बनला. त्याने अंतराळात १०८ मिनिटे भ्रमण करुन पृथ्वीप्रदक्षिणा केली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५४ : सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार
◆१९४३ : सुमित्रा महाजन – केंद्रीय मंत्री
◆१९१० : पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक
◆१८७१ : वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०२६:आशा भोसले - दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण (जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली)
●२००६ : राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक
●२००१ : देवांग मेहता– भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष ऑस्ट्रेलियात निधन
●१९४५ : फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष
●१९०६ : महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्न’ भट्टाचार्य
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
12. *✸ उषःकाल होता होता ✸*
●●●●●००००००●●●●●
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी ?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !
तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तोच दंश करिती आम्हां साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !
तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हांवरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली !
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !
उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली !
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेंच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] 💎 प्रार्थणा 💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
12. *❂ असो तुला देवा माझा ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥
तुझ्या कृपेने रे होतील फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥
तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥
तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरी मिळेल
तरी प्रभो ! शतजन्मांची मतृषा शमेल
तुझे म्हणुनी आलो राया ! बघत बघत दार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
12. *❃❝ अतिमोह ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एकदा एका उंदराला काहीही खायला न मिळाल्यामुळे एका बंद खोलीत एका झरोक्यातून गेला. त्याला तिथेसुध्दा खायला काहीही दिसले नाही. शेवटी एका कोपर्यात एक टोपली दिसली. उंदराला वाटले की,या टोपलीत काही तरी खायला असेल. पण ती टोपली उघडेनाच. इतक्यात तिथे एक ब्रेडचा तुकडा घेऊन दुसरा उंदीर तिथे आला. पहिला उंदीर त्याला म्हणाला, बरं झालं बुवा तू ब्रेड आणलास ते. मला खूप भूक लागलीय. आपण दोघे मिळून खाऊया. दुसरा उंदीर म्हणाला ठीक आहे. दोघांनी तो ब्रेड वाटून घेतला. पण थोड्या वेळाने पहिल्या उंदराला काही शांत बसवेना. तो म्हणाला, ही टोपली उघडत नाही. आपण दोघे मिळून कुरतडू. दुसरा उंदीर म्हणाला,मी आहे त्यात समाधानी आहे. सकाळ होताच आपण दुसरे अन्न शोधू. राहू दे त्या टोपलीला कुरतडायचे. पण पहिल्या उंदराला ते काही पटले नाही. तो टोपली कुरतडू लागला. ते पाहून दुसरा उंदीर निघून गेला. सकाळ होईपर्यंत त्या टोपलीला बरेच कुरतडले. उंदराला वाटले की,आतमध्ये भरपूर अन्न असेल. आपल्याला बरेच दिवस मिळेल. इतक्यात त्यातून एक मोठा भुकेलेला साप आला आणि त्याने उंदरालाच खाऊन टाकले.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
काही काही वेळा अतिमोहापायी स्वत:चा प्राणही गमवावा लागतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
12. *सुख माणसाच्या अहंकाराची परिक्षा घेते तर दुःख माणसाच्या धैर्याची दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
12. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ तांबे व जस्त यांच्या मिश्रणातून काय बनते ?
➜पितळ.
✪ भारताच्या पूर्व दिशेला कोणता देश आहे ?
➜बांग्लादेश.
✪ 'द थर्ड पीलर' या पुस्तकाचे लेखक कोण ?
➜रघुराम राजन.
✪ सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ?
➜कोपर्निकस.
✪ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालय कोठे आहे ?
➜दुबई.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
12. ❒ आशा भोसले ❒
━━═•◆●★◆★●◆•═━━
●जन्म :~ ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली
●मृत्यू :~ १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले
यांनी भारतीय संगीतविश्वात अतुलनीय योगदान दिले. त्यांच्या आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सुमारे १२,००० हून अधिक गाणी विविध भाषांमध्ये गायली आणि प्रत्येक गाण्यात वेगळेपण जपले. हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली.
आशा भोसले यांची खासियत म्हणजे त्यांचा बहुरंगी आवाज. रोमँटिक गाणी, गझल, भक्तीगीत, कॅबरे, पॉप किंवा लोकसंगीत — प्रत्येक शैलीत त्यांनी सहजपणे स्वतःला ढाळले. विशेषतः R. D. Burman यांच्यासोबत केलेले त्यांचे काम अत्यंत गाजले. “दम मारो दम”, “पिया तू अब तो आजा” यांसारख्या गाण्यांनी त्यांनी नव्या पिढीला आकर्षित केले, तर “इन आँखों की मस्ती” सारख्या गझलांनी रसिकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले.
त्यांनी केवळ चित्रपटसंगीतातच नव्हे, तर खासगी अल्बम, गझल, आणि आंतरराष्ट्रीय संगीत प्रकल्पांमध्येही आपली छाप उमटवली. त्यांच्या आवाजातील ऊर्जा, लवचिकता आणि भावपूर्ण सादरीकरण यामुळे त्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्थान ठरल्या.
पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारांसारख्या सर्वोच्च सन्मानांनी गौरवलेल्या आशा भोसले यांनी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांचे योगदान केवळ गाण्यांपुरते मर्यादित नाही, तर त्यांनी संगीताला एक नवा आयाम दिला. आज त्या आपल्या सोबत नसल्या तरी त्यांचा स्वर, त्यांची गाणी आणि त्यांची परंपरा सदैव जिवंत राहील. 🎶🙏
पद्मविभूषण व दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या आशाताईंनी हिंदी, मराठीसह विविध भाषांमध्ये आपला ठसा उमटवला होता. आशा भोसले यांसारखी बहुगुणी, अष्टपैलू गायिका पुन्हा होणे कठीणचं...!! त्यांच्या आवाजात भावना, चपळता, गोडवा आणि ऊर्जा यांचा अद्भुत संगम होता. प्रत्येक गाण्यातून त्यांनी वेगवेगळ्या भावना जीवंत केल्या—कधी खट्याळ, कधी विरहपूर्ण, तर कधी अगदी हळुवार, आज त्यांच्या जाण्याने एक अद्वितीय आवाज हरपला आहे. संगीतविश्वातली एक सुवर्णपान संपल्यासारखं वाटतंय. त्यांच्या स्वरांची जादू सदैव आपल्या मनात घुमत राहील, आपल्या आवाजाने पूर्ण विश्वाला आपलंसं केलेल्या आशाताई भोसले यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑★✹🔅✹★◑◎●•
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*❂ महाराष्ट्र शिक्षण मित्र ❂*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁रविवार ~12/04/2026❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment