"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*06/08/24 मंगळवार चा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://goo.gl/RpQbsw

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *06. ऑगस्ट:: मंगळवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

श्रावण शु.२,पक्ष :शुक्ल पक्ष,

तिथि ~द्वितीया,नक्षत्र ~मघा, 

योग ~वरीयान् , करण ~बालव, 

सूर्योदय-06:06, सूर्यास्त-19:20,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]       ❂ सुविचार ❂* 

  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━


06. *गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━═●🇲=◆🇸◆=🇵●━━


06. *झाकली मूठ सव्वा लाखांची*

           *★अर्थ ::~* 

   आपल्या अंगी असलेले दुर्गुण उघड करू नयेत.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


06.     *गुरुसेवा गया प्रोक्ता ।*

     ⭐अर्थ :: ~ गुरूंची सेवा गया या तीर्थक्षेत्राप्रमाणे आहे. (गुरुसेवेने तीर्थक्षेत्री गेल्याचे फळ मिळते.)

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


     🛡 ★ 06. ऑगस्ट ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻

★अणूबॉम्ब निषेध दिन:हिरोशिमा दिन

★हा या वर्षातील २१८ वा (लीप वर्षातील २१९ वा) दिवस आहे.


    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●१९९७ : कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यात सनत जयसूर्या याने ३४० धावा केल्या.

●१९४५ : अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणूबॉम्ब टाकला. यात ७०,००० जण तात्काळ मृत्यूमुखी पडले तर पुढील अनेक वर्षे लोकांवर किरणोत्सर्गाचा परिणाम झाला.

●१९२६ : जेरट्रूड एडर्ले ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९७० : एम. नाईट श्यामलन – भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक

◆१९२५ : योगिनी जोगळेकर – लेखिका, ४५ कादंबर्‍या, ४ कवितासंग्रह, ४ नाटके, १२ कुमार वाङ्‍मयाची पुस्तके इ. त्यांची साहित्य संपदा आहे. 

◆१८८१ : अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ 


   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●१९९९ : कल्पनाथ राय – केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), 

●१९६५ : वसंत पवार – संगीतकार

●१९२५ : सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि त्यातील जहाल गटाचे नेते,  ’राष्ट्रगुरू’ (जन्म: १० नोव्हेबर १८४८)

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या

 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*

   ━┅━▣◆★✧★◆▣═┅━


06. *✸ जय जवान जय किसान ✸*

     ●●●●००००००●●●●

एक सूर एक ताल, एक गाऊ विजयगान

जय जवान, जय किसान !

जय जवान, जय किसान, जय जय !


अखिल देश पाठीशी, 'जवान' व्हा रणी चला

किसान होऊनी कसा, भूमी सस्य श्यामला

यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान

जय जवान, जय किसान !


शत्रू मित्र जाणुनी सावधान सर्वदा

आपल्या श्रमे करू प्रसन्‍न देवी अन्‍नदा

उभ्या जगात आपुली सदैव उंच ताठ मान

जय जवान, जय किसान !


अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा

भूमिदास दाखवी निर्मितीत विक्रमा

स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधू आसमान

जय जवान, जय किसान !

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂* 

━┅═▣◆★✧★◆▣━┅━


06. *❂ हीच अमुची प्रार्थना ❂* 

   ━━●✶✹★★✹✶●═━

हीच अमुची प्रार्थना

अन् हेच अमुचे मागणे २

माणसाने माणसाशी

माणसासम वागणे...


हीच आमची प्रार्थना...२ 


धर्म, जाती, प्रांत, भाषा

द्वेष सारे संपू दे...२

एक निष्ठा, एक आशा,

एक रंगी रंगू दे..


अन् पुन्हा पसरो मनावर

शुद्धतेचे चांदणे.. 


माणसाने माणसाशी

माणसासम वागणे...


हिच आमची प्रार्थना ..


भोवताली दाटला

अंधार दुःखाचा जरी,

सूर्य सत्याचा उद्या

उगवेल आहे खात्री, २


तोवरी देई आम्हाला

काजव्यांचे जागणे

माणसाने माणसाशी

माणसासम वागणे ...


हिच आमची प्रार्थना ...


लाभले आयुष्य जितके

ते जगावे चांगले

पाउले चालो पुढे..

जे थांबले ते संपले


घेतला जो श्वास आता

तो पुन्हा ना लाभणे

माणसाने माणसाशी

माणसासम वागणे.....

हिच आमची प्रार्थना....

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


06.  *❃ शेवटी मी आई आहे..!! ❃*

 ━━═●◆●★★●◆●•━━

   एलीस हि महाराणी व्हिक्टोरिया यांची मुलगी होती. लग्नानंतर तिला मुलगा झाला. मुलाची देखभाल करण्यासाठी राजवाड्यात नोकर-चाकरांची काही कमी नव्हती. तरीही एलीस लहान बाळाची खूप काळजी घेत असे. सतत त्याच्या सोबत राहून ती त्याची देखभाल करीत असे. तो क्षणभर जरी दृष्टीआड झाला तरी तिला चैन पडत नसे. तिचा मुलगा मग १० वर्षाचा झाला. एके दिवशी त्याला संसर्गजन्य रोगाची लागण झाली. तज्ञानी त्याच्यावर उपचार सुरु केले. डॉक्टरांनी तपासणी करून सल्ला दिला कि काही दिवस सर्वांनी याच्यापासून दूर राहावे कारण हा अतिशय जीवघेणा संसर्ग असून तो श्वासोच्छवासाद्वारे फैलावू शकतो. त्यामुळे त्याच्या संपर्कात कुणीही येवू नये. या डॉक्टरांच्या सांगण्यामुळे सर्व नोकरांमध्ये भीती पसरली. कोणीही नोकरचाकर किंवा कुणीच त्याच्या खोलीत जायला तयार नसे. परंतु एलीसने त्या परिस्थितीतही मुलाला एकटे सोडले नाही. ती त्याची सेवा करतच राहिली. एके दिवशी मुलगा म्हणाला,"आई ! बरेच दिवस झाले तू माझी पापी घेतली नाही, मला कुशीत घेतले नाही." शेवटी आईचेच हृदय ते !! एलीसने मुलाला जवळ घेतले व मायेने त्याला कुरवाळले, त्याची पापी घेतली. बरेच वेळ ती त्याच्या सानिध्यात राहिली. नको तेच झाले, तिच्या मुलाच्या संपर्कात राहण्याने तीपण त्या रोगाच्या तावडीत सापडली. नंतर अनेकांनी तिला विचारले,"हा रोग जीवघेणा असतानासुद्धा व तुला ते माहित असताना ही तू मुलाला का जवळ केले? असे करणे म्हणजे वेडेपणा आहे असे तुला वाटले नाही का?" एलीसने उत्तर दिले,"मी आई आहे. मी माझ्या मुलाला तडफडत कसे एकटे सोडू? तो तळमळत होता आणि मी आनंदात कसे राहू? मला माझे बाळ महत्वाचे आहे." 

शेवटी मुलासोबतच एलीसचेही निधन झाले. एलीसच्या समाधीवर इतकेच लिहिले होते, शेवटी मी आई आहे !!


      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

  आई हे पृथ्वीतलावरचे ईश्वराचे रुप आहे. स्वत:च्या मुलासाठी तळमळते, प्रसंगी जीवही देते. मग ती आपली असो किंवा दुसर्‍याची ती दूखावली जाणार नाही याची आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहीजे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


06. *माणुस मनापर्यंत पोहोचला ...*

      *तरच नातं निर्माण होतं ...*

*नाहीतर ती फक्त ओळखच ठरते..!!*


*असे जगा की आपली 'उपस्थिती' कुणाला जाणवली नाही तरी चालेल...*

 *पण आपल्या 'अनुपस्थितीची' उणीव जाणवली पाहिजे..!!*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


06. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


✪  कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा रोग होतो ?

➜अ जीवनसत्व.


✪  सर्वांधिक नोबेल पारितोषिक मिळविणारा देश कोणता ?

➜अमेरिका.


✪  नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे ?

➜ वाशी.


✪  सविनय कायदेभंगाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली ?

➜ १९३०.


✪  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे कोठे १४ एप्रिल १९२९ ला शेतकरी परिषदेचे अध्यक्ष होते ?

➜ रत्नागिरी.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


06. *❒♦ सुषमा स्वराज  ♦❒* 

   ━═•●◆●★★●◆●•━━

उत्कृष्ट संसदपटू व पहिला संसदरत्न पुरस्कार प्राप्त करणाऱ्या माजी परराष्ट्रमंत्री 

◆जन्म :~ १४ फेब्रुवारी १९५२

◆मृत्यु :~ ६ ऑगस्ट २०१९


           ★ सुषमा स्वराज ★

   ह्याएक भारतीय राजकारणी, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकील होत्या. त्या भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या असून २६ मे २०१४ पासून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत होत्या; इंदिरा गांधीनंतर पदावर पद घेणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या. त्या संसदेचे सदस्य म्हणून सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या होत्या . १९७७ मध्ये २५ वर्षांच्या वयात त्या भारताच्या उत्तरेकडील राज्य असणाऱ्या  हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या.  त्यांनी १३ ऑक्टोबर १९९८ पासून ३ डिसेंबर १९९८ पर्यंत दिल्लीच्या ५ व्या मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्या दिल्ली राज्यातील दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९सालातील निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्या इ.स. २००० - २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री  आणि  संसदीय कार्यमंत्री ही मंत्रिपदे सांभाळली. त्या डिसेंबर २००९ ते मे २०१४ दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या.


◆भारताच्या परराष्ट्रमंत्री २६ मे २०१४ 

◆लोकसभा सदस्य १३ मे २००९ 

◆लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या २१ डिसेंबर २००९ 

◆दिल्लीच्या मुख्यमंत्री १३ ऑक्टोबर १९९८

◆राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष


     २०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या दुसर्यांदा मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून ४००,००० पेक्षा अधिक मतांच्या फरकाने जिंकून आल्या होत्या. २६ मे २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेटमध्ये ते परराष्ट्र व्यवहार मंत्री बनल्या. अमेरिकेतील प्रसिद्द दैनिक वॉल स्ट्रीट जर्नल यांनी स्वराज यांना भारताच्या 'आवडत्या राजकारणी' म्हणून ओळखले.


   प्रारंभिक जीवन आणि शिक्षण 


    सुषमा स्वराज किंवा चिंकू स्वराज (पूर्वाश्रमीच्या शर्मा)  १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरियाणातील अंबाला कॅन्टोन्मेंट येथे हरदेव शर्मा आणि श्रीमती लक्ष्मी देवी यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख सदस्य होते. त्यांचे आई-वडील पाकिस्तानातील लाहोरच्या धरमपूर भागातून भारतात स्थायिक झाले आहेत. स्वराज यांचे शिक्षण अंबाला छावणीतील सनातन धर्म महाविद्यालयात झाले असून संस्कृत व राज्यशास्त्रातून पदवी प्राप्त केली. त्यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे कायद्याचा अभ्यास केला. 


     १९७३ मध्ये, स्वराज यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम करण्यास सुरूवात केली.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••

           *✍ संकलन ✍* 

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

   ♦📱 7875840444 ♦

 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*

█║▌║▌║█❂█║▌║█║▌


 *❁मंगळवार ~06/08/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment