"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Saturday, October 15, 2022

★...अग्निपंख...★

 


भारतरत्न अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम

   नुसती वर्तमानपत्रे टाकून 

नाही होता येत डॅा.ए. पी.जे अब्दुल कलाम..... 

    आणि त्यांच्यासारखी हेअर स्टाईल डोक्यावर ठेवूनही नाही होता येत "मिसाईल मॅन"....

     त्यासाठी असावी लागते

डोक्यात नशा नवनिर्मितिची आतून तळमळ, जिद्द आणि स्वत:च्या लग्नाची तारीख विसरण्याइतकं झोकून देणं हाती घेतलेल्या देशकार्यासाठी.... 

   करावा लागतो अठरा तासांचा दिवस अभ्यासासाठी  आणि पाहावी लागतात दिवास्वप्नं...

    झोप उडवणारी लावून अग्निपंख घ्यावी लागते गनभरारी नव्या दिशेने


अनंत आकाशाच्या मर्यादा तोडण्यासाठी तेव्हा होता येतं डॅा.ए. पी.जे अब्दुल कलाम 

   यांना विनम्र अभिवादन

     बालपण अत्यंत परिश्रमात व्यतित करून अखंड ज्ञानाची साधना करणाऱ्या डॉक्टर कलाम यांना भारतरत्न, पद्मविभूषण, पदमश्री, इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता, रामानुजन, यासारखे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. किंग चार्ल्स दुसरा पदक,हुवर पदक देऊन त्यांचा जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ म्हणून गौरव केला गेला.यु के,सिंगापूर, अण्णा युनिव्हर्सिटी यांनी त्यांचा डॉक्टरेट देऊन सन्मान केला. स्वतंत्र भारताचे 11 वे राष्ट्रपती झाले हा मान प्रथमच एका शास्त्रज्ञ व्यक्तीला मिळाला होता. 

    देशाच्यासुरक्षितेच्या दृष्टीने त्यांनी अनेक मोहीम यशस्वीकेल्या. अर्जुन रणगाडा, लाईट कॉबॉट एअर क्राफ्ट,त्रिशूल व पृथ्वी हेअग्निबाण आकाश, नाग, अग्नी, ब्रह्मोस प्रक्षेपण अस्त्रे या सर्व निर्मितीत त्यांचा वाटा मोलाचा होता.राजस्थान मधील पोखरणची अणुचाचणी यशस्वी करताना त्यांनी देश अण्वस्त्र अणुशक्ती संपन्न बनवला. 

    इंडिया माय ड्रीम, टर्निंग पॉईंट, टार्गेट मिलेनियन, साइंटिस्ट टू प्रेसिडेंट यासांरखी त्यांची अनेक पुस्तके गाजली.मराठी भाषेत अग्निपंख हे त्यांच्या जीवनावरील पुस्तक प्रचंड लोकप्रिय झाले.पुढिल वीस वर्षांचे आधुनिक भारताचे स्वप्न पाहणाऱ्या या माणसाचे अनेक युवक युवती प्रचंड चाहते होते.इतक्या बुद्धिमान माणसाचा व्याख्यान देता देता शेवट होणे यासारखे परमभाग्य ते काय असणार. डॉक्टर कलाम यांचे आयुष्य कष्टमय  होते पण ते लढले आणि जिंकलेही. त्यांचे जीवन आपल्यालाही सतत हेच सांगत राहते की येणाऱ्या आव्हानांना भिडायची तयारी असेल तर समोरचा प्रसंग कितीही बाका असेल तरी तुम्हाला प्रचंड, दुर्दम्य आत्मविश्वासाच्या जोरावर कठीण आयुष्याची लढाई जिंकता येते.

No comments:

Post a Comment