"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Saturday, April 29, 2023

केंद्र प्रमुख परीक्षा

आगामी केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठीची अर्हता, नवीन अभ्यासक्रमाचे विश्लेषण, परीक्षा योजना व केंद्र प्रमुख परीक्षेची तयारी

       जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी 1994 मध्ये केंद्र प्रमुखाचे पद निर्माण करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या 10 प्राथमिक शाळांवरील नियंत्रणाकरिता केंद्रप्रमुख पद असते. केंद्र प्रमुखांची रिक्त पदे भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक यांनी 3 सप्टेंबर 2019 च्या पत्राद्वारे सर्व जिल्हा परिषदांकडून रिक्त पदांची माहिती मागवली आहे. प्रस्तुत लेखात केंद्र प्रमुख परीक्षेची सविस्तर माहिती दिली असून ती लक्षपूर्वक वाचावी. 

          केंद्र प्रमुखांची रिक्त पदे 10 जून 2014 शासन निर्णयानुसार सरळसेवेतून 40 टक्के, विभागीय परिक्षेद्वारे 30 टक्के व पदोन्नतीने 30 टक्के पदे लवकरच भरली जाणार आहेत.तसेच ही पदे भाषा विषय, गणित व विज्ञान आणि सामाजिकशास्त्रे अशा समान प्रमाणात भरण्यात येणार आहेत.



    ◆केंद्र प्रमुख पदासाठीची अर्हता


            केंद्र प्रमुख पदाची अर्हता महाराष्ट्र शासनाच्या 10 जून 2014 च्या अधिसूचनेद्वारे पुढीप्रमाणे ठरविण्यात आली आहे.

   सरळसेवा परीक्षा केंद्र प्रमुख अर्हता

●1.वयोमर्यादा

 - 36 वर्षे (जिल्हा परिषदेच्या सेवेत नसलेले)

(मागास प्रवर्गासाठी शासन नियमानुसार वयोमर्यादेत शिथिलता असेल.)

●2.पदवी- विद्यापीठाची किमान 50 टक्के गुणांसह पदवी आणि बी.एड./समकक्ष पदवी

●3.अनुभव - शासनमान्य पदावरील प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/अध्यापक विद्यालय/महाविद्यालय यातील किमान 3 वर्षांचा अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभव 

   *विभागीय परीक्षा केंद्र प्रमुख अर्हता*

■1.पदवी - विद्यापीठाची किमान 50 टक्के गुणांसह पदवी आणि बी.एड./समकक्ष पदवी

■2.अनुभव - ज्यांनी जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) पदावर किमान 3 वर्षे सेवा केलेली आहे.

★केंद्र प्रमुख परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे विश्लेषण, तयारीचे स्वरूप व संदर्भ पुस्तके*

        केंद्र प्रमुख रिक्त पदे स्पर्धा परीक्षेने भरण्यासाठी अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय 9/9/2019 द्वारे सुधारित व अद्ययावत करण्यात आला असून तो केंद्र प्रमुख पदाच्या कामकाजाशी सुसंगत करण्यात आला आहे.या पदासाठी 200 गुणांची परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत.पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून होणार आहे.

         पेपर क्रमांक एकमध्ये  बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.

        पेपर क्रमांक दोनमध्ये शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहेत.

         केंद्र प्रमुख परीक्षेच्या दोन्ही पेपरचे अभ्यासक्रमाचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.

     *पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता*

        बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.

*केंद्र प्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*

1. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स,पुणे

2. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण तयारी - के सागर व डॉ.अनिरुद्ध

        वरील दोन्ही पुस्तके केंद्रप्रमुख परीक्षेच्या पेपर एकच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती, परीक्षेतील काठिण्य पातळीचा दर्जा समजून परिक्षाभिमुख तयारी  करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील.

        तसेच पेपर एकमधील बुद्धिमत्ता चाचणी व गणितासाठी स्वतंत्रपणे के सागर,नितीन महाले,शांताराम अहिरे,सतीश वसे यांची पुस्तके अभ्यासता येतील.

       यामधील शिक्षक अभियोग्यतेशी संबधित कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व घटकांवर उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात.या घटकाच्या तयारीसाठी डॉ शशिकांत अन्नदाते यांचे "शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी" हे के'सागर पब्लिकेशन्स कडून प्रकाशित पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.

         मराठी भाषिक क्षमतेसाठी  के'सागर,बाळासाहेब शिंदे,डॉ.आशालता गुट्टे  यांची पुस्तके अभ्यासावीत.

        इंग्रजी भाषिक क्षमतेसाठी के सागर, बाळासाहेब शिंदे, सुदेश वेळापुरे यांची पुस्तके अभ्यासता येतील.

       *पेपर क्रमांक दोन- शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह*

       यामध्ये शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.प्रस्तुत पेपर अभ्यासक्रम पूर्णतः नवीन व केंद्र प्रमुख कामकाजाशी निगडित आहे.

        केंद्र प्रमुख पेपर दोनच्या अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी, शिक्षण विषयक सर्व कायदे व योजना,अद्ययावत शासन निर्णय, केंद्रीय व राज्य पातळीवरील शिक्षण विषयक संस्थांचे रचना व कार्य,माहिती तंत्रज्ञान वापर, अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन पद्धती,माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन, शालेय विषयांचे आशयज्ञान व सामान्यज्ञान, संप्रेषण कौशल्य, चालू घडामोडी विशेषतः शैक्षणिक व क्रीडा विषयक इत्यादी बाबींचा समावेश आहे.प्रस्तुत केंद्र प्रमुख सविस्तर अभ्यासक्रमासाठी 9 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयाचे अवलोकन करावे.

  ★केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ~

१.केंद्रप्रमुख परीक्षा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे

         सदर पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.तसेच केंद्र प्रमुख अभ्यासक्रमाची व्याप्ती व त्यावर घटकनिहाय विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तयारी करता येईल.

       तसेच केंद्र प्रमुख परीक्षा पेपर दोनच्या अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.

1.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था - डॉ.शशिकांत अन्नदाते(तिसरी आवृत्ती),के'सागर पब्लिकेशन्स

2.शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र- डॉ.ह.ना.जगताप,नित्यनूतन प्रकाशन (पाचवी आवृत्ती)

3.संपुर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संपुर्ण विवेचन व वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते(चौथी आवृत्ती)

4.अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र - डॉ.विष्णु शिखरे,नित्यनूतन प्रकाशन

5.अध्ययन अध्यापन पारंपरिक ते आधुनिक - डॉ.गणेश चव्हाण, नित्यनूतन प्रकाशन, पुणे

6.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण - डॉ.मोहन जाधव

7.शैक्षणिक माहिती तंत्रज्ञानसाठी डॉ.ह.ना.जगताप/डॉ.विष्णू शिखरे व डॉ.बी.एम.पाटील यांचे पुस्तक अभ्यासावे.

8.शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह- डॉ.ह.ना.जगताप

9.शिक्षणातील नवविचारप्रवाह - डॉ.नीलिमा सप्रे, फडके प्रकाशन

10.सामान्य विज्ञान विषयज्ञान करिता प्रा.अनिल कोलते /चंद्रकांत गोरे यांचे पुस्तक उपयुक्त ठरेल.

11.शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.

12.सर्व बेसिक एकत्रित सामान्य ज्ञानसाठी विनायक घायाळ/के'सागर यांचे जनरल नॉलेज पुस्तक अभ्यासावे.

13.चालू घडामोडीसाठी प्रा.इद्रीस पठाण(टॉपर 777 पुस्तक)/समाधान निमसरकार/राजेश भराटे/देवा जाधवर यांची पुस्तके अभ्यासावीत.

         केंद्र प्रमुख पेपर क्रमांक एक व दोन चा अभ्यासक्रम अतिशय विस्तृत व व्यापक आहे.केंद्र प्रमुख परीक्षेची जाहिरात शासन पातळीवरील हालचाली पाहता...

   तसेच ही पदे बऱ्याच वर्षांपासून रिक्त असल्याने लवकरच परीक्षेद्वारे भरली जातील, तेव्हा केंद्र प्रमुख पदाचा व्यापक अभ्यासक्रम लक्षात घेऊन पात्र शिक्षकांनी सखोल अभ्यासाला त्वरित सुरवात करून परीक्षेतील आपले यश सुनिश्चित करावे.

            ★Best of Luck★



No comments:

Post a Comment