वसंतानेही चोहीकडे बघा
रंगपंचमी आरंभली..!
नव्या पालवीचा साज लेऊन
सृष्टीही सजली...!!
🟣 रंग असावा तुकाराम महाराजांच्या अभंगाचा
🟢 रंग असावा जिजाऊंच्या प्रेरणेचा
🔵 रंग असावा शिवरायांच्या विचाराचा
रंग असावा संभाजी राज्यांच्या पराक्रमाचा...
🟤 रंग असावा सावित्रीमाईच्या त्यागाचा
⚫ रंग असावा महात्मा फुलेच्या शिक्षणाचा
🔴 रंग असावा बाबासाहेबांच्या प्रज्ञा,शिल,करुनेचा
🟡 रंग असावा अण्णाभाऊंच्या शाहीरीचा
🟢 रंग असावा गाडगेबाबांच्या स्वच्छतेचा
🔵 रंग असावा अब्दुल कलामांच्या मिसाईलचा
🟣 रंग असावा बसवेश्वरांच्या विचार सारणीचा
🟤 रंग असावा ताराराणीच्या पराक्रमाचा
🔴 रंग असावा अहिल्याबाई होळकरांचा
🟠 रंग असावा माणसाला माणूस जोडण्याचा
🟡 रंग असावा माणसात देव शोधण्याचा...!!
🖤होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🖤
रंगपंचमीचाही सण उजाडला
रंगीबेरंगी रंग घेऊ मस्त चला
शामराव चला जाऊ बाजारी
आणू या लय भारी पिचकारी
फाल्गुन पौर्णिमेलादर वर्षाला
येतो धुलीवंदनाचाही सण हो
प्रेम आनंदाचे अन उत्साहाचे
सगळीकडेच वातावरणही हो
भगवान श्रीकृष्णानेहीलावीले
राधेला रंगीबेरंगी रंग ही रंग
आपण आज खेळू आपल्या
गावातील साऱ्याही मित्रा संग
फाटके कपडे घालूनीचआम्ही
उतरलोही सारे रस्त्यावरती हो
गंगू बुढी जोराने ओरडे नविन
कुठला आला हा भिकारी हो
रागानेरागाने फोडले4 ,5अंडे
पाठीवरती बसले 6,7 हो दंडे
मागच्याच वर्षी तर मला राजे
जोकरची या बनविले होते हो
घरच्यांनी आणि परक्यानी या
कुणीही ना पहा ओळखले हो
चेहरालपविण्यासाठीआणली
आणली मी मोठी काळी छत्री
जोरजोऱ्याने सरळची धावत
आली काळीही लंकीच कुत्री
रंगीबेरंगी रंग खेळन्याची राजे
हो मजा असते न्यारीप्यारी हो
आयुष्यामध्ये असा प्रत्येक्षची
अनुभव घ्यावा एकदा तरी हो
सोनेरीचांदी रंगाचे खुप वाढले
अखेरीस आम्ही पळसफुलांचे
फुकटाचे मस्तची रंग बनविले
हॅपी हॅपी होळी असे म्हणतही
थोडासा रंग लावावा साळीला
हिरवा गुलाबी आणि पिवळा
रंगही शोभतो तिच्या गालाला
रंगीबेरंगी रंगांची करूनियाही
सगळीकडे मजेने या उधळण
गमावू नका जीवनातआपल्या
आनंदाचे अन उत्साहाचे क्षण
सखाराम चला जाऊ बाजारी
आणू या मोठीमोठी पिचकारी
ओंकार राठोड
दारव्हा यवतमाळ
❤💛💚💜🤎♥️💚💜💖💛💚💙
No comments:
Post a Comment