"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

June 07, 2025

मोबाईल वरून बदली फॉर्म कसा भरावा

 ऑनलाइन बदली पोर्टलवर विशेष संवर्ग भाग 1 व भाग 2 शिक्षकांनी मोबाईल वरून फॉर्म कसा भरावा.


दि. 7 जून 2025 चे संपुर्ण बदली प्रक्रियेसंबधी काही शंका किंवा अडचणी बाबत संपूर्ण माहिती

➡️अद्याप संवर्ग एक व संवर्ग दोन ला होकार किंवा नकार देण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध झालेली नाही लवकरच ही सुविधा पोर्टलवर उपलब्ध होईल.

➡️ जिल्हानिहाय रिक्त पदे पोर्टलवरअपलोड करण्याचे काम पूर्ण झालेली असून पोर्टलवर रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.


➡️ रिक्त पदांच्या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध झाल्या बरोबर लवकरच संवर्ग 1 ला होकार व नकार देण्याची संधी प्राप्त होईल व सोबतच संवर्ग 2 ला होकार देण्याची संधी सुद्धा देण्यात येईल.

➡️ संवर्ग एक व संवर्ग दोन ला फॉर्म भरण्याच्या सुविधेबाबत पोर्टलवर अद्याप वेळापत्रक प्रकाशित झालेलं नाही ते सुद्धा लवकर प्रकाशित होईल.


➡️त्याकरिता संवर्ग एक व संवर्ग दोन मधून लाभ घेणाऱ्या शिक्षकांनी प्रक्रियेबद्दल अद्यावत राहावं.


✳️संवर्ग एक व संवर्ग दोन चे सर्वसामान्य मुद्दे..


➡️ संवर्ग एक च्या ज्या शिक्षकांना होकार द्यायचा आहे त्यांना फक्त जिल्ह्यातील बदली पात्र शिक्षकांच्या जागा पोर्टलवर दाखवल्या जातील.

➡️ पती-पत्नी एकत्रिकरणा अंतर्गत लाभ घेणाऱ्या शिक्षकांना पोर्टलवर रिक्त जागा व बदलीपात्र शिक्षकांच्या जागा दाखवल्या जातील.


➡️ विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन च्या याद्या जाहीर करण्याकरिता व यादीवरील आक्षेप प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता अर्ज भरून घेतल्या जात आहेत.


➡️ या ठिकाणी फक्त संवर्ग एक व संवर्ग दोन चे अर्ज भरून घेतल्या जात आहेत या ठिकाणी पसंती क्रम देण्याची सुविधा नाही.


➡️ संवर्ग एक च्या शिक्षकांना होकार किंवा नकाराची सुविधा मिळेल व संवर्ग दोनच्या शिक्षकांना फक्त होकार देता येईल.


➡️ज्या शिक्षकांना बदली प्रक्रियेमध्ये बदली घ्यायची नाही त्यांनी अर्ज करताना नकार नोंदवावा जेणेकरून आपली बदली पुढील कोणत्याही टप्प्यावर होणार नाही.

➡️ज्या संवर्ग एक च्या शिक्षकांची नावे बदली पात्र ,बदली अधिकार प्राप्त व अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे टप्पा क्रमांक सात या तीनही यादीमध्ये नसतील व त्यांना बदली घ्यायची नसेल तर त्यांना फॉर्म भरण्याची गरज नाही.


➡️ परंतु ज्या शिक्षकांना संवर्ग एक किंवा संवर्ग दोन मधून बदली करायची असेल त्यांनी होकार पोर्टलवर नोंदवावा.


✳️मोबाईल वरून ऑनलाइन बदली पोर्टलवर विशेष संवर्ग भाग 1 व संवर्ग भाग 2 चे शिक्षक खालील प्रमाणे फार्म भरू शकता.


➡️ यापूर्वी आपण आपले प्रोफाइल पोर्टलवर अपडेट केलेले आहे आता संवर्ग भाग 1 आणि संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी फॉर्म भरण्याकरिता खालील लिंक ला क्लिक करा...

🔻🔻

https://ott.mahardd.com/



🔺👆🔺👆🔺

➡️ Open होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाईप करा व Send OTP ऑप्शन वर क्लिक करा.


➡️ आपल्या मोबाईल नंबर वर OTP आला असेल तो टाकून लॉगिन करा.


➡️ लॉगिन केल्यानंतर सर्वप्रथम पोर्टलची भाषा मराठी करून घ्यावी त्याकरिता पेजवरील 'मराठी' या टॅब वर क्लिक करा आपल्या पोर्टलची भाषा मराठी होईल.


➡️ मोबाईलच्या स्क्रीनच्या डावीकडे वरच्या कोपऱ्यात आडव्या तीन रेषा दिसतात. त्या तीन रेषांवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 8 ऑप्शन दिसतील. त्यापैकी आपण "जिल्हाअतंर्गत" या टॅब वर क्लिक केल्यानंतर त्याखालील "अर्ज" हा टॅब दिसेल त्या टॅबला क्लिक करा.


➡️ Open होणाऱ्या पेजवर आपणास

*1) संवर्ग भाग 1 अर्ज करा-

*2) संवर्ग भाग 2 अर्ज करा-

●असे दोन टॅब दिसतील●


➡️ज्या शिक्षकांना संवर्ग 1 मध्ये आपली नोंदणी करायची आहे त्यांनी "संवर्ग भाग 1 अर्ज करा" त्यावर क्लिक करा>>

➡️अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी , अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल . असे disclaimer दिसेल त्या disclaimer च्या बाजूच्या बॉक्समध्ये टिक करा.


➡️त्याखाली आपणास आपले नाव ;आडनाव आपला शालार्थ आयडी व आपल्या शाळेचा यु डायस क्रमांक दिसेल.


➡️ त्याखाली आपणास "बदलीतून सूट हवी आहे काय" हा टॅब दिसेल त्या टॅब वर क्लिक करा.


➡️ क्लिक केल्यानंतर त्याखाली Yes व No हे दोन ऑप्शन दिसतील.


➡️जर आपणास बदलीतून सूट घ्यायची आहे म्हणजेच बदली करायची नाही अशा शिक्षकांनी Yes वर क्लिक करावे आणि ज्या शिक्षकांना बदली करायची असेल त्यांनी No वर क्लिक करावे.

★या ठिकाणी लक्षपूर्वक Yes आणि No ऑप्शन निवडा येथे चुका होऊ शकतात★

➡️ त्यानंतर विशेष संवर्ग भाग 1 प्रकार निवडा या टॅब वर  क्लिक करा त्यानंतर आपणास, "self" व  "Spouse" असे दोन ऑप्शन दिसतील जर आपण स्वतः व्याधीग्रस्त असाल तर "self "आणि जर आपला जोडीदार आजाराने व्याधीग्रस्त असेल तर "Spouse" निवडा आपण drop down मध्ये जाऊन आपला संवर्ग 1 मधील जो उपप्रकार असेल त्यावर क्लिक करा (self मध्ये एकूण1 ते 14 उपप्रकार असतील Spouse मध्ये 15 ते 20 उपप्रकार असतील)


➡️(Yes ऑप्शन आपण निवडले तर आपले नाव पुढील कोणत्याही यादीमध्ये येणार नाही आणि No ऑप्शन निवडल्यास जर आपल्याला आपल्या प्राधान्यक्रमातून शाळा न मिळाल्यास आपली बदली पुढील संवर्गातून होऊ शकते)


➡️आपण भरलेले दोन्ही ऑप्शन पुन्हा चेक करा व त्यानंतर खालील Submit  या बटन वर क्लिक करून आपली माहिती Submit करा


➡️ Submit वर क्लिक केल्याबरोबर आपल्याला ओटीपी मागितल्या जाईल तो ओटीपी टाका व त्यानंतर आपला फॉर्म सबमिट केल्या जाईल

➡️ अशाप्रकारे संवर्ग 1 चे शिक्षक आपला फॉर्म मोबाईल वरून भरू शकतात


✳️आता संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी आपला फॉर्म भरत असताना


➡️ "संवर्ग भाग 2 अर्ज करा" या टॅब वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर  disclaimer  दिसून येईल त्या disclaimer बाजूच्या बॉक्सला टिक करा.


➡️त्याखाली आपणास आपले नाव आडनाव आपला शालार्थ आयडी व आपल्या शाळेचा यु डायस क्रमांक दिसेल.


➡️त्याखाली आपणास तुमचे व तुमच्या जोडीदाराच्या अंतर किलोमीटर मध्ये नोंदवा अर्थातच ते 30 किलोमीटरच्या वर असेल.


➡️व त्याखालील रकान्यात "विशेष संवर्ग भाग 2 चा प्राधान्यक्रम निवडा" या टॅब वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर drop down मधून आपला विशेष संवर्ग भाग 2 मधील आपल्याला लागू पडणारा प्राधान्य क्रमांक 1 ते 7 मधून निवडा.


✳️ वरील प्राधान्यक्रम 1 ते 7 मधील प्राधान्य क्रमांक 1 निवडल्यास.


➡️आपण जर दोघेही जिल्हा परिषदचे कर्मचारी असाल तर आपल्याला पर्याय क्रमांक एक निवडावा लागेल आपण पर्याय क्रमांक एक निवडल्यानंतर त्याखाली आपल्याला ( 1) primary, 2) other than primary ) हे दोन पर्याय दिसून येतील.


➡️ आपण जर दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असाल तर आपल्याला त्यापैकी पहिला( 1) primary, पर्याय निवडावा लागेल.

 

➡️ त्यानंतर पर्याय क्रमांक एक निवडला असेल तर अशा शिक्षकांना जोडीदाराचा खालील रखान्यांमध्ये शालार्थ आयडी किंवा मोबाईल नंबर टाकावा लागेल.


➡️ जोडीदाराचा शालार्थ आयडी किंवा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपल्या जोडीदाराची माहिती खालील रखान्यांमध्ये दिसून येईल.

➡️पुन्हा एकदा आपण टाकलेली माहिती तपासून घ्या व खालील submit बटनला क्लिक करा अशा पद्धतीने आपण संवर्ग 2 चा फॉर्म मोबाईल द्वारे पोर्टलवर भरू शकता.


✳️ पर्याय क्रमांक 2 निवडल्यास (2) other than primary )


➡️ आपला जोडीदार जिल्हा परिषद कर्मचारी असेल तर.

 ★आपल्याला पर्याय क्रमांक दोन (2) other than primary ) निवडावा लागेल


 ➡️ पर्याय क्रमांक दोन निवडल्यानंतर  आपल्याला खालील रकान्यामध्ये आपल्या जोडीदाराचा शालार्थ आयडी टाकावा लागेल जोडीदाराचे नाव व जिल्हा परिषद कार्यालयाचे नाव टाकावे लागेल.


➡️पुन्हा एकदा आपण टाकलेली माहिती तपासून घ्या व खालील submit बटनला क्लिक करा अशा पद्धतीने आपण सवर्ग 1 व संवर्ग 2 चा फॉर्म मोबाईल द्वारे पोर्टलवर भरू शकता.


✳️ पर्याय क्रमांक 2 ते 7 निवडल्यास>>>


➡️ पती-पत्नी एकत्रीकरण घेणाऱ्या शिक्षकाचा जोडीदार जिल्हा परिषदेचा कर्मचारी नसून इतर विभागाचा कर्मचारी असेल तर...

➡️आपल्याला दोघांमधील अंतर टाकायचे आहे व आपल्या जोडीदाराची मागितलेली माहिती सबमिट करायची आहे.


➡️ पुन्हा एकदा आपण टाकलेली माहिती तपासून घ्या व खालील submit बटनला क्लिक करा.


➡️ submit केल्यानंतर आपल्याला आपण आपल्याला आपण दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असाल तर आपल्याला दोन ओटीपी प्रविष्ट करावे लागतील व आपला जोडीदार इतर संवर्गात असेल तर या ठिकाणी फक्त एकच ओटीपी प्रविष्ट करावा लागेल


➡️ आपण भरलेला फॉर्म आपण पोर्टलवरूनच डाउनलोड करू शकता.


➡️ परंतु आपण भरलेली माहिती आपणास चुकीची वाटत आहे तर अशा परिस्थितीत आपण आपला फॉर्म withdrawal सुद्धा करू शकता.


No comments:

Post a Comment