"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

अलंकारिक शब्द

 मराठी व्याकरण - अलंकारिक शब्द

१) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस

२) अकलेचा कांदा : मूर्ख

३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य

४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार

५ ) अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला

६) अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे

७) अक्षरशत्रू : निरक्षर माणूस

८) अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट

९) अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार

१०) ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात

११) उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा

१२) उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू

🔴🔵

१३) कर्णाचा अवतार : उदार माणूस

१४) कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा

१५) कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा

१६) काडी पहिलवान : हडकुळा माणूस

१७) कुंभकर्ण : झोपाळू माणूस

१८) कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा

१९) कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री

२०) कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी

TET परीक्षा संभाव्य प्रश्न आणि उत्तरेसाठी खाली दिलेल्या👇👇👇मुद्द्याला क्लिक करा..

वाचन कौशल्य – TET परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्न 

लेखन कौशल्य – TET परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्न 

भाषेचा विकास – TET परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्न 

भाषा शिकण्याची तत्व प्रश्न उत्तरे

मराठी व्याकरण – TET परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्न 

मराठी व्याकरण – भाग दोन महत्वाचे प्रश्न   

अलंकारिक शब्द

~~●●~~

🔴🔵

२१) खडास्टक : भांडण

२२) खुशालचंद : अतिशय चैनिखोर

२३) खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे

२४) गप्पीदास : थापा गप्पा मारणारा

२४) गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत

२५) गंगा यमुना : अश्रू

२६) गंडांतर : भीतीदायक संकट

२७) गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख 

२८) गाढव : बेअकली माणूस

२९) गुरुकिल्ली : मर्म, रहस्य

३०) गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा

३१) गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर

३२) गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य

३३) घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा

३४) घोरपड : चिकाटी धरणारा

३५) चरपट पंजिरी : निरर्थक बडबड 

~~●●~~

मराठी व्याकरण महत्त्वाच्या सर्व घटकांची माहिती व TET परीक्षा संभाव्य प्रश्न आणि उत्तरेसाठी 👇👇👇 क्लिक करा..

~~●●~~


३६) चालता काळ : वैभवाचा काळ

३७) चौदावे रत्न : मार

३८) छत्तीसचा आकडा : शत्रुत्व

३९) जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस

४०) टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे

४१) ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा

४२) थंडा फराळ : उपवास

४३) दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे

४४) दुपारची सावली : अल्पकाळ टिकनारे

४५) देवमाणूस : साधाभोळा माणूस

४६) धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा

४७) धोपट मार्ग : सरळ मार्ग

४८) नवकोट नारायण : खूप श्रीमंत

४९) नंदीबैल : मंदबुद्धीचा

५०) पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग

५१) पाताळयंत्री : कारस्तान करणारा

५२) पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू

५३) पिकले पान : म्हातारा मनुष्य

५४) बृहस्पती : बुद्धिमान व्यक्ती

५५) बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य

५६) बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन

५७) भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न

५८) भाकड कथा : बाष्कळ गोष्टी

५९) भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा

६०) मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू

७०) मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम

७१) मृगजळ : केवळ अभास

७२) मेषपात्र : बावळट मनुष्य

७३) रुपेरी बेडी : चाकरी

७४) लंबकर्ण : बेअकली / बेअकल

७५) वाटण्याच्या अक्षता : नकार

७६) वाहती गंगा : आलेली संधी

७७) शकुनी मामा : कपटी मनुष्य

७८) सिकंदर : भाग्यवान

७९) सिकंदर नशीब : फार मोठे नशीब

८०) शेंदाड शिपाई : भित्रा मनुष्य

८१) श्रीगणेशा : आरंभ करणे

८२) सव्यसाची : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य

८३) स्मशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य

८४) सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य

८५) सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम

८६) सूर्यवंशी उशिरा उठणारा

८७) सोन्याचे दिवस : चांगले दिवस

८८) रामबाण औषध : अचूक गुणकारी       

No comments:

Post a Comment