🔥 मानसशास्त्र/ बालमानसशास्त्र – TET परीक्षा टिप्स (एकदम लक्षात ठेवा)
👉 Piaget + Vygotsky = हमखास प्रश्न
👉 Learning Theories = वारंवार विचारतात
👉 Inclusive Education = 1–2 प्रश्न नक्की
👉 IQ / Motivation = सरळ MCQ
👉 Definitions = सोपे मार्क
📘 🧠 जलद पुनरावलोकन नोट्स (बालमानसशास्त्र – TET)~
🔹 1. विकास (Growth & Development)
विकास = सतत, टप्प्याटप्प्याने होणारा सर्वांगीण बदल
वाढ = फक्त शरीराची वाढ (उंची, वजन)
विकास = मानसिक, सामाजिक, भावनिक बदल
👉 तत्त्वे:
डोक्यापासून पायाकडे (Cephalocaudal)
केंद्रापासून बाहेर (Proximodistal)
👉 परिणाम करणारे घटक:
वंशपरंपरा (Genetics)
वातावरण (Environment)
👉 वैशिष्ट्ये:
सतत चालणारी प्रक्रिया
प्रत्येक मुलात वेगळेपणा असतो
🔹 2. Jean Piaget (संज्ञानात्मक विकास) ~
मुलांचा विचार कसा विकसित होतो याचा अभ्यास
👉 4 टप्पे:
0–2 वर्ष → संवेदन-चालना
2–7 वर्ष → पूर्व संक्रियात्मक
7–11 वर्ष → ठोस संक्रियात्मक
11+ वर्ष → औपचारिक संक्रियात्मक
👉 महत्त्वाचे मुद्दे:
Schema = मनातील माहितीची रचना
Assimilation = जुनी माहिती वापरणे
Accommodation = नवीन बदल स्वीकारणे
👉 मुलं स्वतः अनुभवातून शिकतात
🔹 3. Lev Vygotsky (सामाजिक विकास)
मुलं समाजातून शिकतात
👉 मुख्य संकल्पना:
ZPD = मदतीने शिकण्याची पातळी
MKO = जास्त ज्ञान असलेली व्यक्ती (शिक्षक/पालक)
Scaffolding = तात्पुरती मदत
👉 भाषा = विचार विकासासाठी महत्त्वाची
👉 शिक्षक = मार्गदर्शक
🔹 4. Jerome Bruner ~
शिकण्याचे 3 प्रकार :-
क्रियेतून (Enactive)
चित्रातून (Iconic)
भाषेतून (Symbolic)
👉 Discovery Learning = स्वतः शोधून शिकणे
👉 Spiral Curriculum = पुनरावृत्ती करून शिकणे
❂~✧~●●●★●●●~✧~❂
मानसशास्त्र व बालमानसशास्त्र नोट्स व प्रश्नोत्तर~
⭐मानसशास्त्र/ बालमानसशास्त्र TET परीक्षेसाठी Notes~
⭐TET बालमानसशास्त्र संभाव्य प्रश्न
⭐बालमानसशास्त्र- शिकण्याचे सिद्धांत, समावेशक शिक्षण Notes व प्रश्न उत्तरे
⭐लॉरेन्स कोहलबर्ग मानसशास्त्रज्ञ प्रश्न व उत्तरे
⭐जीन पियाजे मानसशास्त्रज्ञ प्रश्न व उत्तरे
⭐लेव्ह व्हायगोत्स्की मानसशास्त्रज्ञ प्रश्न व उत्तरे
❂~✧~●●●★●●●~✧~❂
🔹 5. शिकण्याचे सिद्धांत (Learning Theories) ~
Edward Thorndike → परिणामाचा नियम (योग्य उत्तर → समाधान)
B. F. Skinner → बक्षीस देऊन शिकवणे
Ivan Pavlov → उद्दीपन-प्रतिक्रिया (घंटा प्रयोग)
👉 शिकणे = वर्तनात कायमस्वरूपी बदल
🔹 6. बुद्धिमत्ता (Intelligence)
IQ = (मानसिक वय / वास्तविक वय) × 100
Alfred Binet → IQ चाचणी
Howard Gardner → 8 प्रकारची बुद्धिमत्ता
Daniel Goleman → भावनिक बुद्धिमत्ता
👉 प्रकार:
Gifted (हुशार)
Slow learner (हळू शिकणारा)
🔹 7. प्रेरणा (Motivation) ~
प्रेरणा = काम करण्याची अंतर्गत शक्ती
👉 प्रकार:
आंतरिक (Intrinsic)
बाह्य (Extrinsic)
Abraham Maslow → गरजांची पायरी
👉 क्रम:
शारीरिक → सुरक्षितता → प्रेम → सन्मान → आत्मसिद्धी
🔹 8. व्यक्तिमत्व (Personality)
व्यक्तिमत्व = व्यक्तीचे वर्तन + गुण
Sigmund Freud →
👉 Id = इच्छा
👉 Ego = वास्तव
👉 Superego = नैतिकता
🔹 9. स्मरणशक्ती (Memory)
प्रकार:~
तत्काळ (Sensory)
अल्पकालीन
दीर्घकालीन
👉 विस्मरण = शिकलेले विसरणे
🔹 10. समावेशक शिक्षण (Inclusive Education) ~
सर्व मुलांना एकत्र शिक्षण
👉 CWSN = विशेष गरजा असलेली मुले
👉 अडचणी:
Dyslexia → वाचन
Dysgraphia → लेखन
Dyscalculia → गणित
👉 ADHD = लक्ष कमी + अतिसक्रियता
👉 शिक्षकाची भूमिका:
समान संधी देणे
वैयक्तिक लक्ष
सकारात्मक वातावरण
🔹 11. अध्यापन पद्धती (Teaching Methods) ~
खेळातून शिक्षण (Play-way)
प्रकल्प पद्धत (Project)
कृतीद्वारे शिक्षण (Activity-based)
व्याख्यान (Lecture)
शोध पद्धत (Heuristic)
🔹 12. मूल्यमापन (Evaluation) ~
Formative = सतत मूल्यमापन
Summative = शेवटचे मूल्यमापन
Feedback = सुधारण्यासाठी अभिप्राय
🔹 13. Bloom’s Taxonomy (शिकण्याची पातळी)~
ज्ञान → समज → उपयोग → विश्लेषण → एकत्रीकरण → मूल्यांकन
No comments:
Post a Comment