"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

मराठी नवोपक्रम मालिका Page 4


   सौ. अलकाताई राकेश फुलझेले  उपक्रमशील शिक्षिका 'महाराष्ट्र शिक्षक पॅनल' च्या सक्रिय संचालक तालुका जिल्हा पालघर यांनी शाळेत राबवलेले  व स्वतः लेखन केलेले... 
   "माझी शाळा ~ माझे उपक्रम"   


सर्व शिक्षकांना वर्गात अध्यापन आनंददायी करण्यासाठी उपयुक्त पडतील असे विषयवार उपक्रम... व मेजवानी मराठी नवोपक्रम मालिका...

        मराठी नवोपक्रम मालिका...!! भाग -- १६  
               भाषिक खेळ — ७  माझ्यात लपलय कोण ? 
              ═••═
       👉इयत्ता— तिसरी
      👉साहित्य — पाच ते सात अक्षरी शब्दपट्या
      👉कृती / कार्यवाही —
🔹 पाच पाच विद्यार्थ्यांचे गट करावे.
🔸 गटातील प्रत्येक विद्यार्थ्याला पाच ते सात अक्षरी शब्दपट्या देणे.
🔹 *शब्दपट्टीवरील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द कसे तयार करावे फळ्यावर स्पष्ट करणे....उदा. नवरंगपूर — नव , रंग , पूर , नग , नर , वर , गर ,नगर , नवरंग.........
🔸 शब्दपट्टीवरील शब्दात कोणकोणते अर्थपूर्ण शब्द लपलेले आहेत ते शोधून लिहिण्यास सांगून पंधरा मिनिटाचा वेळ द्यावा.
🔹 गटातील जो विद्यार्थी सर्वात जास्त शब्द तयार करेल त्याला शाबासकी देऊन कौतुक करावे.
🔸 सर्वप्रथम येणारा विद्यार्थी गटातील इतर विद्यार्थ्यांना मदत करेल.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯 शब्दसंपत्ती विकसित करणे.
🎯 अर्थपूर्ण शब्द तयार करता येणे.
🎯 विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळते.
🎯 विद्यार्थ्यांना अक्षरांची परस्पर सांगड घालून अर्थपूर्ण शब्द तयार करता येतात.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
               ~~●~~~~~~~~●~~
      मराठी नवोपक्रम मालिका...!! भाग -- १७  

         चला चिठ्ठी उचलूया..वाक्य लिहूया..!
           
  ═••═
      👉इयत्ता — तिसरी
     👉विषय — मराठी
      👉साहित्य — परिचित विषयाच्या*
चिठ्ठ्या...उदा.प्राणी पक्षी फुले फळे भाज्या झाडे.🐎🦅🌹🍊🍅🌴
      👉कृती —
🔹पाच —पाच मुलांचे गट करावे.
🔸प्रत्येक गटाचा गटप्रमुख नेमावा.
🔹शिक्षकांनी एका डब्यात विविध विषयाच्या चिठ्ठ्या ठेवाव्या.
🔸प्रत्येक गटप्रमुखाला डब्यातील एक चिठ्ठी उचलण्यास सांगावी.
🔹गटप्रमुखाने आपल्या गटातील मुलांना चिठ्ठीवरील विषय सांगावा.
🔸गटातील सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर चार — पाच वाक्य लिहावीत.
🔹उदा. कुञा — 🐕
    १ ) कुञा पाळीव प्राणी आहे.
    २ ) कुञा मला आवडतो.
    ३ ) माझ्या घरी मोती नावाचा कुञा आहे.
     ४ ) कुञा जोरात भुंकतो.
     ५ ) कुञा घराची राखण करतो.

        👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯खेळातून वाक्य लेखनाची सवय होते.
🎯निबंधलेखनाचा आपोआप सराव होतो.
🎯मुलांना स्वनिर्मितीचा आनंद होतो.
🎯मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होते.
🎯गटात एकमेकांना सहकार्य करण्याची भावना निर्माण होते.
🎯विविध माहितीचा संग्रह तयार होतो.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
              ~~●~~~~~~~~●~~

      मराठी नवोपक्रम मालिका...!! भाग -- १८  

                माझे वाक्य..तुझा मूक अभिनय.. 
              ═••═
  खेळ खेळूया...या उपक्रमाअंर्तगत भाषिक खेळ मूकाभिनय सादर करणे.या उपक्रमात शब्दांचा वापर न करता वेगवेगळ्या अवयवांचा उपयोग करून मूक अभिनय सादर करणे.हा उपक्रम दुसरी ते सातवी पर्यंत घेता येतो.
       👉उदा.वाक्य — भूक लागली.. विद्यार्थी डावा हात पोटावर उजव्या हाताची सर्व बोटे एकञ करून तोंडाजवळ नेतील.अचूक कृती केल्यास गुण द्यावे.🤷‍♂
        👉इयत्ता — पाचवी व सहावी (जोडवर्ग )
        👉विषय — मराठी
        👉प्रत्यक्ष कृती—
🔹दोन्ही वर्गातील  विद्यार्थ्यांना अर्धवर्तुळाकार समोरासमोर बसवा.
🔸दोन्ही वर्गाला या खेळाविषयी माहिती द्यावी.
🔹एका वर्गातील विद्यार्थी वाक्य सांगतील.
🔸दुसर्‍या वर्गातील विद्यार्थी वाक्याच्या आशयानुसार मूक अभिनय सादर करतील.
🔹उदा. १)गप्प बस. २)पुस्तक वाच. ३)मला भूक लागली. ४)आई झोपली. ५)लंगडी घाल. ६)पाणी पी. ७)मला लाडू आवडत नाही. ८)भाजी काप.९)विहिरीतून पाणी काढ. १०)हंडा उचल डोक्यावर घे. ११)जेवण कर. १२)गाडी चालव. १३)वेणी घाल .१४)झाड लाव. १५)चपाती बनव. १६)चेंडू फेक. १७)चेंडू झेल. १८)नखे काप,केस विंचर. १९)वेणी घाल,रिबिन बांध. २०)भाजी काप.....
🔸अशाप्रकारे एकेक वर्ग विविध वाक्य स्वत: तयार करून दुसर्‍या वर्गाला मूक अभिनय करायला लावतील.पण वाक्य एकदाच व मोठ्याने सांगतील.
🔹सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळेल याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे.
🔸जो वर्ग सर्व वाक्यांवर मूकअभिनय सादर करतील.त्या वर्गाचे टाळ्या वाजवून अभिनंदन करावे.👏


         👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯लक्षपूर्वक ऐकण्याची सवय लागते.
🎯एकाग्रता वाढते.
🎯अबोल विद्यार्थीही सहभागी होतो.
🎯मूक अभिनय करता येतो.
🎯दिवसभराच्या अभ्यासाचा क्षीण घालवता येतो.
🎯विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो.
🎯विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळते.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
                  ~~●~~~~~~~~●~~





▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

      मराठी नवोपक्रम मालिका...!! भाग -- १९  
            ♻अक्षरगटावरून शब्द तयार करणे♻ 
              ═••═
  👉मी आज मुलांना तीन अक्षरगट फळ्यावर दिलेत त्यावरून त्यांना शब्द तयार करायला सांगीतले.मुलांनी शब्द सांगीतल्यावर मी फळ्यावर लिहिले.
      👉इयत्ता — तिसरी ते पाचवी
      👉विषय — मराठी
      👉अक्षरगट—
1 ) म  क  र  ब  घ  ा  ि  ी  ु े
2 ) ग  स  प  व  त  ा  ि  ी  ु े
3 ) ट  द  ड  ख  ण  न  ा  ि  ी ु  े 👇
मग मत मन रस वर नर कर मत सण घन घड नख पट पद पण वड बस खत गड गर घण घर दम  रस मग कप वन नस रमण  मगर गवत बनव पवन नगर रतन कदम गरम गमन गगन कडक कमर खबर खडक नरक तबक बदक दगड नगद नरम नवस परत पकड पसर पदर बटण बबन कडक मरण पपई बनव मटण मदन मगन मदत खडक मखर रबर वरण रबर सरक सडक मटर पकड सरक सई समई उन उर उघड उगम उदय उदर उरक बरकत खडतर उपवन उतरण मनगट सरबत बडबड तरतर नसनस वटवट खटपट नटखट  पटकन परकर दगदग गणपत कटकट कसरत कसदार पटापट वाघ कान खाट कात वाटगार सडा करा  गारा घाव डबा बाप ताट ताक तार दादा नाक नवा पाट पास पान मासा मान साप आग आण घास आण बाई ताई घाई आई माई कार आवर पसारा कागद साबण कागद वरात कापड वावर नवरा पापड वाटाणा वानर राघव साखर उपास उदार उदास उकाडा उघडा पवार गवार खापर पाखड पारस दणका ममता  बदाम सामान सासर नारद गारवा रावण वारस  सागर दादर कासार सासरा सातारा पगार वारा गारा आराम अाकार अाराम अागार रवा सासर बाण मार दार उनाड उपकार परसात इमारत सातबारा पानदान  दवाखाना कामगार कारखाना आमदार   खासदार साईबाबा  राबतात  इनाम  इमारत ईद अाणि दिवा माती गादी नाती राणी गादी गिरवा सविता खिडकी  सितारा कविता  किरण किसन गणित तिखट किर दिवस बबिता गिरणी तितर दागिणा दिवस पिसारा खिरापत रविवार गुरूवार आरती मनी पती  गणपती पाणी काडी वाडी नाडी सनकी पाटी पिपरी काकडी बीड पाखरु सीमा वाकडी उडी पुडा पुरी सुई सुटी मुका सुरी गुणी कुमुद कुमार कुरमुरे कुरकुररीत गुपित तुकडा तरूण दुकान दुसरा दुपार नुसता पुर तुरी सुप चुना  पुरी मुकुट गुटखा सुमन नारू पारू रुपा तरु  गुरू सुबक सुतार घुमट तुकाराम गिरणी मटकी बासरी  मारते काकडी कारागिर  बारीक सारीक पीक वीणा उडी खारीक बनारसी आगगाडी अामटी अारती विमान सुपारी पेरू खेकडा रेघा विवेक कडे देव नेम बेत मेण केस केर लेखण वेडा अरेरे माणसे पुणे सरपटते बापरे  केसरी वाघमारे देवी वेणी इकडे तिकडे कसरती मदारी टवटवीत पानटपरी

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯शब्दसंग्रह वाढविणे.
🎯एकाग्रता वाढविणे.
🎯बुद्धिला चालना देणे.
🎯अक्षर व स्वरचिन्ह यांची जुळवाजुळव करून अर्थपूर्ण शब्द तयार करता येणे.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
                   ~~●~~~~~~~~●~~

      मराठी नवोपक्रम मालिका...!! भाग -- २०  

                    🍯अभ्यासहंडी....!!🍯
         ═••═
     👉ज्याप्रमाणे मुलांना जेवणात रोज एकच पदार्थ दिला तर जेवण करण्यात मुलांना फारशी गोडी वाटत नाही.त्याचप्रमाणे आपण एकाच पद्धतीने अध्यापन केल्यास मुलांना ते निरस व कंटाळवाने वाटते. पण आपण  वेगवेगळे उपक्रम घेतल्यास मुलांची एकाग्रता वाढते व शाळेची आवड निर्माण होते.
       👉प्रत्यक्ष कार्यवाही —
   🔸प्रथम एका हंडीमध्ये गणित व सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न असलेल्या चिठ्या व चाॅकलेट ठेवले.हंडी उंचावर दोरीला बांधून फुले व फुगे लावून सजावट केली.🍯🍬🌺🎈

🔹वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार बसवा.
🔸अभ्यासहंडी विषयी सर्व नियम समजावून सांगा.
🔹विद्यार्थी मनोरा रचून अभ्यासहंडी फोडतील.
🔸जेवढ्या चिठ्ठ्या उचलतील तेवढेच चाॅकलेट उचलतील.
🔹चाॅकलेट जास्त मिळावे म्हणून जास्त चिठ्ठ्या उचलतात.
🔸एकेक विद्यार्थी चिठ्ठीतील प्रश्न वाचून उत्तर देतील.
🔹सर्वात जास्त चिठ्ठ्या उचलून सर्वात जास्त अचूक उत्तरे देणार्‍या विद्यार्थ्यास एक पेन देऊन अभिनंदन करावे.🖊👏
       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯आगळावेगळा उपक्रम घेतल्यामुळे वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण होते.
🎯मनोरंजनातून ज्ञान प्राप्त होते.
🎯खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण होते.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
                   ~~●~~~~~~~~●~~
  आणखी मराठी नवोपक्रम  वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

 ⏪⏪
 01 02 03 04⏩⏩


No comments:

Post a Comment