"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

मराठी नवोपक्रम मालिका Page 2


   सौ. अलकाताई राकेश फुलझेले  
उपक्रमशील शिक्षिका 'महाराष्ट्र शिक्षक पॅनल' च्या सक्रिय संचालक तालुका जिल्हा पालघर यांनी शाळेत राबवलेले  व स्वतः लेखन केलेले... 
   "माझी शाळा ~ माझे उपक्रम"   


सर्व शिक्षकांना वर्गात अध्यापन आनंददायी करण्यासाठी उपयुक्त पडतील असे विषयवार उपक्रम... व मेजवानी मराठी नवोपक्रम मालिका...

      मराठी नवोपक्रम मालिका...!! भाग -- ६   
                तुम्ही विचारा...आम्ही सांगतो....!!  
          ═••═
 👉विषय — मराठी
 👉 इयत्ता — दुसरी ते सातवी पर्यंत घेता येतो.
 👉 कृती —
🔹प्रथम मी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनाशी संबधित प्रश्न विचारले.
🔸वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट तयार केले.
🔹एका गटाने दैनंदिन जीवनाशी संबधित प्रश्न विचारायचा.
🔸दुसर्‍या गटाने त्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे.
🔹अशाप्रकारे दोन्ही गट एकमेकांना दैनंदिन जीवनाशी संबधीत असलेले प्रश्न विचारून खेळ घेत होते.
🔸नंतर दोन-दोन विद्यार्थ्यांना समोरासमोर उभे करून एकमेकांना प्रश्न विचारण्याची संधी दिली.
🔹 *दैनंदिन जीवनाशी संबधित प्रश्न — उदा.👇
१)तुझ्या गावाचे नाव सांग?
२)कावळ्याचा रंग कसा आहे?
३)तुझ्या घरी कोणकोण आहेत?
४)तू आज काय जेवण केले?
५)तुला कोणते खेळ आवडतात?
🔸स्वयंअध्ययनासाठी गटागटात व वैयक्तिक हा उपक्रम घेतला.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯प्रश्न तयार करण्याचे कौशल्य विकसित झाले.
🎯विचारशक्तीला चालना मिळाली.
🎯विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण झाली.
🎯स्वयंअध्ययनासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
             ~~●~~~~~~~~●~~
      मराठी नवोपक्रम मालिका...!! भाग -- ७   

                          शब्दांची बॅंक...!
       ═••═
    👉इयत्ता — दुसरी ते सातवीपर्यंत उपक्रम घेता येतो.
     👉कृती —
🔹प्रथम फळ्यावर "साडी" शब्द लिहिला.
🔸 *"साडी"* शब्दापासून यमक जुळणारे शब्द तयार करण्यास सांगीतले.
🔹मुलांनी सांगीतलेले सर्व शब्द फळ्यावर लिहिले...काडी,माडी,नाडी,घोडी,वेडी,घडी,छडी,गडी,वडी,जुडी...
🔸नंतर पाच-पाच विद्यार्थ्यांचे गट पाडले.
🔹प्रत्येक गटाला एक एक शब्द दिला.
🔸आई,बाहुली,फळा,रस.....
🔹दिलेल्या शब्दावर गटात चर्चा करून यमक जुळणारे शब्द लिहायला दिले.
🔸प्रत्येक विद्यार्थ्याला एक शब्द देऊन यमक जुळणारे शब्द लिहायला लावले.
🔹संग्रह वहीत यमक जुळणार्‍या शब्दांचे लेखन करून घेतले.
🔸अशा प्रकारे सामूहिक,गटात व वैयक्तिक उपक्रम घेतल्यामुळे यमक जुळणार्‍या "शब्दांची बॅंक" विद्यार्थ्यांनी तयार केली.



       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯समान अक्षराने शेवट होणारे शब्द सांगता आले.
🎯यमक जुळणारे शब्द समजले.
🎯नवनवीन शब्दांचा संग्रह झाला.
🎯शब्दसंग्रह वाढला.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
                ~~●~~~~~~~~●~~

      मराठी नवोपक्रम मालिका...!! भाग -- ८   
                      तुम्ही सांगा...आम्ही लिहितो.. 
          ═••═
  👉 ~अध्ययन  अध्यापन  प्रक्रिया  आनंददायी,बालकेंद्रित,कृतीशील व्हावी.विद्यार्थ्यांना मातृभाषेच्या अध्ययनाविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी मी वर्गात मराठी नवोपक्रम मालिका राबविली....भाग - ८~👇
      👉इयत्ता — दुसरी ते सातवीपर्यंत नवोपक्रम घेता येते.
     👉कार्यवाही —
🔹प्रथम मूळक्षरे सांगून श्रुतलेखन घेतले.
🔸साधे शब्द,जोडाक्षरयुक्त शब्द सांगून श्रुतलेखन घेतले.
🔹वाक्यलेखन व चार-पाच ओळींचा परिच्छेद सांगून श्रुतलेखन घेतले.
🔸विद्यार्थ्यांचे गट पाडून गटप्रमुख नेमून श्रुतलेखनाचा सराव घेतला.
🔹विद्यार्थी कितपत बरोबर ,शुद्ध ,स्पष्ट , वळणदार,सुवाच्य लिहितात हे तपासण्याचा माझा दृष्टीकोन होता.
🔸विद्यार्थ्यांच्या लेखनाची तपासणी मी स्वत: किंवा गटप्रमुखाकडून नियमित करून घेतली.
🔹दर दोन दिवसाने श्रुतलेखनाची स्पर्धा घेऊन बक्षीस दिल्यामुळे श्रुतलेखनात प्रगती दिसून आली.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯श्रवण कौशल्य विकसित करणे.
🎯बैठक व एकाग्रता वाढविणे.
🎯जाणीवपूर्वक ऐकण्याची सवय लागणे.
🎯विद्यार्थी शुद्ध व सुवाच्य लेखन करू लागले.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
                ~~●~~~~~~~~●~~






▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

       मराठी नवोपक्रम मालिका...!! भाग -- ९   

                     बोला पण....आदराने..!!
       ═••═
👉 घरच्या बोलीभाषेने,परिसरातील बोलणे ऐकूण शाळेतील विद्यार्थी मोठ्या व्यक्तींशी 'अरे-तुरे 'संबोधून बोलत असे.बाबा आला,शाळेत कचरेवाला आला,ग्रामपंचायतचा चपराशी आला,बाई आली,खिचडीवाला आला,लहान वर्गातील विद्यार्थी सातवीच्या विद्यार्थ्यांना नावे घेऊन बोलवत असे.... 
            "बोला पण...आदराने!" हा उपक्रम राबविल्यामुळे विद्यार्थी मोठ्यांशी आदराने बोलू लागले. 👇

    👉इयत्ता — पहिली ते सातवीपर्यंत उपक्रम घेता येतो.
    👉प्रत्यक्ष कार्यवाही—
🔹मोठ्या व्यक्तींशी कसे बोलायचे ते विविध प्रात्यक्षिकांतून समोर सादर केले.
🔸नेमके कसे बोलावे?यासाठी अधिक सराव घेतला.
🔹मोठ्या व्यक्तींशी कसे बोलावे याचे प्रात्यक्षिक करून घेतले.
🔸लहान किंवा समवयस्कांशी बोलतांना तुम्ही कसे बोलता यावर त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.
🔹कचरेवाला,चपराशी,खिचडीवाला अशा नावाने न संबोधता काका कचरा घ्यायला आले.ग्रामपंचायत मधून शिपाई काका आले.असा बदल घडवून आणला.
🔸ध्वनीमुद्रित संभाषण ऐकविले.संगणकावर संभाषण दाखवले.त्यामुळे उच्चारातील चुका लक्षात येऊन त्यात सुधारणा करता आली.
🔹प्रात्यक्षिकातून प्रासंगिक प्रसंगातून त्यांच्या चुकांचे निदान केले.
🔸विद्यार्थी दैनंदिन बोलत असतांनाही त्यांना चुकांची जाणीव करून दिली.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯विद्यार्थी लहान किंवा मोठ्या आणि समवयस्क व्यक्तींशी बोलतांना उचित शब्दांचा वापर करू लागले.
🎯उच्चारातील चुकांची सुधारणा झाली.
🎯विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवण झाली.
🎯लहान वर्गातील विद्यार्थी सातवीच्या विद्यार्थ्यांना दादा,ताई म्हणू लागले.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
                ~~●~~~~~~~~●~~

      मराठी नवोपक्रम मालिका...!! भाग -- १०   
                 ~भाषिक खेळ~ मिञ मिञ जवळ या.....
          ═••═
    👉इयत्ता — पहिली,दुसरी
    👉साहित्य — मराठी साहित्य पेटीतील चिञशब्दकार्ड म.११|०१ ते म.११|१००
    👉 कृती —
🔹दहा -दहा विद्यार्थ्यांचे दोन गट तयार करा.
🔸दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना समोरासमोर बसवा.
🔹एका गटातील विद्यार्थ्यांच्या समोर *चिञपट्ट्या* उलट करून ठेवा.
🔸दुसर्‍या गटातील विद्यार्थ्यांच्या समोर *शब्दपट्ट्या* उलट करून ठेवा.
🔹 "मिञ मिञ जवळ या..." असे म्हणताच विद्यार्थी आपल्या समोर ठेवलेली चिञपट्टी,शब्दपट्टी पटकन उचलून जवळ येतील.
🔸उदा...🐅— वाघ, 🦜— पोपट,🐘— हत्ती, 🐃— म्हैस, 🍅— टोमॅटो.......
🔹चुकीची जोडी एकञ आल्यास ती जोडी बाद होईल.
🔸चिञ व शब्दपट्टी जवळ आलेल्या जोडीने त्या चिञासंबधी माहिती सांगावी.
🔹सोप्याकडून कठिणाकडे अशा क्रमाने शिक्षकांनी चिञकार्डस द्यावी.



        👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯निरीक्षण शक्तिचा विकास होतो.
🎯चिञावरून शब्द वाचता येतात.
🎯एका दृष्टीक्षेपात चिञ व शब्द जोड्या लावता येते.
🎯चिञासंबधी माहिती सांगता येते.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
               ~~●~~~~~~~~●~~
  आणखी मराठी नवोपक्रम  वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

 ⏪⏪
 01 02 03 04⏩⏩



No comments:

Post a Comment