"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

मराठी नवोपक्रम मालिका Page 3


   सौ. अलकाताई राकेश फुलझेले  उपक्रमशील शिक्षिका 'महाराष्ट्र शिक्षक पॅनल' च्या सक्रिय संचालक तालुका जिल्हा पालघर यांनी शाळेत राबवलेले  व स्वतः लेखन केलेले... 
   "माझी शाळा ~ माझे उपक्रम"   

सर्व शिक्षकांना वर्गात अध्यापन आनंददायी करण्यासाठी उपयुक्त पडतील असे विषयवार उपक्रम... व मेजवानी मराठी नवोपक्रम मालिका...

   मराठी नवोपक्रम मालिका...!! भाग -- ११   

            भाषिक खेळ -२   
           ═••═━  
    👉इयत्ता — दुसरी ते पाचवी पर्यंत उपक्रम घेता येतो.
    👉कृती —
🔹पाच-पाच विद्यार्थ्यांचे गट तयार करा.
🔸सर्वांना भाषिक खेळाचे नियम समजावून सांगा.
🔹शब्दातील अक्षरांचा क्रम बदलला तरी नवीन अर्थाचा दुसरा शब्द तयार करण्यास सांगा.
🔸 ~उदा.~ नदी — दीन
🔹नवीन अर्थाचा शब्द तयार करतांना अक्षरांचे कानामाञा,वेलांटी बदलायची नाही.
🔸अशाप्रकारे गटातील विद्यार्थ्यांनी शब्द तयार करायचे.
🔹जो गट जास्तीत जास्त शब्द तयार करतील तो गट विजयी घोषित करावा.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯विद्यार्थ्यांना शब्द खेळाची गोडी लागली.
🎯अर्थपूर्ण शब्द तयार करता येतात.
🎯मराठीच्या तासाला विद्यार्थी न कंटाळता सहभागी झाला.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
~~●~~~~~~~~●~~

   मराठी नवोपक्रम मालिका...!! भाग -- १२  
         भाषिक खेळ — 3 व ४   
       ═••═

    👉इयत्ता — दुसरी ते पाचवी पर्यंत उपक्रम घेता येतो.
 

    👉 कृती —
🔹वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट तयार करा.
🔸दोन्ही गटाचा गटप्रमुख नेमावा.
🔹पहिल्या गटाला पुढील भाषिक खेळ द्या...👇
🔸तीन अक्षरी असे शब्द लिहा जे उलटसुलट कसेही वाचले तरी शब्द तोच राहतो.
🔹 ~उदा —~ जहाज,टोमॅटो,नमन,रबर....
🔸दुसर्‍या गटाला पुढील भाषिक खेळ द्या...👇
🔹जोडीने येणारे शब्द लिहा.
🔸 ~उदा —~ केरकचरा बाजारहाट,वरणभात,भाजीपाला....
🔹शिक्षक दोन्ही गटातील विद्यार्थ्यांचे शब्द तपासून संग्रह वहीत शब्दांचे लेखन करण्यास सांगतील.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯विद्यार्थ्यांना शब्द खेळाची गोडी निर्माण करणे.
🎯विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती,विचारशक्ती यांना चालना मिळाली.
🎯मराठी विषय समृद्ध करण्यासाठी भाषिक खेळाचा फायदा झाला.
🎯खेळातूनही ज्ञान प्राप्त झाले.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
 ~~●~~~~~~~~●~~





▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔴🔵🟢🔘🟢🔵🔴

    मराठी नवोपक्रम मालिका..!! भाग -- १3  

    भाषिक खेळ-५, चला प्रतिशब्द शोधूया...!!
       ═••═
    👉 ~खालील भाषिक खेळ घेण्यापूर्वी आठ दिवस समानार्थी शब्दांचे तक्ते नियमित वाचन करून घेतले.~
     👉इयत्ता — पाचवी
     👉 कृती —
🔹पाच पाच विद्यार्थ्यांचे गट तयार करावे.
🔸गटाचा गटप्रमुख शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेला विद्यार्थी नेमावा.
🔹प्रत्येक गटाला पाच-पाच शब्द सांगा.
🔸शिक्षक भाषिक खेळ समजावून सांगतील.
🔹गटप्रमुखाने गटातील विद्यार्थ्यांशी चर्चा करून जास्तीत-जास्त  प्रतिशब्द लिहावे.
🔸उदा. — १ ) आई = माता,माय,जननी,माऊली,मातोश्री.....
🔹सर्व गटातील प्रतिशब्द तपासून संग्रह वहीत लेखन करून घ्यावे.
🔸सर्वात जास्त प्रतिशब्द लिहिणार्‍या गटाचे टाळ्या वाजवून अभिनंदन करावे.👏

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯विचारशक्तीला चालना देणे.
🎯शब्दसंपत्ती वाढविणे.
🎯मराठी विषयाची आवड निर्माण करणे.
🎯मराठी विषय समृद्ध करण्यासाठी भाषिक खेळाचा फायदा झाला.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
~~●~~~~~~~~●~~

    मराठी नवोपक्रम मालिका..!! भाग -- १४  
        भाषिक खेळ - 6  🔗 शब्दसाखळी 🔗
        ═••═
  👉 ~भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढविणे गरजेचे आहे.त्यासाठी भाषिक खेळ मोलाचे कार्य करतात.~  👇
      👉इयत्ता — तिसरी
      👉कृती —
🔹पाच-पाच विद्यार्थ्यांचे चार गट तयार करा.
🔸गटाचा गटप्रमुख नेमावा.
🔹विद्यार्थ्यांना भाषिक खेळ फळ्यावर समजावून सांगा.
🔸ज्या शब्दांना काना,माञा,वेलांटी,उकार नसलेले शब्द लिहिण्यास सांगा.
🔹उदा. — खणखण, छमछम, टपटप,भरभर......अशी शब्दसाखळी तयार करण्यास सांगा.
🔸सारखे जोडून येणार्‍या शब्दांची शब्दसाखळी तयार करण्यासाठी १५ मिनिटे वेळ द्यावा.
🔹१५ मिनिटात जो गट सर्वात जास्त व अचूक शब्द लिहिणार त्या गटाला विजयी घोषित करावे.
🔸विजयी गटाचे टाळ्या वाजवून अभिनंदन करावे.👏
🔹संग्रह वहीत सर्व शब्दांचे लेखन करून घ्यावे.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯भाषेच्या अध्यापनाची आवड निर्माण करणे.
🎯भाषेचे अध्यापन मनोरंजक करणे.
🎯विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणे.
🎯विद्यार्थ्यांच्या तर्कशक्तीत वाढ होते.
🎯विद्यार्थ्याची संग्रहवृत्ती वाढविणे.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
~~●~~~~~~~~●~~
    मराठी नवोपक्रम मालिका..! भाग -- १५  
  भाषिक खेळ - 7, चला वाचूया... लिहूया...!
         ═••═
     👉इयत्ता — तिसरी
     👉कृती—
🔹दोन-दोन विद्यार्थ्यांचे गट तयार करा.
🔸रेस्टारंट पद्धतीप्रमाणे वर्गातील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली.
🔹मराठी बालभारती पुस्तकातील प्रत्येक जोडीला एक-एक पाठ वाटून दिला.
🔸पाठाचे प्रथम वाचन करण्यास सांगीतले.
🔹पाठात आलेले काना,र्‍हस्व-दीर्घ वेलांटी एक माञा,दोन माञा शब्दांचे वर्गीकरण करून यादी तयार करण्यास सांगीतली.
🔸पाठात आलेले अनुस्वारयुक्त शब्द,जोडाक्षरयुक्त शब्द शोधून यादी तयार करण्यास सांगीतली.
🔹जी जोडी सर्वात आधी सर्व शब्दांचे स्वरचिन्हानुसार वर्गीकरण करून यादी तयार करेल त्या जोडीचे टाळ्या वाजवून अभिनंदन करावे.👏
🔸वरील प्रमाणे रोज एका पाठातील शब्दांचे वर्गीकरण करुन आणण्यासाठी गृहपाठ द्यावा.
🔴🔵🟢🔘🟢🔵🔴

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯स्वंयअध्ययनासाठी वरील उपक्रम अतिशय उपयुक्त आहे.
🎯अध्यापनात भाषिक खेळाचा वापर केल्यामुळे अध्ययन-अध्यापन आनंददायी होते.
🎯विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची  सवय लागली.
🎯वर्गात सराव झाल्यामुळे गृहपाठ आवडीने करून येतात.
🎯वर्णानुक्रमे शब्द यादी तयार करता येते.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
              ~~●~~~~~~~~●~~
🔴🔵🟢🔘🟢🔵🔴
  आणखी मराठी नवोपक्रम  वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

 ⏪⏪
 01 02 03 04⏩⏩




No comments:

Post a Comment