"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

गणित नवोपक्रम मालिका Page 2


   सौ. अलकाताई राकेश फुलझेले   उपक्रमशील शिक्षिका 'महाराष्ट्र शिक्षक पॅनल' च्या सक्रिय संचालक तालुका जिल्हा पालघर यांनी शाळेत राबवलेले  व स्वतः लेखन केलेले... 
   "माझी शाळा ~ माझे उपक्रम"   

सर्व शिक्षकांना वर्गात अध्यापन आनंददायी करण्यासाठी उपयुक्त पडतील असे विषयवार उपक्रम... व गणित नवोपक्रम मालिका...
~~●~~~~~~~~●~~
     ⏬⏬ उपक्रम क्र.- 7  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬       

        💠 टप्पा पाढे खेळू या.. ! 💠      
            ═••═
           *👉कृती —*
🔹मैदानावर 1 ते 100 चा चौरस आखावा.
🔸सर्व विद्यार्थ्यांना चौरसाच्या बाजूला उभे करावे.
🔹10 विद्यार्थ्यांना खेळ खेळण्यास बोलवावे.
 🔸शिक्षकाने  2 चा टप्पा असे मोठ्याने म्हणावे.
🔹या दहा विद्यार्थ्यांनी पटापट 100 च्या चौरसातील 2 , 4 , 6 , 8 , 10 , 12 , 14 , 16 , 18 , 20  या क्रमांकावर उभे रहावे.
🔸2 , 4 , 6.........20 या क्रमांकावर उभे राहिल्यावर जो विद्यार्थी 2 या क्रमांकावर उभा आहे त्याने " बे एके बे " मोठ्याने म्हणावे.जो विद्यार्थी 4 या क्रमांकावर उभा आहे त्याने " बे दुणे चार " मोठ्याने म्हणावे. जो विद्यार्थी 6 या क्रमांकावर उभा आहे त्याने  " बे ञिक सहा " मोठ्याने म्हणावे.
🔹अशा प्रकारे 2 चा पाढा मोठ्याने म्हणून पूर्ण करावा.
🔸 याच प्रमाणे 3 , 4 , 5 ..........10  पर्यंतचे  टप्पे व पाढे खेळ घ्यावा.
🔹गटप्रमुख नेमून खेळाचा सराव घ्यावा.

        👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯 टप्पा संबोध दृढ होतो.
🎯 पाढे सहज पाठ होतात.
🎯 दिवसभराच्या अभ्यासाचा क्षीण घालवता येतो.
🎯 खेळातून ज्ञान प्राप्त होते.
🎯कृतीतून मिळालेले ज्ञान चिरकाल स्मरणात राहते.
       ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
            ~~●~~~~~~~~●~~
     ⏬⏬ उपक्रम क्र.- 8  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬       

      🏆लगोरी खेळ खेळूया..! चढता उतरता क्रम लावूया..!!🏆   
            ═••═
      👉इयत्ता — पहिली,दुसरी
     👉साहित्य — अंक ठोकळे,चेंडू
       👉प्रत्यक्ष कृती —
🔹दहा-दहा विद्यार्थ्यांचे दोन गट करावे.
🔸प्रत्येक गटाचा एक गटप्रमुख नेमावा.
🔹अंक ठोकळे चढत्या क्रमाने लावावे.
🔸नाणेफेक करून खेळाची सुरूवात करावी.
🔹एका गटाचा गटप्रमुख चेंडू फेकून लगोर्‍या फोडेल.
🔸दुसर्‍या गटातील विद्यार्थी चेंडू फेकून बाद करण्याचा प्रयत्न करतील.
🔹विद्यार्थी संख्याचा लहान मोठेपणा ओळखून चढत्या क्रमाने लगोर्‍या लावतील.
🔸जो गट सर्वात जास्त चढत्या क्रमाने लगोर्‍या रचतील त्या गटास विजयी घोषीत करावे.
🔹विजयी गटाचे टाळ्या वाजवून अभिनंदन करावे.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯संख्याज्ञान दृढ होते.
🎯संख्याचा लहान मोठेपणा ओळखता येणे.
🎯खेळातून गणित विषय सोपा करणे.
🎯मनोरंजनातून ज्ञान प्राप्त करणे.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
                 ~~●~~~~~~~~●~~
     ⏬⏬ उपक्रम क्र.- 9  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬       

     💠 चला खेळातून संख्या शिकूया....💠       
            ═••═
        👉इयत्ता — चौथी    
        👉साहित्य —
चार कागदी गांधी टोप्या , ० ते ९ अंककार्ड..👒
          👉कृती—
🔹 प्रथम चार विद्यार्थ्यांना एकक , दशक, शतक, हजार लिहिलेल्या कागदी गांधीटोप्या घालून एका रांगेत उभे करावे.
🔹दहा विद्यार्थ्यांना समोर एका रांगेत उभे करावे.
🔸दहा विद्यार्थ्यांच्या खिशाला  ० ते ९ अंककार्डे लावावी.
🔹सर्व विद्यार्थ्यांना खेळाचे नियम समजावून सांगावे.
🔸शिक्षक चार अंकी संख्या सांगतील.   
    उदा.५३४९
🔹 ज्या विद्यार्थ्यांच्या खिशाला वरील अंक असतील ते विद्यार्थी गांधीटोप्या घातलेल्या एकक,दशक ,शतक, हजार स्थानापुढे उभे राहतील.
🔸 प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत विचारणे.प्रत्येक अंकाची त्या त्या घरात स्थानिक किंमत बदलते संबोध स्पष्ट करणे.
 अशाप्रकारे चारअंकी संख्या सांगून खेळ सुरू ठेवतील. 

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯 चार अंकी संख्याज्ञान दृढ करणे.
🎯कृतीतून मिळालेले ज्ञान चिरकाल स्मरणात राहते.
🎯खेळातून गणित विषयाची आवड निर्माण करणे.
🎯अंकाची स्थानिक किंमत  संबोध स्पष्ट होतो.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
           ~~●~~~~~~~~●~~
     ⏬⏬ उपक्रम क्र.- 10 💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬       

                   🔰 अपूर्णांक 🔰         
            ═••═
     👉इयत्ता -  तिसरी
     👉साहित्य - कलिंगड 🍉
     👉प्रत्यक्ष कृती—
🔹 प्रथम विद्यार्थ्यांना वर्तुळाकार बसवावे.
🔸एक मोठे कलिंगड  हातात देऊन "पूर्ण"ही संकल्पना स्पष्ट करावी.
🔹 कलिंगडाचे दोन सारखे भाग करून  दोन मुलांच्या हातात देऊन उत्तर मुलांकडून काढून घ्यावे."अर्धा"ही संकल्पना स्पष्ट करावी.
🔸अर्ध्या भागाचे आणखी दोन भाग  करून मुलांच्या हातात देऊन उत्तर मुलांना विचारणे.उत्तर सांगता न आल्यास "पाव" भाग ही संकल्पना स्पष्ट करावी.
🔹तीन मुलांच्या हातात कलिंगडाचे तीन भाग देऊन "पाऊण" ही संकल्पना स्पष्ट करावी.
 👉टीप— अशाप्रकारे पाव, अर्धा, पाऊण ,पूर्ण ही संकल्पना सर्व विद्यार्थ्यांची दृढ होत नाही तोपर्यंत सराव घ्यावा.
🍉शेवटी कलिंगडाचे आणखी काप करून मुलांना वाटप करावे.🍉

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
  🎯 पूर्ण,पाव,अर्धा ,पाऊण ही संकल्पना दृढ होते.
 🎯 कृतीतून मिळालेले ज्ञान  चिरकाल स्मरणात राहते.
🎯 वर्गात सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
              ~~●~~~~~~~~●~~
     ⏬⏬ उपक्रम क्र.- 11  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬       

     हसत खेळत घड्याळ शिकणे...!!      
            ═••═
 
  ⏰ 👉साहित्य — घड्याळ प्रतिकृती,फासा,पत्ते....
       👉प्रत्यक्ष कृती —
🔹पाच ते आठ विद्यार्थ्यांचा गट तयार करणे.
🔸हुशार विद्यार्थी गटाचा गटप्रमुख नेमावा.
🔹घड्याळ मध्यभागी ठेवून घड्याळाभोवती वेळ लिहिलेले पत्ते व फासा ठेवावे.
🔸एका विद्यार्थ्याच्या हाती फासा देऊन तो हालवून खाली टाकण्यास सांगणे.
🔹फास्यावर पडलेली वेळ बघून विद्यार्थी अचूक वेळ दाखवतील.
🔸एका विद्यार्थ्याला घड्याळाभोवती ठेवलेले एक कार्ड उचलण्यास सांगून त्यावरील अचूक वेळ दाखवण्यास सांगावे.
🔹अचूक वेळ दाखवता आली नाही तर गटप्रमुखाने सहकार्य करावे.
🔸अचूक वेळ दाखविल्यास त्या विद्यार्थ्याला शाबासकी द्यावी.
🔹नंतर गटातील इतर मुलांना संधी द्यावी.अशाप्रकारे खेळ सुरू ठेवावा.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯घड्याळात वेळ अचूक दाखवता येणे.
🎯मनोरंजनातून ज्ञान प्राप्त होते.
🎯कृतीतून मिळालेले ज्ञान चिरकाल स्मरणात राहते.
🎯मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.
🎯खेळामुळे मुलांमध्ये चुरस व गोडी निर्माण होते.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
                 ~~●~~~~~~~~●~~





▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

     ⏬⏬ उपक्रम क्र.- 12  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬       

               👑 चौकटराजा 👑     
            ═••═
    👉इयत्ता — तिसरी
    👉साहित्य — एक रेघी वही, पेन..📕
       👉प्रत्यक्ष कृती—
🔹प्रथम पाच पाच विद्यार्थ्यांचा गट तयार करा किंवा पाच पाच विद्यार्थ्यांना रांगेत बसवा.
🔸या उपक्रमात वहीवर चौकट काढायला सांगा.
🔲विद्यार्थी चौकट वही व पेन्सील वापरणार नाही अशी सूचना द्या. ( कारण पहिली व दुसरीतच चौकट वही वापरायची असते.)
🔹फळ्यावर आडव्या मांडणीत बेरीज वजाबाकीची पाच पाच उदाहरणे द्यावीत.
🔸जो विद्यार्थी सर्वप्रथम चौकटीत उभी मांडणी करून अचूक बेरीज वजाबाकी करेल तो विद्यार्थी "चौकटराजा" म्हणून घोषीत करावा.

🔹फळ्यावर आजचा "चौकटराजा"👑 म्हणून त्याचे नाव लिहावे.
🔸15 जुलै पासूनच हा उपक्रम सुरू केला.दोन महिने हा उपक्रम नियमित घेतला...🔲

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯खेळातून ज्ञानाची निर्मिती होते.
🎯गणित विषयाची आवड निर्माण होते.
🎯एकक,दशक,शतक घरांची संकल्पना स्पष्ट होते.
🎯अचूक मांडणी करायची सवय लागते.
🎯आज फळ्यावर माझे नाव लिहावे म्हणून अचूक गणिती क्रिया करण्याची सवय लागते.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
               ~~●~~~~~~~~●~~
     ⏬⏬ उपक्रम क्र.- 13  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬       

      🥇 चला अंकाशी मैञी करूया...!!     
            ═••═
🟣🔵🟥💜🟩🟡🟢

     👉इयत्ता — तिसरी व पाचवी
     👉शै.साहित्य — ० ते ९ अंककार्ड.....
👉सुचना — हा उपक्रम आपण दुसरी ते सातवी पर्यंत घेऊ शकतो. इयत्तेनुसार गटातील विद्यार्थी वाढवावे. तेवढी अंककार्ड त्यांना द्यावी.
       👉प्रत्यक्ष कृती —
🔹इयत्ता तिसरीच्या तीन - तीन विद्यार्थ्यांचे व पाचवीच्या पाच पाच विद्यार्थ्यांचे गट तयार करावे.
🔸प्रत्येक गटात एक हुशार विद्यार्थी येईल असेच गट तयार करावे.
🔹एका टोपलीत ० ते ९ अंककार्डांचे पाच संच ठेवा.
🔸गटातील प्रत्येक विद्यार्थ्याला टोपलीतील एक अंककार्ड उचलायला लावा.
🔹या उपक्रमासाठी  विद्यार्थ्यांना 30 मिनिटे वेळ द्यावा.
🔸गटातील तीन विद्यार्थ्यांना तीन अंककार्ड आलीत.
🔹त्या तीन अंककार्डापासून अंकाची अदलाबदल करून जेवढ्या संख्या तयार करता येतात तेवढ्या संख्या तयार करण्यास सांगा.
🔸तयार केलेल्या संख्याचे अक्षरात लेखन करण्यास सांगा.
🔹तयार केलेल्या संख्यामधून सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या दाखवायला सांगा.
🔸तीन संख्या घेऊन चढता-उतरता क्रम लावण्यास सांगा.
🔹तयार केलेल्या संख्येपासून पाच बेरीज व वजाबाकीची उदाहरणे तयार करण्यास सांगा.
🔸जो गट सर्वात जास्त तीन अंकी संख्या तयार करून बेरीज व वजाबाकीची उदाहरणे तयार करणार त्या गटाचे टाळ्या वाजवून अभिनंदन करावे.👏

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯तीन अंकी व पाच अंकी संख्या तयार करता येते.
🎯संख्याचे दृढीकरण होते.
🎯लहान व मोठी संख्या ओळखता येते.
🎯बेरीज - वजाबाकी उदाहरणे तयार करता येतात.
🎯बुद्धीला चालणा मिळते.
🎯बहुवर्ग अध्यापनासाठी हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
                  ~~●~~~~~~~~●~~
  आणखी गणित नवोपक्रम  वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

⏪⏪
 01 0203
⏩⏩









No comments:

Post a Comment