"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

इंग्रजी नवोपक्रम मालिका Page 2


   सौ. अलकाताई राकेश फुलझेले  
उपक्रमशील शिक्षिका 'महाराष्ट्र शिक्षक पॅनल' च्या सक्रिय संचालक तालुका जिल्हा पालघर यांनी शाळेत राबवलेले  व स्वतः लेखन केलेले... 
   "माझी शाळा ~ माझे उपक्रम"   

सर्व शिक्षकांना वर्गात अध्यापन आनंददायी करण्यासाठी उपयुक्त पडतील असे विषयवार उपक्रम... आजच्या संगणक युगात इंग्रजी माध्यमातून बरेचशे व्यवहार होत आहे. इंग्रजी विषयाचा पाया भक्कम व मजबूत असेल तरच आपला विद्यार्थी स्पर्धायुगात टिकाव धरू शकेल त्यासाठी मेजवानी इंग्रजी नवोपक्रम मालिका सुरू केली. 
 ~~●~~~~~~~~●~~
🟣🔵🟥💜🟩🟡🟢


         🔘 उपक्रमाचे नाव 🔘  
💠 कोण बनणार शब्दांचा करोडपती..?? Who will become the millinium of words.!!
                  ═••═━ 

🦋मेजवानी इंग्रजी नवोपक्रम अंतर्गत मालिका.. Activity — 7
      👉इयत्ता — चौथी
      👉साहित्य — वही , पेन 📓
      👉 कृतीची कार्यवाही—
🔹वर्गातील पाच पाच मुलांच्या पाच रांगा करा.
🔸 मुलांना थोडे थोडे अंतर ठेऊन बसवा.
🔹प्रत्येक मुलाला एकेक वही व पेन घेऊन बसवा.
🔸30 मिनिटांचा कालावधी द्यावा.
🔹30 मिनिटात जो विद्यार्थी जास्तीत जास्त अर्थपूर्ण इंग्रजी शब्द लिहिणार तो आजच्या उपक्रमाचा विजेता घोषित करावा.
🔸सर्वात जास्त इंग्रजी शब्द जो विद्यार्थी लिहिणार त्या विद्यार्थ्याला शब्दांचा करोडपती म्हणून मुकूट घालून वही व पेन बक्षीस म्हणून द्यावे.

        👉 उपक्रमाची  फलनिष्पत्ती...  
🎯 ज्ञानाचे दृढीकरण झाले.
🎯विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्यांचा विकास झाला.
🎯या उपक्रमामुळे पूर्वज्ञान अजमावतता आले.
🎯जास्तीत जास्त स्पेलींग पाठांतर करून आलीत.
🎯वैयक्तिक घेतल्यामुळे उपक्रमात चुरस निर्माण झाली.
       ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
           ~~●~~~~~~~~●~~
        🔘 उपक्रमाचे नाव 🔘  
   "चला मिञ शोधू या.....!! " Let us make friends...!!  
                  ═••═━ 
🦋मेजवानी इंग्रजी नवोपक्रम मालिका अंर्तगत... Activity — 8
            👉 इयत्ता —चौथी
            👉शै.साहित्य— चिञे,शब्दकार्ड ,यमक शब्दांच्या जोड्या... ( Ryming words )
        
🟣🔵🟥💜🟩🟡🟢
 👉कृतीची कार्यवाही —
🔹विद्यार्थ्यांना वर्तुळाकार उभे करावे.
🔸वर्तुळाच्या मध्यभागी टेबलावर चिञे , चिञशब्द कार्ड व यमक शब्दांची कार्डे ( Rhyming words ) पसरवून ठेवावी.
🔹एक विद्यार्थी वर्तुळात उभा राहून झांज वाजवेल.बाकी वर्तुळातील विद्यार्थी गोलाकार धावतील...धावतांना म्हणतील "चला मिञ शोधूया...!"
🔸झांज वाजवणे बंद होताच गोलात धावणारे विद्यार्थी टेबलावरील एके कार्ड उचलतील.
🔹कार्डावरील चिञ व शब्द वाचून आपला मिञ शोधतील.
उदा. 1 ) 🐅  — Tiger
        2 )  🐠 — Fish
        3 )  🍎 — Apple
        4 ) 🍆 —  Brinjal
       5 ) 🏠 — House
🔹अशा प्रकारे पाच फेर्‍या पूर्ण करणे.
🔸पाचही फेरीत जलद मिञ शोधणारी जोडी विजयी घोषित करावी.
🔹यमक शब्द ठेवूनही हा खेळ घ्यावा.
उदा.— 1 ) Cat — Bat
           2 ) Fan — Man
           3 ) Book — Look

        👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯शब्दसंपत्ती विकसित करणे.
🎯एका दृष्टीक्षेपात इंग्रजी शब्द वाचता येणे.
🎯 इंग्रजी विषयाची भीती दूर करून इंग्रजी विषयाची गोडी निर्माण करणे.
🎯खेळातूनही ज्ञान प्राप्त करणे.
🎯 कृतीतून मिळालेले ज्ञान चिरकाल स्मरणात राहते.
  ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
             ~~●~~~~~~~~●~~





▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

        🔘 उपक्रमाचे नाव 🔘  
      💠 नाट्यीकरण 💠 DRAMA....!! 
                  ═••═━ 
   🦋 मेजवानी इंग्रजी नवोपक्रम मालिका अंर्तगत....Activity — 9
   👉इयत्ता — तिसरी ते सातवी
  👉साहित्य — भाज्यांची चिञे , ससा व कोल्हा...* 🍅🥕🥦🐰🦊
   👉 कृतीची कार्यवाही—
       इयत्ता तिसरी ते सातवी इंग्रजी पाठ्यपुस्तकातील एखाद्या संवादाच्या पाठाची निवड करावी.
🔹सहा विद्यार्थ्यांचा एक गट तयार करणे.
🔸विद्यार्थ्यांना नाट्यीकरणाची पाञे वाटून द्यावी.
🔹विद्यार्थ्यांना पाञानुसार मुखवटे लावावे.
🔸 प्रत्येक पाञाचा संवाद समजावून सांगणे.
🔹विद्यार्थी नाट्यीकरण सादर करतील.
🔸नाट्यीकरण सादर केल्यावर विद्यार्थ्यांचे कौतुक करावे.

        👉 उपक्रमाची  फलनिष्पत्ती...  
🎯विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे.
🎯विद्यार्थ्यांमधील इंग्रजी विषयाची भीती दूर करणे.
🎯संवाद व नाट्यीकरण कौशल्यांचा विकास साधणे.
🎯वर्गात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण करणे.
🎯 नाट्यीकरण उपक्रमामुळे वर्गात उपस्थितीचे प्रमाण वाढते.
      ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
         ~~●~~~~~~~~●~~
        🔘 उपक्रमाचे नाव 🔘  
 💠 लपलेले शब्द शोधूया.....!!💠 Making different words from a single word. 
                  ═••═━ 
*🦋मेजवानी इंग्रजी नवोपक्रम मालिका अंर्तगत....Activity —11*
      *👉इयत्ता — तिसरी ते सातवी*
       *👉विषय — इंग्रजी*
       *👉साहित्य — वही , पेन*📓🖊
       *👉उपक्रमाची कार्यवाही—*
🔹वर्गातील पाच पाच मुलांना रांगेत बसवा.
🔸मुलांना थोडे थोडे अंतर ठेऊन बसवा.
🔹प्रत्येक मुलाला एकेक वही व पेन घेऊन बसवा.*
🔸प्रत्येक विद्यार्थ्याला पाच ते सात अक्षरी असलेली शब्दपट्टी द्यावी.
🔹शब्द पट्टीवरील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द कसे  तयार करावे ते सांगावे...👇
*🔹उदा. Mother —more , other , or , the , are , hot , her , tom , to.....*
🔸15 मिनिटांचा कालावधी द्यावा.
🔹शब्दपट्टीवरील शब्दात कोणकोणते अर्थपूर्ण शब्द लपलेले आहेत ते शोधून लिहिण्यास सांगावे.
🔸15 मिनिटात सर्वात जास्त अर्थपूर्ण शब्द तयार करणारा विद्यार्थी विजेता घोषित करावा.
🔹विजेता विद्यार्थी आजचा शब्द सम्राट म्हणून घोषित करावा.
🔸आजच्या शब्द सम्राटाला मुकूट घालून अभिनंदन करावे.👏
🟣🔵🟥💜🟩🟡🟢

        👉 उपक्रमाची  फलनिष्पत्ती...  
🎯शब्दसंपत्ती विकसित करणे.
🎯लेखन कौशल्यांचा विकास साधणे.
🎯पूर्वज्ञान अजमावता आले.
🎯ज्ञानाचे दृढीकरण झाले.
🎯 कल्पना शक्तीला चालना मिळते.
🎯वैयक्तिक घेतल्यामुळे उपक्रमात चुरस निर्माण झाली.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
        ~~●~~~~~~~~●~~
        🔘 उपक्रमाचे नाव 🔘  
 चला शब्दांची बाग बनवूया.....!! Garden of words....!!
                  ═••═━ 
🦋मेजवानी इंग्रजी नवोपक्रम मालिका अंर्तगत....Activity — 10
 
    👉इयत्ता —तिसरी ते सातवी
   👉साहित्य — वही , पेन 📓🖊
    👉कृतीची कार्यवाही—
🔹प्रथम पाच पाच विद्यार्थ्यांचे गट तयार करावे.
🔸प्रत्येक गटाला अक्षर द्यावे.
🔹दिलेल्या अक्षरापासून जास्तीत जास्त शब्द लिहायला सांगणे.
🔸पाच पाच अक्षरे एका गटाला देऊन त्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहायला लावणे.
🔹उदा..a — ant , and , are , apple , at.......etc
🔸30 मिनिटाचा कालावधी द्यावा.
🔹जो गट सर्वात जास्त शब्द तयार करेल तो गट विजयी घोषित करावा.
🔸सर्व गटांचे शब्द एकञ करून "शब्दांची बाग" अशी पुस्तिका तयार करावी.

        👉 उपक्रमाची  फलनिष्पत्ती...  
🎯शब्दसंपत्ती विकसित झाली.
🎯पूर्वज्ञानाचे दृढीकरण झाले.
🎯लेखन कौशल्याचा विकास साधणे.
🎯विद्यार्थी उत्साहाने इंग्रजी विषयात रमू लागली.
🎯हसत खेळत इंग्रजी शिक्षण घेत असल्यामूळे इंग्रजी विषयाची भीती दूर झाली.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
           ~~●~~~~~~~~●~~
        🔘 उपक्रमाचे नाव 🔘 
 💠 शब्दगाडी तयार करणे.💠 CHAIN OF WORDS
                  ═••═━ 
   🦋 मेजवानी इंग्रजी नवोपक्रम मालिका अंतर्गत... Activity — 12
   👉  इयत्ता —चौथी व पाचवी
   👉 विषय —इंग्रजी
   👉 कृतीची कार्यवाही —
🔹पाच पाच विद्यार्थ्याचे  गट करावे.
🔸प्रत्येक गटाचा गटप्रमुख नेमावा.
🔹खेळाचे नियम समजावून सांगावे.
🔸शिक्षक पहिल्या फेरीत सर्व गटाला एक अक्षर देतील. उदा. b हे अक्षर देऊन दहा मिनिट वेळ द्यावा.
🔹 शिक्षक दुसर्‍या फेरीत सर्व गटाला आणखी एक अक्षर देतील.उदा.m हे अक्षर देऊन दहा मिनिटे वेळ द्यावा. 👇
🦋 पहिली फेरी — अक्षर b — bat— top— pen— nib— bag— gun— nine— eye— ear— run........
🦋दुसरी फेरी — अक्षर m — man— not— tall— leg— goat— two— orange— eye— elephant— tell......
🔹 ज्या गटाने दोन्ही फेरीतील अक्षरापासून अचूक व जास्त शब्द तयार केले तो गट विजयी घोषित करावा.
🔸 विजयी गटाचे टाळ्या वाजवून अभिनंदन करावे.👏
  👉 टीप — या खेळासाठी A ते Z मधील कोणतीही अक्षरे देता येतील.

        👉 उपक्रमाची  फलनिष्पत्ती...  
🎯 शब्दसंपत्ती विकसित करणे.
🎯 बुद्धीला चालना मिळते.*
🎯 खेळामुळे इंग्रजी विषय सोपा वाटतो.
🎯 विद्यार्थी उत्साहाने इंग्रजी विषयामध्ये रमू लागतात.

🟣🔵🟥💜🟩🟡🟢
       ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
          ~~●~~~~~~~~●~~             
 आणखी इंग्रजी नवोपक्रम  वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

 ⏪⏪
 01 02

⏩⏩
~~●~~~~~~~~●~~

No comments:

Post a Comment