"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

गणित नवोपक्रम मालिका Page 3



   सौ. अलकाताई राकेश फुलझेले   उपक्रमशील शिक्षिका 'महाराष्ट्र शिक्षक पॅनल' च्या सक्रिय संचालक तालुका जिल्हा पालघर यांनी शाळेत राबवलेले व स्वतः लेखन केलेले... 
   "माझी शाळा ~ माझे उपक्रम"   

सर्व शिक्षकांना वर्गात अध्यापन आनंददायी करण्यासाठी उपयुक्त पडतील असे विषयवार उपक्रम... व गणित नवोपक्रम मालिका...
~~●~~~~~~~~●~~
     ⏬⏬ उपक्रम क्र.- 14  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬       

       🎲 शतकवीर व्हा ! 🎲    
            ═••═
       👉इयत्ता—दुसरी ते चौथी      
       👉शैक्षणिक साहित्य—
   शतकवीर व्हा ! खेळपाटी , फासा,दशक कांड्या व शतक पाटी. 🎲
      👉 कृती --
🔹खालील छायाचिञ पाहून शतकवीर पाटी तयार करून घ्यावी.
🔸दोन विद्यार्थी खेळायला बसवा.
🔹आणखी दोन  विद्यार्थी दशकाची कांडी व शतकपाटी देण्यासाठी बसवा.
🔸एका विद्यार्थ्याला फासा टाकायला सांगा.
🔹समजा दान 6 पडले तर एककातील मणी 6 वर आणून ठेवावा.
🔸आता दुसर्‍या विद्यार्थ्याला फासा टाकून खेळायला लावा. जसे दान पडेल त्याप्रमाणे एककाच्या घरातील मणी सरकवा.
🔹एककाच्या घरातील मणी सरकवतांना दहा ओलांडल्यावर दशकातला मणी 1 घर पुढे सरकवून 1 दशकाची कांडी  द्यावी.
🔸एककातील मणी 9 वर आहे व दान 4 पडले तर दशकातला मणी 1 घर पुढे सरकवून एककातील मणी 3 या अंकापाशी आणावा.
🔹याप्रमाणे 10 होईपर्यंत प्रत्येक वेळी एककातला मणी वर वर सरकवावा व एक दशक पूर्ण झाल्यावर दशकातला एक मणी वर सरकवावा व दशकाची 1 कांडी द्यावी.
🔸अशा प्रकारे ज्याचे 100 पूर्ण होतील व त्याच्याजवळ 10 दशकाच्या कांड्या जमा होतील त्याला शतकाची पाटी द्यावी.
🔹तो या खेळाचा शतकवीर.
🔸पुन्हा खेळ याच पद्धतीने सुरू ठेवावा.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯 एकक व दशक संबोध स्पष्ट होतो.
🎯 संख्याज्ञानाचे दृढीकरण होते.
🎯 संख्येची स्थानिक किमंत समजते.
🎯 शतक म्हणजे काय ? ते समजते व शतकाचा संबोध स्पष्ट होतो.
🎯 पेटीतील दशक कांड्या व शतकपाटीचा संबोध स्पष्ट होतो.
🎯 खेळातून गणिताची भीती दूर करून गणित विषयाची आवड निर्माण करणे.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
          ~~●~~~~~~~~●~~
     ⏬⏬ उपक्रम क्र.- 15  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬      

 

       🌸रिंग टाका...गणित सोडवा..! रिंग मास्टर बना...!!🔘  
                     ═••═
     👉इयत्ता — पाचवी
     👉 साहित्य —
कुकरची जूनी गास्केट,गणिती क्रिया असलेल्या चिठ्ठ्या....
     👉प्रत्यक्ष कृती—
🔹सर्व विद्यार्थ्यांना अर्धवर्तुळाकार बसवावे.
🔸एक हुषार विद्यार्थी खेळाचा प्रमुख नेमावा.
🔹अर्धवर्तुळाच्या मध्यभागी बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार,यांची उदाहरणे लिहिलेल्या चिठ्ठ्या ठेवाव्या.
🔸अर्धवर्तुळात बसलेल्या एकेक विद्यार्थ्याला रिंग टाकायला लावणे.
🔹रिंग टाकणारा विद्यार्थी रिंगाच्या मधोमध आलेली चिठ्ठी उचलून त्या चिठ्ठीतील उदाहरण वाचून फळ्यावर मांडणी करून उदाहरण सोडवेल.
🔸फळ्यावर केलेले उदाहरण अचूक केल्यास टाळ्या वाजवून अभिनंदन करावे.👏🏻
🔹रिंग टाकण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला संधी द्यावी.
🔸सर्वात जास्त व अचूक उदाहरणे करणार्‍या विद्यार्थ्याला आजच्या खेळाचा "रिंग मास्टर" म्हणून घोषीत करावा.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯 गणित विषयाची आवड निर्माण करणे.
🎯खेळातून गणित विषय सोपा वाटतो.
🎯विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो.
🎯  बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार या सर्व क्रियांचा एकञ सराव होतो.
🎯 + — x ÷ या चिन्हांची पक्की ओळख होते.
🎯बहुवर्ग अध्यापन करतांना वरील उपक्रम अतिशय उपयुक्त आहे.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
               ~~●~~~~~~~~●~~




 


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
     ⏬⏬ उपक्रम क्र.- 16  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬       

     🎲गणिताशी मैञी...!!🎲      
                   ═••═
       👉इयत्ता — दुसरी ते पाचवी
       👉शै.साहित्य— संख्याचे ठोकळे
       👉प्रत्यक्ष कार्यवाही —
🎲प्रथम बाॅक्स पेपर घेऊन त्यापासून ठोकळे तयार केले.तयार ठोकळ्यावर एक अंकी,दोन अंकी,तीन अंकी,चार अंकी संख्या लिहून घेतल्या.एका ठोकळ्यावर *+ — x  ÷  <  >  =* ही चिन्हे काढली.

          👉प्रत्यक्ष कृती —1
🔹वर्गातील विद्यार्थ्यांचे गट तयार करून बसवा.
🔸प्रत्येक गटाचा गटप्रमुख नेमावा.
🔹गटातील प्रत्येक विद्यार्थी गणिताची वही,पेन घेऊन बसवा.
🔸चार ठोकळे हातात घेऊन हालवून खाली टाकण्यास सांगा.
🔹ठोकळ्यावर पुढे आलेल्या संख्याचा चढता-उतरता क्रम लावण्यास सांगा.
🔸नंतर दोन ठोकळे घेऊन हालवून खाली टाकण्यास सांगा.
🔹चिन्हांचा ठोकळा टाकण्यास सांगा.
🔹 < , > , =  यापैकी पडलेले चिन्ह संख्यांचा लहान मोठेपणाओळखून लावण्यास सांगा.

         *👉प्रत्यक्ष कृती — 2
🔹दोन ठोकळे हातात घेऊन हालवून खाली टाकण्यास सांगा.
🔸ठोकळ्यावरील संख्यां वाचण्यास सांगा.
🔹आता चिन्हांचा ठोकळा टाकण्यास सांगा.
🔸ठोकळ्यावर जे चिन्ह समोर असेल ती क्रिया वहीत करून दाखवण्यास सांगा.
 उदा...   (१) २ ५ + ३५ = ६०
             (२) ६ २ — ४ ९ = १३
             (३) २७६८ + ७६८९=
              (४) ९७५३ x ५६ =
              (५) ६७८२ ÷ १२ =
 👉टीप — इयत्ता पाचवीला बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार या सर्व क्रिया करून घ्या.


       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯संख्याज्ञानाचे दृढीकरण होते.
🎯संख्यांचा लहान मोठेपणा एका दृष्टीक्षेपात ओळखता येते.
🎯बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार या क्रियांचा सराव होतो.
🎯बहुवर्ग अध्यापन करणे सुलभ होते.               
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
                ~~●~~~~~~~~●~~
     ⏬⏬ उपक्रम क्र.- 17  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬       

    🚆गणिताची एक्सप्रेस...🚆        
                    ═••═
    👉इयत्ता — दुसरी ते पाचवी
    👉साहित्य — बॅज...
    👉प्रत्यक्ष कार्यवाही —
🚆1जुलै पासून रोज वर्गात "गणिताची एक्सप्रेस" हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमासाठी चार लहान वर्तुळाकार पुठ्यावर रंगीत कागद चिकटवून ट्रेनचे चिञ चिकटविले.त्यावर बेरीज एक्सप्रेस,वजाबाकी एक्सप्रेस,गुणाकार एक्सप्रेस,भागाकार एक्सप्रेस लिहून आकर्षक बॅज तयार केले.

     👉प्रत्यक्ष कृती—
🚊पाच पाच विद्यार्थ्यांच्या पाच रांगा तयार करणे. ( विद्यार्थी संख्येवरून )
🚊बेरजेवर आधारित 10 उदाहरणे तोंडी सांगावी.
🚊पाच मिनिटांचा वेळ द्यावा.
🚊पाच मिनिटात सर्वात जलद व अचूक उदाहरणे सोडविणार्‍या विद्यार्थ्याला 'बेरीज एक्सप्रेस' नावाचे बॅज लावावे.
🚊याचप्रमाणे वजाबाकी,गुणाकार,भागाकार यांची उदाहरणे तोंडी सांगून पाच पाच मिनिटाचा वेळ द्यावा.
🚊सर्वात जलद व अचूक उदाहरणे करणार्‍या विद्यार्थ्याला वजाबाकी,गुणाकार,भागाकार एक्सप्रेसचे बॅज लावावे.टाळ्या वाजवून अभिनंदन करावे.
👉🚆हा उपक्रम इयत्ता दुसरी ते पाचवी पर्यंत घेता येतो.🚆


       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯पायाभूत चाचणीसाठी नियमित सराव होतो.
🎯संख्याज्ञानाचे आपोआप श्रुतलेखन होते.
🎯बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार या क्रियांचा नियमित सराव होतो.
🎯जलद व अचूक करण्याची सवय लागते.
🎯विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेची चढाओढ लागते.
🎯गणिती क्रियांचा रोज सराव झाल्यामुळे विस्मरण कमी होते.
🎯एक्सप्रेसचा बॅज आता मलाच मिळावा म्हणून स्पर्धा लागते.
🎯गणित विषयाची भीती दूर होऊन आवड निर्माण होते.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
           ~~●~~~~~~~~●~~
     ⏬⏬ उपक्रम क्र.- 18  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬       

         चला झटपट खरेदी विक्री करूया....!    
            ═••═
     👉साहित्य - कल्पवृक्ष,नोटा व नाणी              
     👉कृती —
🔹दहा विद्यार्थ्यांचा एक गट तयार करा.
🔸हुशार विद्यार्थी गटाचा गटप्रमुख नेमावा.
🔹एका विद्यार्थ्यास दुकानदार म्हणून निवड करा.
🔸गटातील इतर विद्यार्थी ग्राहकाची भूमिका करतील.
🔹गटात ग्राहक विद्यार्थ्यांना प्रत्येकी 100₹,500₹,50₹,20₹,10₹ याप्रमाणे वाटप करावे.
🔸एकेक विद्यार्थी दुकानातील वस्तूंवरची किंमत पाहून हव्या असलेल्या वस्तूंची खरेदी करतील.
🔹वस्तूंवरच्या किंमतीची तोंडी बरीज करून तेवढी रक्कम दुकानदारास देतील.
🔹दुकानदार वस्तूंच्या किमतीएवढीच रक्कम घेऊन बाकी रक्कम परत करतील.
🔸दुकानदाराने परत केलेले पैसे बरोबर आहे किंवा नाही याची ग्राहक खाञी करतील.
🔹हिशोब करता न आल्यास गटप्रमुख मदत करतील.
🔸अशाप्रकारे खालील साहित्याचा वापर करून आपण वर्गातच सराव घेऊ शकतो.


       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯नोटा व नाणी यांची ओळख होते.
🎯प्रत्यक्ष नोटा व नाणी यांचा वापर करून वस्तू खरेदी करता येते.
🎯दुकानात जाऊन पटकन तोंडी हिशोब करता येतो.
🎯विद्यार्थी वर्गातच खरेदी विक्रीचे व्यवहार करतात.
🎯व्यवहारी ज्ञानात भर पडते.
🎯स्वंयअध्ययनासाठी उपयुक्त साहित्य आहे.
🎯विद्यार्थी दुकानात गेल्यावर फसगत होणार नाही.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
             ~~●~~~~~~~~●~~
     ⏬⏬ उपक्रम क्र.- 19  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬       

    💠 सांगा सांगा किती नोटा ? 💠   
                   ═••═
      👉इयत्ता — तिसरी व चौथी
       👉साहित्य — नोटा व नाणी संच..
       👉कृती —
🔹एका वेळी चार विद्यार्थ्याला खेळासाठी बोलवा.
🔸प्रत्येकाला नोटा व नाणी यांचा एकेक संच द्या.
🔹शिक्षकांनी सूचविलेली रक्कम विद्यार्थ्यांना तयार करायला सांगा.
उदा..595,850,2876,9210....
🔸विद्यार्थ्यांना दोन मिनिटाचा कालावधी द्या.
🔹दिलेल्या वेळेत जास्तीत जास्त व अचूक संच तयार करणारा विद्यार्थी विजयी घोषीत करावा.
🔸गटप्रमुख नेमून खेळ सुरू ठेवावा.
🟣🔵🟥💜🟩🟡🟢

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯नोटा व नाणींची ओळख होते.
🎯तोंडी बेरीज करता येते.
🎯व्यवहार ज्ञान वाढते.
🎯दुकानात पटकन तोंडी हिशोब करता येतात.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
               ~~●~~~~~~~~●~~
     ⏬⏬ उपक्रम क्र.- 20  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬       

        💠 संगीत खूर्ची  💠    
                  ═••═
  👉इयत्ता — तिसरी व चौथी
  👉साहित्य— ० ते ९ अंककार्ड,खूर्च्या...
   👉कृती —
🔹पाच खुर्च्या घेऊन त्यावर एकक,दशक,शतक,हजार,दश हजार कार्ड लावावे.
🔸वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ० ते ९ संख्याकार्ड खिशाला लावावी.
🔹एका विद्यार्थ्याने घंटा वाजवायला सुरूवात करावी.
🔸सर्व विद्यार्थी खुर्च्याभोवती धावायला सुरूवात करतील.
🔹घंटा वाजविण्याचे थांबल्याबरोबर शिक्षक संख्या सांगतील त्या त्या अंकाचे विद्यार्थी त्या स्थानावर जाऊन बसतील.उदा.२५४२०
🔸प्रत्येक विद्यार्थी आपल्या खाशाला लावलेले संख्याकार्ड पाहून त्या त्या खुर्चीवर जाऊन बसतील.
🔹खुर्चीवर बसलेल्या वद्यार्थ्यांकडून संख्या वाचन करून त्या अंकाची स्थानिक कामंत विद्यार्थ्यांनाच विचारून खेळ सुरू ठेवावा.
🔸अशाप्रकारे खेळाचा सराव घ्यावा.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯संख्या ज्ञान संबोध स्पष्ट होतो.
🎯संख्या ज्ञानाचे दृढीकरण होते.
🎯पाच अंकी संख्या तयार करता येतात.
🎯अंकाची स्थानिक कांमत सांगता येते.
🎯कृतीतून मिळालेले ज्ञान चिरकाल स्मरणात राहते.
🎯गणित विषयाची आवड निर्माण करणे.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
               ~~●~~~~~~~~●~~
  आणखी गणित नवोपक्रम  वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

 ⏪⏪
 01 0203
⏩⏩


🟣🔵🟥💜🟩🟡🟢

🟣🔵🟥💜🟩🟡🟢





1 comment:

  1. खूप छान उपक्रम आहेत

    ReplyDelete